चंद्रचूड यांच्यावर खटला भरला पाहिजे, संजय राऊत यांची मागणी; मोदींच्या भाषणाचीही चिरफाड

चंद्रचूड यांच्यावर खटला दाखल करायला हवा. ज्या पद्धतीने मोदी हे राज्य चालवतात ते संविधानाच्या विरोधात आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली. 

चंद्रचूड यांच्यावर खटला भरला पाहिजे, संजय राऊत यांची मागणी; मोदींच्या भाषणाचीही चिरफाड
संजय राऊत सरन्यायधीश चंद्रचूड
Follow us
| Updated on: Dec 15, 2024 | 11:10 AM

Sanjay Raut On PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दबावाखाली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निर्णय दिला नाही. हे संविधानात बसतं का? चंद्रचूड यांच्यावर खटला दाखल करायला हवा. ज्या पद्धतीने मोदी हे राज्य चालवतात ते संविधानाच्या विरोधात आहे, अशा शब्दात शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली.

संजय राऊत यांनी नुकतंच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली. तसेच नरेंद्र मोदी यांनी संसदेत केलेल्या भाषणावरही राऊतांनी संताप व्यक्त केला. यावेळी संजय राऊतांनी महाराष्ट्रातील आमदार अपात्रेबद्दलच्या निकालावरही भाष्य केले.

“मुख्यमंत्र्‍यांना तुरुंगात टाकणं हे कोणत्या संविधानाच्या कलमात लिहिलंय”

“विधानसभा असेल लोकसभा असेल विरोधीपक्षच राहू नये, विरोधी पक्षाला लोकशाहीत, संसदीय राजकारणात अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. विरोधीपक्ष राहू नये. तपास यंत्रणांचा गैरवापर करुन विरोधी पक्षाच्या मागे चौकशीचा ससेमिरा लावावा. त्यांना तुरुंगात टाकावं. विद्यमान मुख्यमंत्र्‍यांना तुरुंगात टाकणं हे कोणत्या संविधानाच्या कलमात लिहिलं आहे”, असा सवाल संजय राऊतांनी उपस्थितीत केला.

“सिंचन घोटाळा करणारे मोदींच्या मांडीवर बसलेत”

“भाजपमधील सर्व लोक काय धुतलेल्या तांदळाचे आहेत का? ईडी, सीबीआय कधी भाजपच्या घरी गेली हे दाखवावं. उलट ज्यांच्याकडे गेली होती, ते आज मोदींच्या मांडीवर बसलेत आणि मोदी त्यांना दूध पाजतात. ७० हजारांचा सिंचन घोटाळा करणाऱ्यांवर आधी मोदींनी आरोप केला आणि नंतर त्यांच्याच उपस्थितीत त्यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हे संविधानातल्या कोणत्या कलमात लिहिलेलं आहे”, असे संजय राऊतांनी म्हटले.

“चंद्रचूड यांच्यावर खटला दाखल करायला हवा”

“ज्या पद्धतीने आमदार फोडले, ते सर्व दहाव्या शेड्युलनुसार अपात्र ठरायला हवेत. नरेंद्र मोदींच्या दबावाखाली सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश चंद्रचूड यांनी निर्णय दिला नाही. हे संविधानात बसतं का? चंद्रचूड यांच्यावर खटला दाखल करायला हवा. ज्या पद्धतीने मोदी हे राज्य चालवतात ते संविधानाच्या विरोधात आहे. संविधान हा देशाचा आधार आहे. तो आधार मोदींनी उद्धवस्त केलेला आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.

“असत्यचा विजय करण्याचे काम मोदी काळात झाले”

“पंतप्रधान मोदी हे गेल्या ६५ वर्षात भारताला लाभलेले असत्य बोलणारे पतंप्रधान आहेत. आमच्या संविधानाचा सत्यमेव जयते असा नारा आहे. पण गेल्या १० वर्षात असत्यचा विजय करण्याचे काम मोदी काळात झालेले आहे. मोदींचा नवीन संविधानकर्ता हा गौतम अदानी आहे. गौतम अदाणींना विरोध करणारे संविधानद्रोही आहे हे मोदींना सांगायचे”, असेही संजय राऊतांनी म्हटले.

धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही
धाकधूक कायम... शपथविधीला काही तास अन् भाजपच्या मंत्र्याना फोन नाही.
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?
दादांकडून मंत्रिपदासाठी या आमदारांना फोन, राष्ट्रवादीतून कोणाची वर्णी?.
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?
1991 नंतर पहिल्यांदाच नागपूरात शपथविधी,त्यावेळी 'नागपूर'च का निवडलं?.
'मोदींचं भाषण बोअर...गणिताच्या तासाची आठवण', काँग्रेस खासदाराचा टोला
'मोदींचं भाषण बोअर...गणिताच्या तासाची आठवण', काँग्रेस खासदाराचा टोला.
दादर स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून 'गदा'रोळ, राजकीय वातावरण तापलं
दादर स्थानकाजवळील हनुमान मंदिरावरून 'गदा'रोळ, राजकीय वातावरण तापलं.
आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?
आज महायुती सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार, कोणाला संधी अन् कोणाला डच्चू?.
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच..
मंत्रिमंडळ विस्ताराचं पत्र राज्यपालांना देणार, १९९१ नंतर पहिल्यांदाच...
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'
श्रीकांत शिंदेंचा राहुल गांधींना संसदेत थेट सवाल, 'तुमच्या आजी...'.
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्...
फडणवीसांच्या 'सागर'वर घडतंय काय? शपथविधीआधीच मनसेचा नेता भेटीला अन्....
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्...
घाटकोपर पूर्व द्रुतगती मार्गावर भीषण अपघात, क्रेन कोसळली अन्....