काल स्वबळाचा नारा, आज बॅकफूटवर?; संजय राऊत यांची सारवासारव काय?

"मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या महापालिका आम्ही स्वबळावर लढू", अशी मोठी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काल केली होती. यानंतर आता संजय राऊत बॅकफूटवर आले आहेत.

काल स्वबळाचा नारा, आज बॅकफूटवर?; संजय राऊत यांची सारवासारव काय?
sanjay raut
Follow us
| Updated on: Jan 12, 2025 | 2:40 PM

Sanjay Raut On Municipality Election : ठाकरे गटाकडून आगामी महापालिकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या महापालिका आम्ही स्वबळावर लढू, अशी मोठी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी काल केली होती. यानंतर आता संजय राऊत बॅकफूटवर आले आहेत. आता नुकतंच संजय राऊत यांनी सारवासारव करत स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णयावर पुन्हा भाष्य केले आहे.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी काँग्रेसकडून होत असलेल्या टीकेवर भाष्य केले. संजय राऊत शिवसेनेचा नेता आहे हे जर काँग्रेसच्या नेत्यांना समजले नसेल तर मग पाहावं लागेल, अशा शब्दात त्यांनी काँग्रेसवर टीका केली.

“काँग्रेसच्या नेत्यांनी माझं वक्तव्य नीट ऐकावं”

“संजय राऊत शिवसेनेचा नेता आहे, हे जर काँग्रेसच्या नेत्यांना समजले नसेल तर मग पाहावं लागेल. उद्धव ठाकरे पक्षाचे प्रमुख आहेत, ते सर्वांशी बोलतात. शाखाप्रमुख विभागप्रमुख या सर्वांशी ते बोलतात. दुसरी गोष्ट काँग्रेसच्या नेत्यांनी माझं वक्तव्य नीट ऐकलं पाहिजे. त्यांनी ऐकण्याचीही सवय ठेवावी. ऐकण्याची सवय ही आयुष्यात फार चांगली असते”, असा टोला संजय राऊतांनी लगावला.

मी फक्त इतकंच सांगितलं की लोकसभेसाठी इंडिया आघाडी बनवली. विधानसभेसाठी महाविकास आघाडी बनवली. आता स्थानिक संस्थांच्या निवडणुका आहेत. ती कार्यकर्त्यांची निवडणूक असते. त्यामुळे सर्व कार्यकर्त्यांची भावना आहे की आम्ही वेगळं लढावं, असे संजय राऊत म्हणाले.

“बूथ लेव्हलला काम करण्य़ाची आम्हाला गरज”

“लोकसभा आणि विधानसभा वेगळी निवडणूक आहे. स्थानिक निवडणुकांमध्ये वेगळं लढलं तर आमची ताकद वाढेल. आम्ही म्हणालो नाही, महाविकास आघाडी तुटली. त्यामुळे कुणाला मिरची लागण्याची गरज नाही. भाजपसोबत असताना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका वेगळ्या लढलो होतो. बूथ लेव्हलला काम करण्य़ाची आम्हाला गरज आहे. तसेच पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी आम्हाला वेळ द्यायचा आहे. आम्ही जर वेगळे लढलो, तर आमच्या पक्षाचे जे चिन्ह आहे, ते जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचल. अजूनही लोक या निवडणूक चिन्हाबद्दल संभ्रमात आहेत. ग्रामपंचायत, नगरपंचायत, जिल्हापरिषद, महानगरपालिका या निवडणुकांमधून जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याची संधी मिळते. या साधारण सर्वच पक्षांचा निर्णय असतो”, असेही संजय राऊतांनी म्हटले.

संजय राऊत काय म्हणाले होते?

“मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल. एकदा आम्हाला पाहायचंच आहे. नागपूरलाही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिले आहेत. आताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता असं आमचं ठरतंय की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल… कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभेत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला किंबहुना पक्षाच्या वाढीला बसतो. महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीत स्वबळावर लढून आपपले पक्ष मजबूत करावेत”, असे संजय राऊत म्हणाले होते.

'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 आरोपींवर मकोका, पण मकोका म्हणजे नेमकं काय?.
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?
वायदा अन् सत्ता आल्यानंतर युटर्न, फडणवीसांचा 'तो' वादा दादा विसरले?.
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल
मंत्री धनंजय मुंडेंवर गुन्हा का नाही? खंडणीप्रकरणात सुरेश धसांचा सवाल.
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?
एका गुन्ह्यात अटक अन् कराडचे अनेक गुन्हे उघड, 140 शेतकऱ्यांना चुना?.
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!
बीड सरपंच हत्या प्रकरणात 8 जणांवर मकोको पण वाल्मिक कराडच सुटला!.
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड
संक्रांतीनिमित्ताने येवल्यात पैठणी खरेदीसाठी महिलांची झुंबड.
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले
गृहमंत्री आहेत का झोपलेत ? भरसभेत फोटो दाखवत मनोज जरांगे संतापले.