“भाजपने महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली”, संजय राऊतांचा घणाघात, म्हणाले “फडणवीसांच्या हातात सत्ता गेल्यापासून…”

महाराष्ट्राला विचारांची आणि राजकारणाची संस्कृती आणि संस्कार आहेत. हे सर्व बिघडवण्याचे काम भाजपने केले आहे, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.

भाजपने महाराष्ट्राची राजकीय संस्कृती बिघडवली, संजय राऊतांचा घणाघात, म्हणाले फडणवीसांच्या हातात सत्ता गेल्यापासून...
Follow us
| Updated on: Oct 27, 2024 | 4:22 PM

Sanjay Raut On Devendra Fadnavis : “राजकारणात वैयक्तीक शत्रूत्व असू नये. मात्र, भाजपने राजकारणात वैयक्तीक शत्रूत्वाला सुरुवात केली. देवेंद्र फडणवीस हे आमचे राजकीय शत्रू आहेत. आम्ही त्यांच्याकडे वैयक्तीक शत्रू म्हणून पाहत नाही”, असे विधान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केले. भाजपच्या हातात सत्ता गेल्यानंतर दिल्लीत नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता गेल्यानंतर कौटुंबिक स्तरापर्यंत शत्रूत्व करण्याचे राजकारण सुरू झाले, असा आरोपही संजय राऊतांनी यावेळी केला.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीस, भाजपसह वांद्र्यात झालेल्या चेंगराचेंगरीच्या दुर्घटनेवर भाष्य केले. तसेच यावेळी त्यांनी भाजपवर जोरदार टीकाही केली. महाराष्ट्राला विचारांची आणि राजकारणाची संस्कृती आणि संस्कार आहेत. हे सर्व बिघडवण्याचे काम भाजपने केले आहे, असा हल्लाबोल संजय राऊतांनी केला.

“भाजपने राजकारणात वैयक्तिक शत्रूत्वाला सुरुवात केली”

राजकारणात वैयक्तिक शत्रूत्व असू नये. मात्र, भाजपने राजकारणात वैयक्तिक शत्रूत्वाला सुरुवात केली. राजकारणात विचारांची लढाई विचारांनी व्हावी, हा महाराष्ट्राचा संस्कार आणि संस्कृती आहे. राजकारणात भूमिकांवर, विकास कामांवर चर्चा व्हावी. वैयक्तीक हेवेदावे, शत्रूत्व राजकारणात असून नये, ही महाराष्ट्राची संस्कृती आहे. हा संस्कार यशवंतराव चव्हाणांपासून, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे, शरद पवार यांच्यापर्यंत कायम होता. मात्र, भाजपच्या हातात सत्ता गेल्यानंतर दिल्लीत नरेंद्र मोदी, अमित शहा आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या हातात सत्ता गेल्यानंतर कौटुंबिक स्तरापर्यंत शत्रूत्व करण्याचे राजकारण सुरू झाले, असा आरोप संजय राऊतांनी केला.

राजकीय वैर राजकारणातच ठेवले पाहिजे, ती विचारांची लढाई आहे. त्यात वैयक्तिक शत्रूत्व आणू नये, कोणचेही कुटुंब उद्ध्वस्त करू नये, असे माझं मत आहे. मात्र, दुर्दैवाने भाजप हे सर्व करत आहे. फडणवीस आमचे राजकीय शत्रू आहेत. आम्ही त्यांच्याकडे वैयक्तिक शत्रू म्हणून पाहत नाही, असे संजय राऊत म्हणाले

“रामदास आठवले बंगल्यात राहतात, पण समाजाचे हाल होतात”

“दलित, शोषित आणि वंचित सामाजाचे नेतृत्व करणारे नेते दुर्दैवाने फक्त स्वतःचा विचार करतात. मात्र, समाजाला काय मिळाले, याचा विचार कोणीही करत नाही. सत्ताधाऱ्यांचे गुलाम म्हणून त्यांनी समजाला बांधून ठेवले. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाचे रक्षण करण्याच्या नावाखाली त्यांनी समाजाला लढत ठेवले. रामदास आठवले यांना काही मिळाले नाही, असे म्हणता येणार नाही. ते अनेक वर्षे मंत्री आहेत. ते चांगल्या बंगल्यात राहतात. समाजाचे मात्र हाल होत आहेत. मात्र, आता हे सर्व जनतेला समजले असून जनता आता महाविकास आघाडीसोबत आहे”, असा विश्वास संजय राऊतांनी व्यक्त केला.

Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.