‘घंटाबाज हिंदुत्ववाद्यांनो, मुंगेर हिंसाचारावर तुमची थोबाडे बंद का?’, शिवसेनेचा ‘सामना’तून भाजपवर हल्लाबोल

बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात दुर्गा विसर्जनादरम्यान मोठा हिंसाचार झाला. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या गोळीबारात एक १८ वर्षाच्या तरुणाचा जीव गेला, तर 15 जण जखमी झाले आहेत. त्यावरुन शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे.

'घंटाबाज हिंदुत्ववाद्यांनो, मुंगेर हिंसाचारावर तुमची थोबाडे बंद का?', शिवसेनेचा 'सामना'तून भाजपवर हल्लाबोल
voilence image for representation only
Follow us
| Updated on: Oct 30, 2020 | 10:11 AM

मुंबई: बिहारच्या मुंगरे जिल्ह्यात दूर्गा विसर्जनावेळी झालेला हिंसाचार आणि पोलिसांनी केलेल्या गोळीबारावरुन शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून भाजपवर जोरदार प्रहार करण्यात आला आहे. ‘जंगलराज! मुंगेरमध्ये हिंदुत्वावर गोळीबार!’ अशा मथळ्याखाली सामनामध्ये आजचा अग्रलेख लिहिण्यात आला आहे. ‘महाराष्ट्रात मंदिरे उघडा असे ‘घंटानाद’ करुन सांगितले जात आहे. मंदिरांची टाळी तोडून आत जाऊ, अशा धमक्या दिल्या जात आहेत. या मंडळींना मुंगेरचा हिंसाचार, हिंदुत्वाचा अवमान याबाबत काहीच घेणं-देणं पडलेलं दिसत नाही. सोयीचे हिंदुत्व असेच असते’, या शब्दात भाजपवर जोरदार टीका करण्यात आली आहे. (Shivsena attacks on BJP over munger violence at Bihar and Hindutva by Saamana)

‘भाजपशासित राज्यांत घडणाऱ्या या घटनांकडे बेगडी हिंदुत्ववादी अत्यंत संयमाने, तटस्थपणे पाहतात. अशा घटनांचा तपास पोलिस नि:पक्षपातीपणे करत असल्याचे हवाले देतात. ‘मुंगेर’सारखे हिंदुत्ववादावरील, दुर्गापुजेवरील हल्ले तर दडपले जातात. पण पालघरात सांडलेले साधूंचे रक्तही उसळत विचारते आहे, मुंगेरात हिंदूंचे रक्त सांडले. त्याविरोधात कधी घंटा बडवणार? निदान थाळ्या तरी वाजवा! बिहारमध्ये हिंदुत्वावर गोळ्या चालवल्यात हो!’ असा जोरदार हल्ला सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर करण्यात आला आहे.

‘आपला तो बाब्या आणि दुसऱ्यांचं ते कार्टं, अशा पद्धतीचा कारभार सध्या भारतीय जनता पक्षाकडून सुरू आहे. बिहार, उत्तर प्रदेश, हरयाणा राज्यांत सध्या जे घडत आहे ते पाहता तेथे कायदा आणि सुव्यवस्थेचे राज्य आहे काय? असा प्रश्न विचारला जाऊ शकतो, पण ही राज्ये भाजपशासित असल्यामुळेच तेथे सर्व आलबेल आहे. गडबड फक्त महाराष्ट्र, पंजाब, प. बंगालात, राजस्थानातच आहे ‘, असा टोलाही सामनाच्या अग्रलेखातून भाजपला लगावण्यात आला आहे.

सामनाच्या अग्रलेखातील महत्वाचे मुद्दे

बिहारात विधानसभा निवडणुकांची पहिली फेरी संपली आहे. पंतप्रधान मोदी यांच्यासह अनेक नेत्यांनी बिहारच्या प्रचार सभांत लोकांना विचारलं की, ‘‘तुम्हाला जंगलराज पुन्हा हवे आहे काय? नको असेल तर भाजप आणि जदयुला मतदान करा!’’ गेल्या पंधरा वर्षांपासून बिहारात नितीशकुमारांचेच राज्य आहे याचा विसर या मंडळींना पडलेला दिसत आहे.

बिहारात विधानसभा निवडणुकांची पहिली फेरी संपली आहे. पंतप्रधान मोदींसह अनेक नेत्यांनी बिहारच्या प्रचार सभांत लोकांना विचारलं की, ‘‘तुम्हाला जंगलराज पुन्हा हवे आहे काय? नको असेल तर भाजप आणि जदयुला मतदान करा!’’ गेल्या पंधरा वर्षांपासून बिहारात नितीशकुमारांचेच राज्य आहे याचा विसर या मंडळींना पडलेला दिसतोय.

दुर्गापूजा विसर्जनाबाबत हा गोंधळ, हिंसाचार व पोलिसी गोळीबार प. बंगाल, महाराष्ट्रासारख्या राज्यांत घडला असता तर एव्हाना ‘घंटा बजाव’छाप पोकळ हिंदुत्ववाद्यांनी नंगानाच घातला असता. दुर्गापूजेत गोळीबार म्हणजे हिंदुत्वावर हल्ला असल्याचे सांगून थयथयाट केला असता. प. बंगाल, महाराष्ट्रात कायदा-सुव्यवस्था ढासळली असून तेथे तत्काळ राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी केली असती.

गेला बाजार या गोळीबाराची सीबीआय चौकशी तरी कराच या मागणीसाठी भाजप शिष्टमंडळ राजभवनात चहापानास गेले असते. पण काय हो घंटाबाज हिंदुत्ववाद्यांनो, मुंगेरात दुर्गापूजा मिरवणुकीवर झालेल्या गोळीबारावर तुमची थोबाडे बंद का आहेत?

काही वृत्तवाहिन्यांवरही प्रहार

काही भुंकणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी तर त्या दुर्दैवी साधूंची ढाल पुढे करून शिवसेनेच्या हिंदुत्वावर प्रश्न निर्माण केले. आज मुंगेरला दुर्गापूजेवर पोलिसी गोळीबार होऊनही हे भुंकणारे व किंकाळय़ा मारणारे थंडच आहेत. नितीशकुमारांचे सरकार बरखास्त करून तेथे राष्ट्रपती राजवट लावा, असा सूर बिहारातील भाजपवाल्यांनी काढलेला दिसत नाही.

संबंधित बातम्या: 

शुभ्र दाढी, तेजस्वी चेहरा, या तेजानेच संकटांचा अंधार दूर होईल, ‘सामना’तून चिमटे

Special Report | ‘एकच मारला पण सॉलीड मारला’, सामनातून राज्यपाल टार्गेत

Shivsena attacks on BJP over munger violence at Bihar and Hindutva by Saamana

Non Stop LIVE Update
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार
पाशा पटेल यांचे जाहीर सभेत अश्लील हातवारे, रोहित पवारांची तक्रार.
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ
युपीतील रुग्णालयाला लागलेल्या आगीत 10 नवजात बालकांच्या मृत्यूने हळहळ.
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार
कोणी म्हणत असेल मीच देशाचा प्रमुख, तर म्हण बाबा पण...काय म्हणाले पवार.
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.