RSSने ठरवलं तर मोदींचं सरकार 15 मिनिटंही सत्तेत राहणार नाही – संजय राऊत

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पडद्यामागे राहू नये, प्रवचन न झोडता या देशाच्या जनतेला दिशा द्यावी. RSSने ठरवलं तर मोदींचं सरकार 15 मिनिटंही सत्तेत राहू शकणार नाही, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर तसेच मोदींवर टीकास्त्र सोडलं.

RSSने ठरवलं तर मोदींचं सरकार 15 मिनिटंही सत्तेत राहणार नाही - संजय राऊत
संजय राऊतImage Credit source: ANI
Follow us
| Updated on: Jun 14, 2024 | 11:03 AM

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने पडद्यामागे राहू नये, प्रवचन न झोडता या देशाच्या जनतेला दिशा द्यावी. RSSने ठरवलं तर मोदींचं सरकार 15 मिनिटंही सत्तेत राहू शकणार नाही, असे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले. माध्यमांशी बोलताना त्यांनी भाजपवर तसेच मोदींवर टीकास्त्र सोडलं. भाजपचं सध्याचं जे मोदींचं सरकार आहे ते अहंकारी सरकार आहे. त्याला सुरुंग लावण्याचं काम जर त्यांची मातृसंस्था ( आरएसएस) करत असेल तर ते राष्ट्रीय कर्तव्य पार पाडत आहेत, असं मी मानतो, असंही राऊत म्हणाले.

काय म्हणाले संजय राऊत ?

लोकसेवकाला अहंकार नसावा, असं काल सरसंघचालक मोहन भागवतही म्हणाले. पण गेल्या 10 वर्षांत या देशात फक्त अहंकार, इर्षा, बदल्याचं राजकारण हेच पहायला मिळालं. सत्तेचा गैरवापर झाला. आणि या सगळ्या गोष्टी भाजपची मातृसंस्था असलेली आरएसएस पहात होती. 10 वर्षांत आपल्या सगळ्यांनाच आरएसएसकडून खूप अपेक्षा होत्या, की संघाचे प्रमुख लोक हे निर्भयपणे समोर येतील आणि या बदल्याचे राजकारण, अहंकाराच्या राजकारणाला रोखण्याचा प्रयत्न करतील, असे देशातील जनतेची, विरोधकांची अपेक्षा होती. पण तसं काहीच झालं नाही.

जेव्हा १९७५ साली आणीबाणी घोषित झाली तेव्हा तत्कालीन सरसंघचलाकांनी त्या आणीबाणीचा विरोध केला होता. या देशाची लोकशाही वाचवण्यासाठी संघाच्या काही लोकांनी अमूल्य योगदान दिले, त्यासाठी ते तुरूंगातही गेले. पण गेल्या १० वर्षांत अतिशय विरुद्ध परिस्थिती पहायला मिळाली. मात्र अहंकाराचे हे राजकारण जनतेने रोखलं आहे. येत्या काळात आरएसएसची भूमिका राहील आणि सत्तेवर जे अहंकारी नेते बसले आहेत, त्यांना तुम्ही लौकरच सत्तेवरून दूर करण्याचा प्रयत्न कराल, असा आम्हाला विश्वास आहे, अशा शब्दात राऊत यांनी सुनावले.

अण्णा हलले, अण्णा बोलले , मी अभिनंदन करतो

अण्णा हजारे जागे झाले त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. राळेगणसिद्धीमध्ये अजित पवारांविरोधात हालचाल सुरू झाली. अण्णा हलले, अण्णा बोलले या बद्दल मी त्यांचे आभार मानतो आणि अभिनंदन करतो. पण या महाराष्ट्रात फक्त शिखर बँक घोटाळा झालेला नाही. गेल्या १० वर्षांत राज्यात आणि देशात घोटाळेच घोटाळे झाले आहेत. घोटाळ्यांचा पाऊस सुरू झाला आहे. अण्णांनी त्या इतर घोटाळ्यांविरोधातही आवाज उठवला पाहिजे, अशी मागणी राऊत यांनी केली.

ही बातमी अपडेट होत आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.