भरसभेतून उद्धव ठाकरेंचं लोकसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य; म्हणाले, 4 तारखेला…

Shivsena UBT Leader Uddhav Thackeray on PM Narendra Modi and Loksabha Election 2024 : डोंबिवलीत उद्धव ठाकरे यांची आज सभा झाली. या सभेत उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य केलं आहे. उद्धव ठाकरे जाहीर सभेत नेमकं काय म्हणाले? वाचा सविस्तर...

भरसभेतून उद्धव ठाकरेंचं लोकसभा निवडणुकीच्या निकालावर भाष्य; म्हणाले, 4 तारखेला...
उद्धव ठाकरे
Follow us
| Updated on: May 16, 2024 | 8:15 PM

डोंबिवलीत उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा झाली. 4 तारखेला तुम्ही फक्त नरेंद्र मोदी असणार, त्यानंतर ते पंतप्रधान नसणार आहेत. 4 तारखेला डी – मोदी नेशन करणार आहेत. मोदींना सभा घेऊ द्या पंतप्रधान म्हणून तुमच्या शेवटच्या सभा आहेत. 4 तारखेला त्यांची सत्ता जाणार आहे. भाजपच काय होईल माहिती नाही. 75 वर्षे रिटायर्मेंटची आहेत. 2 वर्षांनी तुम्ही 75 वर्षांचे होणार नंतर भाजपचं काय होईल. देशात भाजपची 2 खासदार होती तेंव्हा शिवसेनेन साथ दिली. अस्सल भाजपच्या विचारांच्या लोकांना हे पटतंय का?, असा सवाल ठाकरेंनी केला आहे.

आमच्यावर बोलताना तुमचा तोल ढासाळतोय ते सांभाळा… बोलायचं म्हटलं तर मी पण श्याम प्रकाश मुखर्जींवर बोलू शकतो. पण त्याने लोकांचे मुद्दे सुटणार आहेत का? साधा लसूण 400 पार गेला आहे. यांच्या भुलथापा आता बस झाल्या. मला भाजपची काळजी आहे. 4 तारखेला नरेंद्र मोदी पंतप्रधान नसणार हे निश्चित आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

नरेंद्र मोदींवर टीका

भाजपची अनेक लोक सांगतात हे व्हायला नको म्हणून पण तुमच्या लोकांनी हे घडवलं. एका दिवशी नकली संतान म्हणायचं आणि दुसऱ्या दिवशी डोळा मारायचा. 10 वर्षे हा माणूस झोपलाच नाही. भाजपला सांगतो यांना झोपू द्या… गजनी सरकारच्या हातात सत्ता देणार का? मी अक्षय कुमारला सांगणार मोदींची मुलाखत घ्या आणि आंब्या बरोबरच टरबूज कसा खायचा विचारा, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारवर टीका केली आहे.

अमित शाहांना सवाल

आज अमित शाह कुठे तरी बोलले की गो हत्या करणाऱ्यांना उलट टांगू… मग 10 वर्षे काय तिरकं डांगलं होतं का? मणिपूरमध्ये मातेचं रक्षण का केलं नाही? सावरकरांचे गाई बद्दलचे विचार काय होते मोदींनी तपासावं टोपी घालणाऱ्याला आणि घालणाऱ्याला दोघांना सुध्दा डोक नव्हतं. मगाशी मी येत असताना आपली निशानी चोरून शिरचोरी करत होते. 4 तारखेपर्यंत थांबा पैशाच्या फुग्याला टाचणी मारतो. गद्दारा विरोधात निसटता विषय नकोय. असा गद्दार गाडा की कल्याण डोंबीवलीत तपुन्हा गद्दारी वर आली नाही पाहिजे, असं आवाहन उद्धव ठाकरेंनी डोंबिवलीत केलं.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.