Sanjay Raut : निवडणूक आयोगावर बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली; म्हणाले, आयोग चू…

| Updated on: Dec 26, 2024 | 11:26 AM

संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर खालच्या भाषेत टीका केली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले, मात्र त्यावेळी त्यांची जीभ घसरल्याचं दिसून आलं

Sanjay Raut : निवडणूक आयोगावर बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली; म्हणाले, आयोग चू...
निवडणूक आयोगावर बोलताना संजय राऊत यांची जीभ घसरली
Follow us on

कितीही मोठा गुन्हेगार असला तरी खपवून घेतलं जाणार नाही, असं तुम्ही म्हणायचा ना. मग करा कारवाई . हे काय तुमचे जावई आहेत का ? धनंजय मुंडेंनी बीडमध्ये बंदुकीच्या जोरावर 118 मतदान केंद्रावर मतदान होऊ दिलं नाही. परळीत मतदान होऊ दिलं जात नव्हतं, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला. मतदान होऊ दिलं जात नव्हतं हे निवडणूक आयोगाला दिसत नव्हतं का? च्युता आयोग आहे हा असे म्हणत संजय राऊतांनी निवडणूक आयोगावर खालच्या भाषेत टीका केली. माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी निवडणूक आयोगावर ताशेरे ओढले, मात्र त्यावेळी त्यांची जीभ घसरली. संजय राऊत यांच्या या विधानाचे आता काय पडसाद उमटतात याकडे अनेकांचे लक्ष लागलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत ?

कितीही मोठा गुन्हेगार असला तरी खपवून घेतलं जाणार नाही, असं तुम्ही म्हणायचा ना. मग करा कारवाई . हे काय तुमचे जावई आहे का. बंदुकीच्या जोरावर धनंजय मुंडेंनी बीडमध्ये 118 मतदान केंद्रावर मतदान होऊ दिलं नाही, यालाच अर्बन नक्षलवाद म्हणतात फडणवीस. मतदान रोखलं जातं ते अर्बन नक्षलवादच आहे. परळीत मतदान होऊ दिलं नाही. तुम्ही अर्बन नक्षलवाद्याचे कमांडर आहात. तुम्ही नेते आहात. अर्बन नक्षलवाद कुणी पोसला असेल तर तो फडणवीस आणि भाजपने, असा आरोप संजय राऊत यांनी केला. परळीत मतदान होऊ दिलं जात नव्हतं. हे निवडणूक आयोगाला दिसत नव्हतं का. च्युता आयोग आहे हा . आता त्यांना दिसत नाही का. फक्त आमच्यावर कारवाई होत आहे, असा आरोप संतप्त राऊतांनी केला,

बीड हत्याप्रकरणावरूनही राऊतांनी भाजपावर गंभीर आरोप केले आहेत. बीडमधील अर्बन नक्षलवाद्यांना भाजपा – RSSचं संरक्षण आहे का ? असा सवाल राऊतांनी विचारला. बीड हत्याप्रकरणातील गुन्हेगारांचा सूत्रधार मंत्रीमंडळात असल्याचा आरोप राऊतांनी केला. धनंजय मुंडेचा राजीनामा घ्या, अजित पवारांचाही राजीनामा घ्यावा अशी मागणी राऊतांनी केली.

बीडमधील शस्त्र परवाने तत्काळ रद्द करा

आम्हाला अर्बन नक्षलावादी म्हणता. बीडमध्ये कोण आहे. ३८ हत्या करणारा सूत्रधार मंत्री तुमच्या मतदारसंघात आहे. कोठेवाडीला कशासाठी पर्यटन करत होता. तुम्ही या आधी पर्यटनच केली. तुम्ही विरोधी पक्षावर दबाव आणू नका. विरोधी पक्षाने संतोष देशमुख आणि सूर्यवंशीच्या खुनाला वाचा फोडली नसती तर फडणवीस तुमच्या गृहखात्याने हा गुन्हा पचवला असता. तात्काळ बीडमधील शस्त्र परवाने रद्द करा, अशी मागणी संजय राऊत यांनी केली.

बीडच्या परळीतच 1500 शस्त्र आहेत. सात ते आठ हजार बेकायदा शस्त्र आहेत. ते नेपाळमधून आले आहेत. या शस्त्राचा वापर करून फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात असलेले त्यांच्या टोळ्या दहशत माजवत आहे. राष्ट्रपती राजवट लागू करण्यासाठी कल्याण, बीड फिट केस आहे. घटनेत तरतूद नाही. पण परिस्थिती तशी आहे. राज्याची प्रतिमा मलिन होत आहे. फडणवीस यांना कळलं पाहिजे. ३८ पेक्षा जास्त लाडक्या बहिणीचं कुंकू हत्या करून पुसलं गेलं. हे फडणवीस यांना माहीत नाही का? बाकी त्यांना सर्व माहीत आहे. आमचे फोन टॅप करतात. त्यांनी बीडमध्ये वेषांतर करून फिरावं

फडणवीस आणि अजितदादांचा धनंजय मुंडे यांना आशीर्वाद आहे. मुंडे यांनी नैतिकतेच्या मुद्द्यावर राजीनामा घेतला पाहिजे. फडणवीस यांनी धनंजय मुंडेंचा राजीनामा नैतिकतेने घेतला पाहिजे. नैतिकतेच्या मुद्द्यावर त्यांनी अजित पवार यांचाही राजीनामा घ्यावा अशी मागणी राऊत यांनी केली.