महाविकासआघाडीचं पुढील लक्ष्य विदर्भ, भाजपच्या गडाला शह देणार?

विदर्भ हा भाजपचा गड आहे. याच गडात भाजपला शह देण्यासाठी आता महाविकासआघाडीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून महाविकासआघाडीच्या (Mahavikas aaghadi working in vidarbh) तिन्ही पक्षांनी विदर्भात आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे.

महाविकासआघाडीचं पुढील लक्ष्य विदर्भ, भाजपच्या गडाला शह देणार?
Follow us
| Updated on: Dec 02, 2019 | 8:15 PM

नागपूर : विदर्भ हा भाजपचा गड आहे. याच गडात भाजपला शह देण्यासाठी आता महाविकासआघाडीचे प्रयत्न सुरु झाले आहेत. याचाच एक भाग म्हणून महाविकासआघाडीच्या (Mahavikas aaghadi working in vidarbh) तिन्ही पक्षांनी विदर्भात आपली ताकद वाढवायला सुरुवात केली आहे. विदर्भातील अनेक मतदारसंघात भाजपची पकड आहे. यावर कब्जा मिळवण्यासाठी महाविकासआघाडीच्या तिन्ही पक्षांनी प्लॅन तयार केला आहे, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

विदर्भ हा भाजपचा गड आहे. विदर्भाच्या भरवशावरच 2014 रोजी राज्यात भाजपचं सरकार (Mahavikas aaghadi working in vidarbh) आलं. 2014 रोजी विदर्भात भाजपचे 62 पैकी 44 आमदार निवडून आले. पण यंदाच्या निवडणुकीत भाजपला विदर्भात मोठा फटका बसला. तरीही विदर्भातून भाजपच्या 29 जागा निवडून आल्या आणि भाजपनं आपला गड शाबूत ठेवला.

भाजपच्या याच गडाला शह देण्यासाठी महाविकासआघाडीनं प्लॅन तयार केला आहे. महाविकासआघाडीमधील काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना या तीन पक्षाकडून विदर्भात आपली ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. याचाच एक भाग म्हणून महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये विदर्भातील नेत्यांना चांगली मंत्रिपदं देण्यात येणार आहेत. तसेच आपआपल्या पक्षाची ताकद वाढवण्यावर भर दिला जात आहे.

महाविकासआघाडीच्या सरकारमध्ये विदर्भातील नेत्यांच्या वाट्याला महत्त्वाची जबाबदारी मिळाली आहे. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना पटोले यांच्या रुपानं विधानसभेचं अध्यक्षपद विदर्भाला मिळालं, तर काँग्रेस नेते डॉ. नितीन राऊत यांना कॅबीनेट मंत्रिपद मिळालं. विदर्भातील अनेक नेते अजून मंत्रिपदाच्या रेसमध्ये आहेत.

विदर्भातून मंत्रिपदाच्या रेसमध्ये असलेले नेते

आ. विजय वडेट्टीवार, नेते काँग्रेस (ब्रम्हपूरी) आ. यशोमती ठाकूर, नेत्या, काँग्रेस (तिवसा) आ. संजय राठोड, माजी मंत्री, शिवसेना (दिग्रस) आ. आशिष जैसवाल, नेते, शिवसेना (रामटेक) आ. अनिल देशमुख, माजी मंत्री राष्ट्रवादी (काटोल) आ. राजेंद्र शिंगणे, नेते राष्ट्रवादी (सिंदखेड राजा)

“महाविकासआघाडीनं विदर्भात कितीही मोठी पदं दिलीत, तरीही विदर्भात भाजप नंबर एकचा पक्ष राहील. विदर्भात भाजप घराघरात पोहोचलाय”, असं भाजपचे नेते चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

विदर्भात विधानसभेच्या 62 जागा आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत 29 जागा भाजपला मिळाल्या, तर 16 जागा काँग्रेस, सहा जागा राष्ट्रवादी आणि दोन अपक्षांसह सहा जागा शिवसेनेला मिळाल्या आहेत. आता भाजपच्या या गडाला सुरुंग लावण्यासाठी महाविकास आघाडीचे प्रयत्न सुरु झाले आहेत, अशी चर्चा सध्या सुरु आहे.

सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.