अजित पवारांनी बासनात गुंडाळलेल्या ‘हायपरलूप’साठी एकनाथ शिंदे आग्रही

गहुंजे-ओझर्डे या मार्गावर हायपरलूप प्रकल्पासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर सादरीकरण झाले, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी दिली. Eknath Shinde Hyperloop Project

अजित पवारांनी बासनात गुंडाळलेल्या 'हायपरलूप'साठी एकनाथ शिंदे आग्रही
Follow us
| Updated on: Mar 04, 2020 | 3:54 PM

मुंबई : अवाढव्य खर्चामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गुंडाळलेला मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्प प्रत्यक्षात येण्याची चिन्हं आहेत. नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘हायपरलूप’ प्रकल्पासाठी सकारात्मकता दर्शवली आहे. त्यामुळे हायपरलूप प्रकल्पावरुन शिवसेना-राष्ट्रवादीत मतभेद असल्याचं बोललं जात आहे. (Eknath Shinde Hyperloop Project)

गहुंजे-ओझर्डे या मार्गावर हायपरलूप प्रकल्पासाठी चाचपणी सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासमोर त्यासंदर्भात सादरीकरण झाले, अशी माहिती एकनाथ शिंदे यांनी लेखी उत्तरात दिली. त्यामुळे हायपरलूपसाठी शिवसेना आग्रही असल्याचं दिसत आहे.

पुणे जिल्ह्यात मावळ तालुक्यात गहुंजे आणि ओझर्डे ही दोन गावं आहेत. दोन गावांमध्ये जवळपास 105 किलोमीटर अंतर आहे. रस्ते मार्गाने हे अंतर कापण्यासाठी दीड ते दोन तासांचा कालावधी लागतो. हायपरलूप तंत्रज्ञानामुळे बाराशे किलोमीटर प्रतितास वेगाने अंतर गाठता येऊ शकतं. या हिशोबाने गहुंजे ते ओझर्डे अंतर केवळ पाच ते दहा मिनिटांत कापता येऊ शकतं.

हायपरलूप या महागड्या प्रकल्पापेक्षा शेतकऱ्यांची कर्जमाफी या घडीला महत्त्वाची आहे, असं मत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीच व्यक्त केलं होतं. तर, हा प्रकल्प जगात कुठेही झाला नाही. आधी जगात हा प्रकल्प होऊ द्या. पुणे-मुंबई मार्गासाठी आपल्यावर प्रयोग कशाला? हा प्रकल्प राज्याला परवडणारा नाही असं मत उपमुख्यमंत्री अजित पवारांनी व्यक्त केलं होतं.

काहीच दिवसांपूर्वी ‘व्हर्जिन’ समूहाचे मालक रिचर्ड ब्रॅन्सन यांनी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासमोर नवा प्रस्ताव ठेवला होता. राजधानी दिल्ली आणि आर्थिक राजधानी मुंबई यांना जोडणारा हायपरलूप ट्रान्सपोर्ट प्रकल्प सुरु करण्याची गळ ब्रॅन्सन यांनी घातली होती. मुंबई-पुणे मार्गावरील ‘व्हर्जिन’ कंपनीच्या प्रस्तावित हायपरलूप प्रकल्पाचं कामकाज बंद करण्याचा निर्णय ठाकरे सरकारने घेतल्यानंतर ब्रॅन्सन यांनी पर्यायी मार्ग सुचवला होता.

हायपरलूप म्हणजे नेमकं काय?

‘टेस्ला’ आणि ‘स्पेसएक्स’च्या एलन मस्क यांनी हायपरलूप वाहतूक तंत्रज्ञानाची 2013 मध्ये जगाला प्रथम ओळख करुन दिली. हायपरलूप वाहतूक व्यवस्थेसाठी कमी दाबाचा चॅनेल किंवा बोगदा तयार करायचा. अगदी कमी हवेच्या घर्षणासह खास डिझाइन केलेल्या ‘पॉड’मधून (ट्रेनसदृश) वाहतूक करायची. हे पॉड चाकांवर नव्हे तर हवेवर धावतील.

हायपरलूप व्यवस्था निर्माण करणं वाटतं तितकंही सोपं नाही. त्यामुळे अद्याप कोणत्याच शहराला यश मिळालेलं नाही. अबुधाबी आणि चीनमधील गिझाऊ प्रांताने ‘एचटीटी’ कंपनीची या प्रकल्पासाठी निवड केली आहे. यूएसमध्ये सॅन फ्रान्सिस्कोमधील हायपरलूप प्रकल्प मंद गतीने सुरु आहे.

Eknath Shinde Hyperloop Project

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.