Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

‘भाजप हा भरकटलेला पक्ष, सत्ता हाच धंदा, अमाप पैसा, 5 हजार कोटी रुपये…’ जहरी टीका कुणाची?

भाजप हा भरकटलेला पक्ष आहे. सत्ता हा त्यांचा धंदा आहे. अमाप पैसा असलेला भाजप पक्ष आहे . आतापर्यंत दाखवलेले 5 हजार कोटी पैसे वेगळे, त्यापेक्षाही 10 पटीने पैसे त्यांच्याकडे आहेत, असा आरोप करण्यात आलाय.

'भाजप हा भरकटलेला पक्ष, सत्ता हाच धंदा, अमाप पैसा, 5 हजार कोटी रुपये...' जहरी टीका कुणाची?
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 15, 2023 | 2:06 PM

विवेक गावंडे, अकोला: केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्या मुंबई दौऱ्यावरून राजकारण चांगलंच तापलंय. राज्यात एकिकडे महाविकास आघाडीच्या (Mahavikas Aghadi) वज्रमूठ सभेची जोरदार तयारी सुरु आहे. तर दुसरीकडे मुंबई महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या गोटातील हालचाली वाढल्या आहेत. अमित शाह यांच्या आजच्या मुंबई दौऱ्यात बीएमसी निवडणुकीसाठी मोठी रणनीती आखली जाण्याची शक्यता आहे. उद्धव ठाकरेंसाठी हे मोठं आव्हान ठरू शकतं. मात्र अमित शाह यांच्या दौऱ्यावरून खासदार अरविंद सावंत यांनी टीका केली आहे. ते म्हणाले, ‘ भाजप हा भरकटलेला पक्ष आहे. सत्ता हा त्यांचा धंदा आहे. अमाप पैसा असलेला भाजप पक्ष आहे . आतापर्यंत दाखवलेले 5 हजार कोटी पैसे वेगळे, त्यापेक्षाही 10 पटीने पैसे त्यांच्याकडे आहेत, असा आरोप अरविंद सावंत यांनी केलाय. अकोल्यात ते टीव्ही ९ प्रतिनिधींशी बोलत होते.

निवडणूक घेण्याची हिंमत नाही..

अमित शाह यांच्या दौऱ्यावरून बोलताना अरविंद सावंत म्हणाले, ‘ भाजपकडे अमाप पैसा आहे. या जोरावरच निवडणुकीमध्ये ते गैरप्रकार करतात. मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घ्यायची हिम्मत अजूनही त्यांची झाली नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधान आणि या संविधानानुसार होत असलेल्या निवडणुका मात्र मुंबई महानगरपालिका दीड वर्षापासून निवडणुका झालेल्या नाहीत. त्यामुळे कितीही दौरे केले तरी फरक पडणार नाही, असं वक्तव्य अरविंद सावंत यांनी केलंय.

सावरकर प्रेम ढोंगी..

वीर सावरकर यांचा अपमान करणाऱ्या राहुल गांधी यांनी माफी मागितल्याशिवाय त्यांना महाराष्ट्रात येऊ देणार नाही, असं वक्तव्य चंद्रशेखर बावनकुळे यांनी केलंय. यावरून अरविंद सावंत यांनी भाजपवरच आगपाखड केली आहे. ते म्हणाले, ‘ भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना आता स्फुरण आले. ज्यावेळेस कर्नाटकचे मुख्यमंत्री यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला. महाराष्ट्राचे तत्कालीन महामहीम राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी शिवरायांचा अपमान केला. त्यावेळी दातखिळी कुठे बसली होती? महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांचा अपमान केला.. हे भाजपचे ढोंगी लोक आहेत. भाजपचे सावरकरांबद्दलच प्रेमसुद्धा ढोंगी आहे. सावरकरांना भारतरत्न देण्यापासून कोणी रोखले? लोकांच्या सगळं लक्षात राहतं. जनता जशासतसं उत्तर देईल.

बाजार समिती निवडणूक

राज्यातील बाजार समितीच्या निवडणुका महाविकास आघाडी एकत्र लढणार आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी प्रेरणादायी शब्द दिला वज्रमुठ आणि ही वज्रमुठ पुढे घेऊनच बाजार समिती निवडणुकीला आम्ही सामोरं जाणार आहोत, असं वक्तव्य सावंत यांनी केलंय.

पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड
पुण्यातील सिंघम स्टाईल पोलीस ऑफिसर, 'पाटलां'नी गुंडाची काढली थेट धिंड.
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला...
गुंडाची दहशत, केकवर चक्क गुन्ह्यांची कलमं, बर्थ डे सेलिब्रेशनला....
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट...
'कचरा समजतो, नंतर येऊन हा काड्या...', दानवेंवर खैरे भडकले, आता थेट....
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?
हलगर्जीपणामुळे बीड जिल्हा रुग्णालयात गर्भवतीचा मृत्यू, नेमकं काय घडलं?.
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या
कराडला धनंजय मुंडेच संपवणार, तृप्ती देसाईंचा दावा, नेमकं काय म्हणाल्या.
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'
फडणवीस गप्प का? सामनातील प्रश्नावर भाजपचं उत्तर, 'सत्तेत यायचंय पण...'.
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप
मुंडेंचे सर्व काळे कारनामे..,पोलीस अधिकाऱ्याच्या ऑफरवरून शर्मांचा आरोप.
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट
कार्यक्रमपत्रिकेत नाव, पण शिंदे आणि अजितदादांचे भाषण कट.
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा
कराडचा एन्काऊंट अन् कोट्यावधींची ऑफर? निलंबित पोलीस अधिकाऱ्यांचा दावा.
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा
वाल्मिक कराडच्या एन्काउंटरच्या सुपारीबाबत खरं असू शकतं - करुणा शर्मा.