ओमराजे निंबाळकरांवर हल्ला करणारा आरोपी जेलमधून फरार, पोलिसांकडून शोध सुरु

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्ला करणारा आरोपी जेलमधून फरार झाला (Shivsena MP Omraje Nimbalkar knife attack accused Absconding) आहे.

ओमराजे निंबाळकरांवर हल्ला करणारा आरोपी जेलमधून फरार, पोलिसांकडून शोध सुरु
शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूने खुनी हल्ला करण्यात आला आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब इथे ही धक्कादायक घटना घडली.
Follow us
| Updated on: Aug 17, 2020 | 8:59 PM

उस्मानाबाद : शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्ला करणारा आरोपी जेलमधून फरार झाला आहे. अजिंक्य टेकाळे असे या आरोपीचे नाव आहे. तो उस्मानाबादच्या जेलमधून फरार झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या वेळी ओमराजे निंबाळकर यांच्यावर हल्ला झाला होता. (Shivsena MP Omraje Nimbalkar knife attack accused Absconding)

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर 16 ऑक्टोबर 2019 रोजी उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब येथे हल्ला झाला होता. त्यानंतर आरोपी अजिंक्य टेकाळे याला अटक करण्यात आली होती. गेल्या 10 महिन्यांपासून तो जेलमध्ये होता. सध्या कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे उस्मानाबाद शहरातील तांबरी विभागात तात्पुरते कारगृह उभारण्यात आले आहे. त्यात आरोपी अजिंक्य टेकाळे याला ठेवण्यात आले होते.

वैद्यकीय तपासणीसाठी त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले होते. त्या ठिकाणाहून जेलमध्ये परतल्यानंतर तो पोलिसांच्या हातावर तुरी देऊन पसार झाला. सध्या पोलीस त्याचा शोध सुरु आहे.

ओमराजेंवर चाकूहल्ला

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूने खुनी हल्ला झाला. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब इथं बुधवारी 16 ऑक्टोबरला ही धक्कादायक घटना घडली. या हल्ल्यात ओम राजे यांच्या हातावर वार झाल्याने ते जखमी झाले आहेत. चक्क खासदारावर हल्ला झाल्याने उस्मानाबादसह राज्यभरात एकच खळबळ उडाली.

खासदार ओमराजे निंबाळकर हे शिवसेना उमेदवार कैलास पाटील यांच्या प्रचारासाठी आले होते. ओमराजे प्रचार सभास्थळी पोहोचून गाडीतून उतरले. तेव्हा त्यांच्याजवळ एक तरुण आला आणि त्याने निंबाळकरांच्या हातात हात दिला आणि दुसऱ्या हाताने त्याने चाकू काढत निंबाळकरांच्या पोटावर वार करण्याचा प्रयत्न केला.हल्लेखोराने पोटात चाकू खुपसण्याचा प्रयत्न केला. मात्र ओमराजेंनी हात अडवा धरल्यामुळे हातावर चाकूचा वार झाला. (Shivsena MP Omraje Nimbalkar knife attack accused Absconding)

संबंधित बातम्या : 

शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर यांच्यावर चाकूहल्ला

पोटात खुपसण्यासाठी हल्लेखोराने चाकू उगारला, शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकरांवर तीन वार 

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.