शिवसेनेने कायम मला गोवण्याचा प्रयत्न केला, यांनी अनेकांची घरं उद्ध्वस्त केली : संग्राम जगताप

अहमदनगर : शिवसेनेने मला नेहमीच गोवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरचे आमदार आणि नगर लोकसभेचे उमेदवार संग्राम जगताप यांनी केलाय. मला कसे गोवण्यात येईल याचा नेहमीच शिवसेनेकडून  प्रयत्न केला जातो, तसेच अधिकाऱ्यांवर दमदाटी करून दहशद निर्माण केली जाते. खोटे गुन्हे दाखल करण्याचा यांचा धंदा आहे. याचा मी गेल्या वर्षी बळी पडलोय, अशी टीका संग्राम जगताप […]

शिवसेनेने कायम मला गोवण्याचा प्रयत्न केला, यांनी अनेकांची घरं उद्ध्वस्त केली : संग्राम जगताप
Follow us
| Updated on: Jul 05, 2019 | 3:55 PM

अहमदनगर : शिवसेनेने मला नेहमीच गोवण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरचे आमदार आणि नगर लोकसभेचे उमेदवार संग्राम जगताप यांनी केलाय. मला कसे गोवण्यात येईल याचा नेहमीच शिवसेनेकडून  प्रयत्न केला जातो, तसेच अधिकाऱ्यांवर दमदाटी करून दहशद निर्माण केली जाते. खोटे गुन्हे दाखल करण्याचा यांचा धंदा आहे. याचा मी गेल्या वर्षी बळी पडलोय, अशी टीका संग्राम जगताप यांनी माजी आमदार अनिल राठोड यांचे नाव न घेता केली.

महापालिकेतील आंदोलना दरम्यान शहर अभियंता विलास सोनटक्के यांना शिवसेनेच्या पदाधिकाऱ्याने बूट फेकून मारला होता. तसेच माजी आमदार अनिल राठोड यांनी चिथावणी देणारे वक्तव्य केल्या प्रकरणी जगताप यांनी चांगलाच समाचार घेतला. यांनी अनेक कार्यकर्त्यांचे घरे उद्ध्वस्त केली. आजपर्यंत प्रत्येकाला वेठीस धरलं, असं संग्राम जगताप यांनी म्हटलंय. तसेच अभियंत्यावर बूट फेकल्या प्रकरणी आणि खोटे गुन्हे दाखल करणाऱ्यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी संग्राम जगताप यांनी केली.

मी गेल्या वर्षी यांचाच बळी पडलो, यांना स्वप्नात संग्राम जगताप दिसतो, असा टोला जगताप यांनी लगावला. अभियंत्याला बूट फेकून मारल्याच्या घटनेनंतर कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केलं. महापालिका कर्मचाऱ्यांना आंदोलन मागे घेण्याची विनंती करणार असल्याचं आमदार जगताप यांनी म्हटलंय. माझी बंधिलकी नगरच्या जनतेशी असून आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करू, असंही ते म्हणाले.

संग्राम जगताप 90 दिवस तुरुंगात

गेल्यावर्षी महापालिकेच्या पोट निवडणुकीनंतर दोन शिवसैनिकांची हत्या करण्यात आली होती. त्याप्रकारणी आमदार संग्राम जगताप यांना देखील अटक करण्यात आली. 90 दिवस त्यांना नाशिकच्या जेलमध्ये राहावं लागलं होतं. कोणतेही ठोस पुरावे न मिळाल्याने आमदार संग्राम जगताप यांच नाव आरोपपत्रातून वगळण्यात आलं. ते सध्या जामिनावर बाहेर आहेत. 15 हजार रुपयाच्या जातमुचलक्यावर आणि तपासात सहकार्य करणे आणि साक्षीदार-फिर्यादीवर दबाव न टाकण्याच्या अटीवर जामीन मंजूर करण्यात आला होता.

काय आहे शिवसैनिक हत्या प्रकरण?

पोटनिवडणुकीनंतर केडगाव शिवसेनेचे शहर उपप्रमुख संजय कोतकर आणि वसंत ठुबे यांची सात एप्रिलला गोळ्या झाडून आणि गुप्तीने गळा चिरुन हत्या करण्यात आली होती. राजकीय वादातून ही हत्या झाल्याचं बोललं जात होतं. हत्येनंतर दुसऱ्याच दिवशी संदीप गुंजाळला अटक करण्यात आली. हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला होता.

हत्याकांड प्रकरणी संग्राम जगताप, वडील आमदार अरुण जगताप आणि सासरे भाजप आमदार शिवाजी कर्डिले, व्याही भानुदास कोतकर, संदीप कोतकर आणि विशाल कोतकरसह 36 जणांवर कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. हत्या, हत्येच्या कटासह इतर कलमाअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

अरुण जगताप हे फरार होते, तर संग्राम जगताप यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली होती. महापालिकेच्या पोटनिवडणुकीत काँग्रेसचा विशाल कोतकर निवडून आला होता. मात्र सायंकाळी दोघा शिवसैनिकांची निर्घृणपणे हत्या झाली. यानंतर शिवसैनिकांनी केडगावला रस्ता रोको आंदोलन करुन मारेकऱ्यांना अटक करण्याची मागणी केली. अटक होत नाही तोपर्यंत मृतदेह घटनास्थळीच होते. यानंतर राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांची पोलीस अधीक्षक कार्यालयात चौकशी करण्यात आली. यावेळी जमावाने एसपी कार्यालयाची तोडफोड करुन संग्राम जगताप यांना घेऊन गेले. या प्रकरणी दुसरा गुन्हा दाखल करण्यात आला. भाजप आमदार शिवाजी कर्डिले यांच्यासह अनेकांना अटक करण्यात आली होती.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.