मोदी आता मुंबईत काय विकायला येत आहेत ? संजय राऊत

पंतप्रधानांच्या याच दौऱ्यावर शिवसेना उबाठा गटाचे नेत आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. पंतप्रधान आज मुंबईला येत आहेत, पण ते का येत आहेत ? जमिनी शोधायला येत आहेत का, की अडाणी ला कोणती जमीन द्यायची आहे. कोणती जमीन शिल्लक आहे का वरून पाहणार आहेत का ?

मोदी आता मुंबईत काय विकायला येत आहेत ? संजय राऊत
संजय राऊतांचे टीकास्त्र
Follow us
| Updated on: Apr 01, 2024 | 12:43 PM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबई दौऱ्यावर आहत. RBI चा 90 वा वर्धापन दिन साजरा होत असून त्याच कार्यक्रमानिमित्त पंतप्रधान आज मुंबईत आहेत. पंतप्रधानांच्या याच दौऱ्यावर शिवसेना उबाठा गटाचे नेत आणि खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. पंतप्रधान आज मुंबईला येत आहेत, पण ते का येत आहेत ? जमिनी शोधायला येत आहेत का, की अदानीला कोणती जमीन द्यायची आहे. कोणती जमीन शिल्लक आहे का वरून पाहणार आहेत का ? असा बोचरा सवाल विचारत राऊत यांनी टीकास्त्र सोडले.

गेल्या काही वर्षात अमित शहा आणि नरेंद्र मोदी यांनी मुंबई विकली. गौतम अदानी, या त्यांच्या उद्योगपती मित्राला धारावी विकले. मुंबईचे भूखंड विकले, मुंबईचे उद्योग पळवले.आता मोदी दहा सभा घेऊन काय करणार ? आता त्यांना काय विकायचे आहे ? असा खोचक सवालही राऊत यांनी विचारला.

मोदींनी मुंबईत दहा नाही 100 सभा घ्याव्यात, पण मुंबईतून भाजप हा पूर्णपणे तडीपार करायचा असं मुंबईच्या जनतेने ठरवलंच आहे, असेही राऊत म्हणाले.

नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री होते, आता नाही..

नरेंद्र मोदी हे देशाचे प्रधानमंत्री होते आता नाही. निवडणुकीची घोषणा झाल्यावर राज्यात किंवा देशात किंवा राज्याचे मुख्यमंत्री हे फार तर कार्यवाहक मुख्यमंत्री असतात आणि देशाचे प्रधानमंत्री हे कार्यवाहक प्रधानमंत्री असतात. त्यामुळे सरकारी यंत्रणाचा वापर करून प्रचाराला जाता येत नाही. आणि जर ते सरकारी विमान आणि फौज फाटा घेऊन गेले, तर निवडणूक आयोगाने त्या संदर्भातला खर्चाचे बिल त्यांना पाठवायलं हवं आणि त्या पक्षाच्या खात्यातून ते पैसे वसून करायला हवेत, असे राऊत म्हणाले.

पंतप्रधानांकडून सरकारी यंत्रणेचा गैरवापर

नरेंद्र मोदी गेल्या काही दिवसापासून, निवडणुका जाहीर झाल्यापासून सरकारी यंत्रणा सरकारी विमानात सरकारी हेलिकॉप्टर घेऊन फिरत आहेत, घोषणा करत आहेत. त्यांचा एक एक दौरा हा 25 -25 कोटीचा असतो. आचारसंहिता ही केवळ विरोधी पक्षासाठी आहे का ? काँग्रेस साठी शिवसेनेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस साठी आहे .नोटीसा फक्त आम्हालाच देणार का ? असा सवाल राऊत यांनी विचारला.

प्रधानमंत्री ज्या पद्धतीने सरकारी यंत्रणेचा गैरवापर करत आहेत आणि सरकारी यंत्रणा घेऊन प्रचाराला उतरले आहेत, हा भ्रष्टाचार नाही का? मोदी हे आता कार्यवाहक प्रधानमंत्री आहेत. त्यांना अशा प्रकारे कोणत्याही घोषणा करण्याचा अधिकार नाही. सरकारी यंत्रणा वापरण्याचा अधिकार नाही. हा सर्वात मोठा भ्रष्टाचार आहे, अस आरोपही राऊत यांनी पंतप्रधान मोदींवर केला.

आशिष शेलारांवरही टीकास्त्र

ठाकरेंचा पेट्रोलचा खर्च मी करतो त्यांनी मालवणी भागात जावं, असं वक्तव्य भाजप नेते आशिष शेलार यांनी केलं होतं. त्यांच्या वक्तव्याचाही संजय राऊत यांनी समाचार घेतला. शेलार यांना काल माननीय उद्धव ठाकरे यांनी उत्तर दिल आहे.आम्ही त्यांच्यासाठी स्पेशल विमानाची व्यवस्था करतो,त्यांनी मणिपूरला जावं. तिकडे महिलांवर ती अत्याचार झाले आहेत ते पाहावे. कश्मीरी पंडितांचे हालहवाल समजून घेण्यासाठी त्यांना आम्ही जम्मू-काश्मीरला पाठवायला तयार आहोत .आमच्या खर्चाने त्यांनी जाऊन यावं, उगाच बकवास करू नये आणि तोंडाची वाफ घालवू नये अशी टीका संजय राऊत यांनी केली.

महाराष्ट्रात मविआच्या जागावाटपावर आता चर्चा होणार नाही !

महाराष्ट्रात जागावाटपावरची चर्चा बंद झाली पाहिजे. महाराष्ट्रात ही चर्चा आता बंद झाली आहे. चर्चा करायचीच असेल तर आगामी विधानसभा किंवा मग 2029 सालच्या लोकसभा निवडणुकीची आम्ही चर्चा करू, असं संजय राऊत यांनी स्पष्टपणे सांगितलं.

33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ
33 आमदारांनी कॅबिनेट तर 6 आमदारांनी घेतली राज्यमंत्रिपदाची शपथ.
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ
भरत गोगावले यांच्या 'कोट'ला अखेर मुहूर्त मिळाला, घेतली मंत्रिपदाची शपथ.
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात
आमदारकीचा चौकार,शिंदेंचा विश्वासू संजय शिरसाट महायुतीच्या मंत्रिमंडळात.
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ
चारवेळा आमदार अन् आता थेट मंत्री, जयकुमार गोरेंकडून मंत्रिपदाची शपथ.
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?
भाजपच्या पंकजा मुंडेंची मंत्रिपदासाठी वर्णी, कोणतं खातं मिळणार?.
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ
सलग 7 वेळा आमदार असलेल्या भाजपच्या गणेश नाईकांनी घेतली मंत्रिपदाची शपथ.
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?
नागपूरात शपथविधी, व्यासपीठावरील खूर्च्यांमध्ये 'ती' खूर्ची कोणासाठी?.
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी
मराठवाड्यात 6 आमदार होणार मंत्री, 6 पैकी 3 नव्या चेहऱ्यांना संधी.
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर
तानाजी सावंतांचा पत्ता कट? आज महायुतीचा शपथविधी अन 3 बडे नेते वेटिंगवर.
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर
बावनकुळेंनंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष म्हणून 'या' मंत्र्यांचं नाव समोर.