“निवडणूक आयोगातच घोटाळा, राजीव कुमार निवृत्त झाल्यावर मोदी त्यांना…” संजय राऊतांचा घणाघात
ज्यांना लोकशाहीचे रक्षण करायचे आहे ते चाचेगिरी करत आहेत. राज्याचे निवडणूक आयोग ईव्हीएममध्ये घोटाळा नाही असे म्हणते. याचा अर्थ निवडणूक आयोगातच घोटाळा आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी घणाघात केला.
Sanjay Raut On EVM : राज्याचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. यावेळी त्यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकांनंतर ईव्हीएमवर झालेल्या आरोपांवर भाष्य केले आहे. ईव्हीएम कधीही हॅक होऊ शकत नाही. ईव्हीएम छेडछाडचा आरोप निराधार आहे. ईव्हीएममध्ये वायरस किंवा बग नाही. ईव्हीएम फूलप्रूफ डिवाईस आहे, अशी माहिती राज्याचे निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी दिली. आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टीका केली आहे. “राज्याचे निवडणूक आयोग ईव्हीएममध्ये घोटाळा नाही असे म्हणते. याचा अर्थ निवडणूक आयोगातच घोटाळा आहे. संपूर्ण जगाने ईव्हीएम नाकारले आहे. मग हे शहाणे आहेत का?” असा सवाल संजय राऊतांनी केला आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी केलेल्या विधानावर त्यांनी भाष्य केले. भाजपने या देशातील लोकशाही हायजॅक केली आहे. ज्यांना लोकशाहीचे रक्षण करायचे आहे ते चाचेगिरी करत आहेत. राज्याचे निवडणूक आयोग ईव्हीएममध्ये घोटाळा नाही असे म्हणते. याचा अर्थ निवडणूक आयोगातच घोटाळा आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी घणाघात केला.
भाजपकडून देशातील लोकशाही हायजॅक
“महाराष्ट्रामध्ये निवडणूक आणि ईव्हीएममध्येही घोटाळा झाला आहे. निवडणूक आयोगाने मरकडवाडीला येऊन बसावे. त्या ठिकाणची जनता स्वखर्चाने बॅलेट पेपरने मतदान घेणार होती. तेच गाव, तेच मतदान.. मग बॅलेट पेपर आणि ईव्हीएमधील तफावत निवडणूक आयोगाला दिसली असती. पण भाजपने या देशातील लोकशाही हायजॅक केली आहे. ज्यांना लोकशाहीचे रक्षण करायचे आहे ते चाचेगिरी करत आहेत. राज्याचे निवडणूक आयोग ईव्हीएममध्ये घोटाळा नाही असे म्हणते. याचा अर्थ निवडणूक आयोगातच घोटाळा आहे. संपूर्ण जगाने ईव्हीएम नाकारले आहे. मग हे शहाणे आहेत का?” असा सवाल संजय राऊतांनी केला.
“निवडणूक आयोग सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर”
“राजीव कुमार निवृत्त झाल्यावर मोदी, शहा त्यांना राज्यपाल किंवा राजदूत असे एखादे बक्षीस देतील. सध्या हेच सुरू असून सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालयातील न्यायाधीश, घटनात्मक पदावरील व्यक्तीकडून हवी ती कामे करून घ्यायची आणि मग त्या बदल्यात निवृत्तीनंतर बक्षीसं द्यायची. महाराष्ट्र, हरियाणाप्रमाणे दिल्लीतली मतदार यादीत घोटाळा होत आहे. निवडणूक आयोग यावर काहीच बोलत नाही. हजारोंच्या संख्येने नावं वगळायची, नवीन नावं घुसवायची आणि त्यांच्याकडून मतदान करून घ्यायचे. गेल्या काही काळापासून हे वारंवार सुरू आहे. निवडणूक आयोग हे सत्ताधाऱ्यांच्या ताटाखालचे मांजर झाले आहे”, अशा शब्दात संजय राऊतांनी टीका केली.
“वन नेशन, वन इलेक्शनला आमचा विरोध”
“वन नेशन, वन इलेक्शन संदर्भात जेपीसीची बैठक होत आहे. या बैठकीला शिवसेनेकडून खासदार अनिल देसाई उपस्थित राहतील आणि ते आपली भूमिका मांडतील. वन नेशन, वन इलेक्शनला आमचा विरोध असून हे लोकशाही, संविधानविरोधी आहे. हे हुकुमशाहूकडे नेणारे बील आहे”, असेही संजय राऊत म्हणाले.