अहमदनगरमधील शिवसेनेच्या माजी मंत्र्यांना कोरोना संसर्ग, कुटुंबातील दोघांना बाधा
शिवसेनेचे माजी मंत्री आणि माजी आमदार अनिल राठोड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे (Shivsena Ahmednagar ex minister test Corona Positive).
अहमदनगर : शिवसेनेचे माजी मंत्री आणि माजी आमदार अनिल राठोड यांना कोरोनाचा संसर्ग झाल्याचं स्पष्ट झालं आहे (Shivsena Ahmednagar ex minister test Corona Positive). त्यांच्या पत्नीला देखील कोरोनाची लागण झाली आहे. मुलगा आणि सुनेचा कोरोना अहवाल अद्याप बाकी आहे. या सर्वांना उपचारासाठी एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. राठोड आणि त्यांच्या पत्नीच्या संपर्कातील इतर लोकांचेही स्वॅब नमुने घेतले जात आहेत. त्याचे अहवाल येणे अद्याप बाकी आहेत.
अहमदनगरमधील एकूण रुग्णांची संख्या 3 हजार 817 वर पोहचली आहे. यापैकी आतापर्यंत उपचारानंतर 2 हजार 418 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. तर 1 हजार 346 रुग्णांवर वेगवेगळ्या रुग्णालयांमध्ये उपचार सुरु आहेत. अहमदनगरमध्ये आतापर्यंत 53 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सोमवारी (27 जुलै) सायंकाळी 6 वाजल्यापासून आज (28 जुलै) दुपारी 12 वाजेपर्यंत रुग्ण संख्येत 54 ने वाढ झाली. यामुळे उपचार सुरु असणाऱ्या रुग्णांची संख्या आता 1346 इतकी झाली. दरम्यान, आज दिवसभरात 133 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. यामुळे घरी सोडण्यात आलेल्या रुग्णांची संख्या 2418 झाली.
जिल्हा रुग्णालयाच्या कोरोना टेस्ट लॅबमध्ये आज दुपारपर्यंत 54 जण कोरोना बाधित आढळून आले. यामध्ये, नेवासा – 11 (कुकाना 7, शिरसगाव 1, नेवासा खुर्द 3), संगमनेर-5 (रायतेवाडी 1, सावरगाव 3, राजश्री हॉटेल घारगाव1), श्रीगोंदा-10 (खरातवाडी 1, शनी चौक 1, जनगळेवाडी 1, पारगाव 2, शेंडगेवाडी 1, बेलवंडी कोठार 1, काष्टी 3), कोपरगाव – 7 (पडेगाव 4, सुरेगाव 1, गांधीनगर 2), पाथर्डी -10 (नवनाथ पाथर्डी 1, कोरडगाव 1, जिरेसाल गल्ली 5, वामनभाऊ नगर 1, कासार गल्ली 1, शेवाळे गल्ली 1), अहमदनगर महापालिका -8 (पंकज कॉलनी 1, ज्ञानप्रा हॉस्टेल 1, शिवाजी नगर 1, पाईपलाईन रोड 1, सावेडी 1, बालिकाश्रम रोड 2, गुलमोहर रोड 1), नगर ग्रामीण -1 (सारोळा कासार 1), पारनेर -1 (नांदूर पठार 1), बीड – 1 (आष्टी- लोणी सय्यद मिर 1) यांचा समावेश आहे.
दरम्यान, आज दिवसभरात एकूण 133 रुग्णांना डिस्चार्ज मिळाला. यामध्ये मनपा 34, संगमनेर 6, राहाता 8, पाथर्डी 1, नगर ग्रामीण 27, श्रीरामपूर 2, कॅन्टोनमेंट 26, नेवासा 3, श्रीगोंदा 9, पारनेर 2, अकोले 8, राहुरी 5, शेवगाव 1, कर्जत 1 अशा रुग्णांचा समावेश आहे.
दरम्यान, राहुरी कारागृहातील 2 कैद्यांना कोरोनाची बाधा झाली. संगमनेर कारागृहातील 4 कैद्यांना 4 दिवसांपूर्वी राहुरी कारागृहात आणले होते. त्यांची कोव्हिड टेस्ट घेतल्यानंतर यातील दोघे कैदी कोरोना बाधित आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे आता कारागृहातील इतर कैद्यांबरोबरच पोलिसांची देखील कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.
हेही वाचा :
इच्छा असेल त्या मुंबईकराला कोरोना चाचणी करण्याची मुभा : आदित्य ठाकरे
Shivsena Ahmednagar ex minister test Corona Positive