10 वर्षांनी देखील त्यांना मतांसाठी दारोदार भटकावं लागतंय, संजय राऊतांचा कोणावर निशाणा ?

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्रात येणार आहेत, प्रचाराला सुरूवात करणार आहेत. त्याच मुद्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कडाडून हल्ला चढवला. 'इथे येऊन ते काय पाहणार आहेत ? दहा वर्षांनी देखील त्यांना (भाजप) दारोदार भटकावं लागत आहे.

10 वर्षांनी देखील त्यांना मतांसाठी दारोदार भटकावं लागतंय,  संजय राऊतांचा कोणावर निशाणा ?
Follow us
| Updated on: Apr 08, 2024 | 11:17 AM

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आज महाराष्ट्रात येणार आहेत, प्रचाराला सुरूवात करणार आहेत. त्याच मुद्यावरून शिवसेना नेते संजय राऊत यांनी कडाडून हल्ला चढवला. ‘इथे येऊन ते काय पाहणार आहेत ? दहा वर्षांनी देखील त्यांना (भाजप) दारोदार भटकावं लागत आहे. मत मागण्यासाठी योगींना महाराष्ट्रात यावं लागत आहे. त्यांनी त्यांच्या राज्यात थांबावं, तिकडची परिस्थिती सांभाळावी. उत्तर प्रदेशमध्ये भाजपची स्थिती खूप गंभीर आहे, ‘अशी टीका राऊत यांनी केली.

पंतप्रधान मोदी तर सर्व सरकारी जामानिमा घेऊन, मत मागण्यासाठी जात आहेत. मात्र हे ‘कोड ऑफ कंडक्ट’चं उल्लंघन आहे. संपूर्ण सरकारी यंत्रणा, विमानं, हे सगळं घेऊन एका पक्षासाठी मतं मागणं हे योग्य नाही. त्यामुळे नियमांचं उल्लंघन होतं, हे पंतप्रधानांना माहीत हवं, अशी टीकाही त्यांनी केली.

महाविकास आघाडीत बिघाडी नाही

महाविकास आघाडीमध्ये सगळं काही आलबेल आहे. जे तिढे होते ते आता मिटले आहेत. त्यामुळे उद्या गुढी पाडव्याच्या शुभ दिनी आमची ११ वाजता शिवालाय येथे संयुक्त पत्रकार परिषद पार पडेल.त्यावेळी याला उद्धव ठाकरे, शरद पवार, नाना पटोले आदी नेते उपस्थिती असतील. आमच्यात बिघाडी काहीच नाही, असे सांगत उलट महायुतीतच अजून काही ठरलं नाही, ओढाताण सुरू आहे. शिंदे गटाच्या अनेकांची जागा गेली, अशी टीका राऊत यांनी केली. आम्ही पुढे कशाप्रकारे काम करणार याविषयी माहिती देऊ, असेही राऊत यांनी नमूद केले.

अमोल कीर्तीकरांची ईडी चौकशी

शिवसेना ठाकरे गटाचे नेते अमोल कीर्तीकर यांची ईडीकडून चौकशी करण्यात येणार आहे. खिचडी घोटाळा प्रकरणामध्ये नावआलेल्या कीर्तीकर यांना ईडी कार्यालयात हजर राहण्याचे समन्स बजावण्यात आले. आज त्यांची कसून चौकशी होणार आहे. कीर्तीकर यांना मुंबई उत्तर पश्चिम मधून लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. याप्रकरणी संजय राऊत यांना प्रश्न विचारण्यात आला. ‘ नरेंद्र मोदींनी ज्यांच्यावर टीका केली , ते अजित पवारांसारखे लोक सत्तेत गेले. त्यांना सरक्ष प्रवेश मिळाला. मग अमोल कीर्तीकरांचं काय बोलताय ? ज्यांची ईडीकडून किंवा इतर कोणत्याही यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे, ते निवडणुकीसाठी उमेदवार होऊ शकतात, ‘ असे ते म्हणाले

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.