धनुष्यबाण हटवला, बंडाचा इशारा, एकनाथ शिंदे यांना बडया नेत्याची नाराजी भोवणार?

तानाजी सावंत यांनी आजाराचे कारण देत तडकाफडकी पुण्याला निघून गेले. त्यातच आता तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षरित्या बंडाचा इशारा दिला आहे.  

धनुष्यबाण हटवला, बंडाचा इशारा, एकनाथ शिंदे यांना बडया नेत्याची नाराजी भोवणार?
एकनाथ शिंदे
Follow us
| Updated on: Dec 17, 2024 | 10:07 AM

राज्यातील सत्तास्थापनेनंतर दोन दिवसांपूर्वी महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पार पडला. यावेळी महायुतीच्या 39 नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. यात 33 कॅबिनेट मंत्री तर 6 राज्य मंत्र्यांचा समावेश आहे. यात भाजपचे 19, शिवसेनेचे 11 आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या 9 जणांचा समावेश आहे. मंत्रिमंडळ विस्तारानंतर कालपासून विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात झाली आहे. त्यापूर्वी महायुतीत नाराजीनाट्य सुरु झाले आहे. मंत्रिपद न मिळाल्याने भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेतील अनेक नेते हे नाराज झाले आहेत. या नाराज व्यक्तींमध्ये शिवसेनेच्या तानाजी सावंत यांचाही समावेश आहे. आता तानाजी सावंत यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे.

शिवसेना नेते आणि माजी मंत्री तानाजी सावंत यांना मंत्रिमंडळातून वगळण्यात आले आहे. त्यांना यंदाच्या मंत्रिमंडळात स्थान न मिळाल्याने ते नाराज झाले आहेत. तानाजी सावंत यांनी आजाराचे कारण देत तडकाफडकी पुण्याला निघून गेले. त्यातच आता तानाजी सावंत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना अप्रत्यक्षरित्या बंडाचा इशारा दिला आहे.

धनुष्यबाणाचे चिन्हं हटवलं

तानाजी शिंदे यांनी त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर मोठा बदल केला आहे. नाराज असलेल्या तानाजी सावंत यांनी काही तासांपूर्वी त्यांचे फेसबुक प्रोफाईल बदलले आहे. तसेच त्यांनी कव्हर इमेजही बदलली आहे. त्यात त्यांनी धनुष्यबाणाचे चिन्हं हटवलं आहे. विशेष म्हणजे धनुष्यबाण हटवत त्यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो ठेवला आहे. त्यावर शिवसैनिक असे नमूद केले आहे.

तानाजी सावंत यांच्या फेसबुकमधील बदल

tanaji sawant facebook

तानाजी सावंत यांच्या फेसबुकमध्ये बदल

तानाजी सावंतांकडून निवेदन

तानाजी सावंत यांनी त्यांच्या सर्वच सोशल मीडिया अकाऊंटवर हा बदल केला आहे. त्यांच्या या बदलानंतर तानाजी सावंत यांनी अप्रत्यक्षरित्या बंडाचाच इशारा दिल्याचे बोललं जात आहे. यामुळे सध्या सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. त्यातच तानाजी सावंत यांच्या कार्यालयाने एक निवेदन जारी केले आहे. “तानाजी सावंत हे नाराज असल्याच्या बातम्या आपल्या माध्यमातून वाचायला आणि पाहायला मिळत आहेत. त्यावरून सातत्याने सावंत साहेबांशी प्रतिक्रिया आणि बाईटसाठी विचारणा केली जात आहे. आम्ही आपल्याला कळवू इच्छितो की, सावंत साहेबांना ज्यादिवशी या सगळ्याबाबत बोलायचे आहे, त्यादिवशी आपल्या सगळ्यांशी निश्चितपणे संपर्क साधला जाईल. तोपर्यंत कृपया कुणीही बाईटसाठी पाठपुरावा करू नये, ही विनंती,” अशी माहिती त्यांच्या कार्यालयाकडून देण्यात आली आहे.

एकनाथ शिंदे यांच्या डोकेदुखीत वाढ

तानाजी सावंत हे मंत्रिपद न मिळाल्याने नाराज झाले आहेत. त्यातच त्यांनी हा बदल केल्याने ते काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे. तानाजी सावंत हे नागपूरमध्ये सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये सहभागी होणार नाहीत. तानाजी सावंत यांच्या नाराजी नाट्यामुळे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोकेदुखीत आणखी वाढ झाली आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.