शिवसेना नेते अशोक धोडी अपहरणप्रकरणी नवी अपडेट, पोलिसांची मोठी कारवाई
आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. अशोक धोडी अपहरण प्रकरणी 4 आरोपींना अटक कण्यात आली आहे. पालघरमधील घोलवड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

शिवसेनेचे डहाणू विधानसभा समन्वयक आणि माथाडी कामगार सेनेचे तलासरी तालुका अध्यक्ष अशोक धोडी यांच्या अपहरणाने राज्यभरात खळबळ उडाली आहे. सोमवारी 20 जानेवारी 2025 पासून अशोक धोडी हे फरार असून पोलीस त्यांचा शोध घेत आहे. आता याप्रकरणी एक मोठी अपडेट समोर येत आहे. अशोक धोडी अपहरण प्रकरणी 4 आरोपींना अटक कण्यात आली आहे. पालघरमधील घोलवड पोलिसांनी ही कारवाई केली आहे.
4 आरोपींना अटक
शिवसेना नेते अशोक धोडी यांच्या अपहरण प्रकरणी 4 आरोपींना अटक करण्यात आली आहे. आज चार आरोपींना डहाणू कोर्टात हजर करण्यात येणार आहे. घोलवड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. रवींद्र गुलाब मोरगा, संतोष रमेश धडगा, अतिष दुमाडा, विशाल गुमरा असे अपहरणाच्या गुन्ह्यात अटक केलेल्या 4 आरोपींची नाव आहेत. याप्रकरणी अशोक धोडी यांचा सख्खा भाऊ अविनाश धोडी हा मात्र फरार आहे.
चार आरोपींना न्यायालयात हजर केले जाणार
अशोक धोडी अपहरण प्रकरणी त्यांचा सख्खा धाकटा भाऊ अविनाश धोडीलाही ताब्यात घेण्यात आले होते. मात्र पोलीस चौकशीदरम्यान लघुशंकेचा बहाण करत अविनाश धोडी हा पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला. संशयित आरोपी अविनाश धोडी फरार झाल्याने पालघर पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून या चार आरोपींना संशयित म्हणून पोलिसांनी ताब्यात घेतले होते. यानंतर त्यांची कसून पोलीस चौकशी करण्यात आली. या चौकशीत ताब्यात घेतलेल्या चौघांचा याप्रकरणी सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. यानंतर चारही आरोपींना पोलिसांनी अटक केली. आज त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले.
शिवसेनेचे पदाधिकारी अशोक धोडी अपहरण प्रकरणी चार जणांना अटक करण्यात आली. तर पाच जण फरार असल्याचं सांगण्यात आले. अटक झालेल्या चार आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आलं असता, त्यांना सात दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या पालघर पोलीस याचा तपास करत आहेत.
8 पथकांकडून तपास सुरु
अशोक धोडी यांचे 20 जानेवारी रोजी त्यांच्या लाल रंगाच्या कारसह अपहरण झाले. या घटनेला 10 दिवस उलटले आहेत. तरी अद्याप धोडी किंवा त्यांची गाडी यातील काहीच पोलिसांना सापडलेले नाही. या प्रकरणाच्या तपासासाठी पालघर पोलीस वेगवेगळे 8 पथक तयार केले आहेत. सध्या या प्रकरणाचा तपास सुरु आहे.