शिंदे की ठाकरे; शिवाजी पार्कात दसरा मेळावा कोणाचा? राऊत काय म्हणाले…

ठाकरे गटाचे शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांनी दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवाजी पार्कातील मैदान मिळावे, यासाठी परवानगी अर्ज केला आहे. मात्र अद्याप यावर पालिका प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

शिंदे की ठाकरे; शिवाजी पार्कात दसरा मेळावा कोणाचा? राऊत काय म्हणाले...
Follow us
| Updated on: Sep 30, 2024 | 10:53 AM

Sanjay Raut on Dussehra Melava : आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या पारंपारिक दसरा मेळाव्याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. शिवसेनेत फूट पडण्याआधी दादरच्या शिवाजी पार्कात भव्य दिव्य दसरा मेळावा पार पडत होता. मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेनेत ठाकरे गट आणि शिंदे गट असे दोन गट पडले आहेत. त्यामुळे यंदा शिवाजी पार्कमध्ये कुणाचा दसरा मेळावा रंगणार, याची चर्चा सुरु झाली आहे. याच मुद्द्यावरुन शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी शिंदे गटाच्या दसरा मेळाव्याबद्दल भाष्य केले. शिंदे गटाने मुंबईत दसरा मेळावा घेऊ नये, त्यांच्या दसरा मेळाव्याची जागा सूरतला आहे, कारण तिथे त्यांच्या शिवसेनेचा जन्म झाला आहे, असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

संजय राऊत काय म्हणाले?

एकनाथ शिंदेंनी मुंबईत दसरा मेळावा घेऊ नये. तुमची दसरा मेळाव्याची जागा सूरतला आहे, जिथे यांच्या शिवसेनेचा जन्म झाला आहे. शिंदेंच्या शिवसेनेला दोन-अडीच वर्ष झाली आहेत. त्यामुळे यांना दसरा मेळावा घेण्यासाठी दोन जागा आहेत जिथे ते दसरा मेळावा आयोजित करु शकतात. यातील पहिलं ठिकाण म्हणजे सूरत आणि दुसरं म्हणजे गुवाहाटी. कामाख्या मंदिराच्या समोर किंवा ज्या हॉटेलमध्ये ते थांबले होते, तिकडे ते दसरा मेळावा घेऊ शकतात. सूरत हे सर्वात चांगला पर्याय आहे, कारण त्यांच्या पक्षाचा जन्म सूरत मध्ये झाला आहे, अशा शब्दात संजय राऊत यांनी शिंदे गटावर निशाणा साधला.

ठाकरे गटाकडून तीन महिन्यांपूर्वी अर्ज

दरम्यान शिवसेनेसाठी दसरा मेळावा हा अत्यंत प्रतिष्ठेचा मानला जातो. येत्या 12 ऑक्टोबर रोजी दसरा असून यासाठी अवघे काही दिवस शिल्लक आहेत. मुंबईतील दादर परिसरात असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज उद्यान म्हणजेच शिवाजी पार्क या ठिकाणी दरवर्षी शिवसेनेचा दसरा मेळावा रंगतो. ठाकरे गटाचे शिवसेनेचे विभागप्रमुख महेश सावंत यांनी दसरा मेळावा आयोजित करण्यासाठी शिवाजी पार्कातील मैदान मिळावे, यासाठी परवानगी अर्ज केला आहे. मात्र अद्याप यावर पालिका प्रशासनाने कोणताही निर्णय घेतलेला नाही.

त्यामुळे यंदा दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर शिवसेनेच्या दोन गटांपैकी कोणाला सभा घेण्यास परवानगी मिळणार याबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे. ठाकरे गटाकडून तीन महिन्यांपूर्वीच याबद्दलचा परवानगी अर्ज दाखल करण्यात आला आहे. गेल्यावर्षी २०२३ च्या दसरा मेळाव्यालाही शिवसेनेच्या दोन्ही गटांनी अर्ज दिले होते. तेव्हाही ठाकरे गटाने पालिका प्रशासनाला स्मरणपत्र दिले होते. तसेच विभाग कार्यालयावर मोर्चाही काढला होता. हा वाद टोकाला पोहोचल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आमदार सदा सरवणकर यांनी शिवाजी पार्क मैदानासाठी केलेला अर्ज मागे घेतला होता. गेल्यावर्षी शिंदे यांच्या शिवसेनेचा मेळावा आझाद मैदानावर झाला होता. यंदा मात्र शिंदे यांच्या शिवसेनेने अद्याप अर्ज दाखल केलेला नाही, अशी माहिती समोर येत आहे.

'शासनाच्या भरोशावर राहू नका, शासन विषकन्या असते'; गडकरी काय म्हणाले?
'शासनाच्या भरोशावर राहू नका, शासन विषकन्या असते'; गडकरी काय म्हणाले?.
'हिंदू अंत करतील, वाकड्या नजरेनं...', नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य
'हिंदू अंत करतील, वाकड्या नजरेनं...', नितेश राणेंचं वादग्रस्त वक्तव्य.
पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा...दानवेंची सरकारवर टीका
पाहिल्याची बाही दुसऱ्याच्या शर्टाला, दुसऱ्याचा...दानवेंची सरकारवर टीका.
सरकारच्या योजनांमुळे सरकारची तिजोरी संकटात? वित्तविभागाला फुटला घाम?
सरकारच्या योजनांमुळे सरकारची तिजोरी संकटात? वित्तविभागाला फुटला घाम?.
एन्काऊंटर स्टोरीत प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानं ट्विस्ट, ऑडिओमध्ये काय?
एन्काऊंटर स्टोरीत प्रत्यक्षदर्शीच्या दाव्यानं ट्विस्ट, ऑडिओमध्ये काय?.
मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत; सर्जा, सोन्या नामंकित बैल जोड्यांचा थरार
मराठवाडा केसरी बैलगाडा शर्यत; सर्जा, सोन्या नामंकित बैल जोड्यांचा थरार.
ठाकरेंनी भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, कोणी लगावला खोचक टोला?
ठाकरेंनी भेंडीबाजारमध्ये दसरा मेळावा घ्यावा, कोणी लगावला खोचक टोला?.
'तर पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का?' शिंदे नेमकं काय म्हणाले?
'तर पोलीस काय शोपीस म्हणून बंदूक दाखवतील का?' शिंदे नेमकं काय म्हणाले?.
जंगलात टाका, नदीत फेका, अक्षयच्या दफनविधीस विरोध; खोदलेला खड्डा बुजवला
जंगलात टाका, नदीत फेका, अक्षयच्या दफनविधीस विरोध; खोदलेला खड्डा बुजवला.
'तेव्हा राणे आणि राज यांना जीवे मारण्याच्या धमक्या ठाकरेंनी दिलेल्या'
'तेव्हा राणे आणि राज यांना जीवे मारण्याच्या धमक्या ठाकरेंनी दिलेल्या'.