Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

शिवसेना नेते अशोक धोडी प्रकरणी मोठी अपडेट, ‘या’ कारणामुळे हत्या झाल्याचा संशय

पालघर पोलिसांनी बारा दिवसांनंतर बेपत्ता शिवसेना पदाधिकारी अशोक धोडींचा मृतदेह गुजरातमध्ये सापडला. याप्रकरणी चार आरोपींना अटक झाली असून, मुख्य आरोपीसह इतर काही फरार आहेत.

शिवसेना नेते अशोक धोडी प्रकरणी मोठी अपडेट, 'या' कारणामुळे हत्या झाल्याचा संशय
पदाधिकारी बेपत्ता
Follow us
| Updated on: Jan 31, 2025 | 10:32 PM

गेल्या बारा दिवसांपासून बेपत्ता असलेल्या शिवसेना पदाधिकारी अशोक धोडी यांचा शोध घेण्यात अखेर पालघर पोलिसांना यश आलं आहे. गुजरातमधील भिलाड पोलीस ठाणे अंतर्गत येणाऱ्या सरिग्राम येथील एका बंद दगड खाणीच्या पाण्यात 40 फूट खोल अशोक धोडी यांचा मृतदेह आढळून आला. तसेच त्यांची गाडीही आढळून आली. कौटुंबिक वाद आणि इतर वादातून त्यांच्या भावानेच काही साथीदारांसोबत घेऊन अशोक धोडी यांची हत्या केल्याचं उघड झालं आहे.

अखेर 12 दिवसांनी अशोक धोडींचा शोध घेण्यात यश

सोमवारी 20 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या अशोक धोडी यांचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले. अशोक धोडी हे मुंबईतून घरी परतत असताना त्यांच्या भावानेच त्यांचं अपहरण करून हत्या केल्याचं आता जवळपास निश्चित झालं आहे. विशेष म्हणजे मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी आरोपींनी थेट गुजरात गाठला. गुजरातच्या सरिग्राम येथील दगड खाणीत अशोक धोडी यांचा मृतदेह आणि गाडी थेट 40 फूट खोल पाण्यात ढकलली. अखेर 12 दिवसांनी पालघर पोलिसांना अशोक धोडींसह त्यांच्या गाडीचा शोध घेण्यात यश आलं आहे. तब्बल सात तासांच्या अथक प्रयत्नानंतर पालघर पोलिसांनी अशोक धोडी यांचा मृतदेह गाडीसह बाहेर काढला.

अशोक धोडी यांचा लहान भाऊ अविनाश धोडी यांनी कौटुंबिक वाद आणि इतर वादातून आपल्या सहकारी आरोपींसह अशोक धोडी यांचं अपहरण केले. त्यानंतर त्यांची हत्या केल्याचे बोललं जात आहे. आरोपी अविनाश धोडी हा दारू तस्करीचा अवैध धंदा करायचा. या धंद्यात अशोक धोडी हे अडचण ठरत असल्याने त्याने अशोक यांचं अपहरण केले. या प्रकरणात चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तर मुख्य आरोपी अविनाश धोडीसह इतर तीन आरोपी फरार आहेत. या फरार आरोपींचा पालघर पोलीस सध्या शोध घेत आहेत. त्यांचाही लवकरच शोध घेऊन अटक केलं जाईल, असा विश्वास पालघरचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी कुटुंबाला दिला.

आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी

अशोक धोडी यांचा मृतदेह शोधण्यात पालघर पोलिसांना यश आल्याने अशोक धोडी यांचा मुलगा आकाश धोडी यांनी पोलीस प्रशासनाच्या कामगिरीवर समाधान व्यक्त केलं आहे. मात्र माझ्या वडिलांचा जीव गेला, त्याप्रमाणे आरोपींना देखील फाशीची शिक्षा द्यावीस अशी मागणी त्याने केली आहे. तसेच आमच्या कुटुंबियांनाही आरोपीपासून धोका असल्याची भीती त्यांनी व्यक्त केली. तसेच मुख्य आरोपी अविनाश धोडी याला लवकरात लवकर अटक करून त्याला फाशीची शिक्षा करावी, अन्यथा आमच्या गावातील नागरिकांना देखील त्याच्यापासून धोका असल्याच देखील आकाश धोडी म्हणाला. अविनाश धोडी पोलिसांच्या ताब्यात असताना त्याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांची चौकशी करावी. तसेच त्याच्यावर कठोर कारवाई करावी अशी मागणी आकाश थोडी यांनी केली.

बेपत्ता अशोक धोडी यांचा शोध घेण्यात तब्बल 12 दिवसानंतर पालघर पोलिसांना यश आलं . मात्र अजूनही तीन ते चार आरोपी फरार आहेत. फरार आरोपींवर अनेक गुन्हे दाखल असून त्यांची तलासरीसह डहाणूच मोठी दहशत आहे. त्यामुळे पालघर पोलिसांनी आता या आरोपींच्या कायमच्या मुसक्या आवळण्याची गरज निर्माण झाली आहे.

सकारात्मक चर्चेची संधी होती, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा
सकारात्मक चर्चेची संधी होती, मुख्यमंत्र्यांचा विरोधकांवर निशाणा.
संतोष देशमुखांच्या 3 तासांच्या अमानुष मारहाणीचे 15 व्हिडिओ, 8 फोटो
संतोष देशमुखांच्या 3 तासांच्या अमानुष मारहाणीचे 15 व्हिडिओ, 8 फोटो.
वाल्मिक कराडचे धमकीचे फोन रेकॉर्ड आले समोर, अडचणी वाढणार
वाल्मिक कराडचे धमकीचे फोन रेकॉर्ड आले समोर, अडचणी वाढणार.
मुंबईत राजकीय पक्षाच्या कार्यालयात जंगी पार्टी..
मुंबईत राजकीय पक्षाच्या कार्यालयात जंगी पार्टी...
शिंदेच्या बालेकिल्ल्यात दोन्ही शिवसेना आमनेसामने; कार्यकर्ते आक्रमक
शिंदेच्या बालेकिल्ल्यात दोन्ही शिवसेना आमनेसामने; कार्यकर्ते आक्रमक.
एसटी महामंडळात यापुढे आयपीएस अधिकारी नेमणार; माधुरी मिसाळ यांचा निर्णय
एसटी महामंडळात यापुढे आयपीएस अधिकारी नेमणार; माधुरी मिसाळ यांचा निर्णय.
मंत्री रक्षा खडसे आणि आरोपी मोरेची ऑडिओ क्लिप व्हायरल
मंत्री रक्षा खडसे आणि आरोपी मोरेची ऑडिओ क्लिप व्हायरल.
पद नाही राज्य महत्वाचं; मविआचा चहापानावर बहिष्कारचा निर्णय
पद नाही राज्य महत्वाचं; मविआचा चहापानावर बहिष्कारचा निर्णय.
धक्कादायक! आधी चाकूचा धाक दाखवून बलात्कार, नंतर दागिने अन् घर लुटलं
धक्कादायक! आधी चाकूचा धाक दाखवून बलात्कार, नंतर दागिने अन् घर लुटलं.
कराडला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करा; देशमुख कुटुंबाची मागणी
कराडला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांची चौकशी करा; देशमुख कुटुंबाची मागणी.