मनोज जरांगे यांनी माघार घेताच ठाकरे गटाची सर्वात आधी प्रतिक्रिया; संजय राऊत यांच्याकडून त्या गोष्टीचा उल्लेख

मराठा आंदोलनक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे. मागच्या अनेक दिवसांपासून उमेदवारांच्या निवडीसाठी खल सुरु होता. पण आता मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

मनोज जरांगे यांनी माघार घेताच ठाकरे गटाची सर्वात आधी प्रतिक्रिया; संजय राऊत यांच्याकडून त्या गोष्टीचा उल्लेख
मनोज जरांगे यांनी माघार घेताच ठाकरे गटाची प्रतिक्रिया
Follow us
| Updated on: Nov 04, 2024 | 11:37 AM

मराठा आंदोलनक मनोज जरांगे पाटील यांनी विधानसभा निवडणूक न लढवण्याचा निर्णय जाहीर केला आहे.  गेल्या अनेक दिवसांपासून उमेदवारांच्या निवडीसाठी खल सुरु होता. पण आता मनोज जरांगे पाटील यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे. त्यांच्या या निर्णयावर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सर्वात आधी प्रतिक्रिया दिली आहे. ‘  जरांगेचा संघर्ष समाजासाठी आहे. समाज त्यांच्या पाठिशी आहे. त्यांच्या लढ्याला आमचा पाठिंबा आहे’ असं संजय राऊत म्हणालेत.

मनोज जरांगे पाटील यांचा सातत्याने महाराष्ट्रात जो संघर्ष सुरू आहे, तो त्यांच्या समाजाच्या विकासासाठी, उद्धारासाठी आहे. आणि त्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची बाजी लावली, हे मान्य केलं पाहिजे. समाज त्यांच्या पाठिशी एकसंघपणे उभा आहे. निवडणुकीसंदर्भात काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे.  त्यांचा जो लढा आहे तो राजकीय नव्हे , सामाजिक आहे अस आम्ही मानतो. ती एक सामाजिक चळवळ आहे. त्यामुळे जरांगे यांनी काय आणि कशी भूमिका घ्यावी, याचं मार्गदर्शन आम्ही करणार नाही. त्यांच्या लढ्याला आमच्या कायम शुभेच्छा आणि पाठबळ असेल, असं राऊत म्हणाले.

एकाच जातीवर निवडणूक लढवणं शक्य नाही

मुस्लीम आणि दलित समाजाच्या प्रतिनिधींकडून यादी न आल्याने आपण लढणार नाही, असं जरांगे यांनी सांगितलं. आमच्या मित्र पक्षाची आणखी यादी आली नाही. लढायचं जमेल का? यादीच नाही म्हणल्यावर… एका जातीवर कस निवडून यायचं, त्यामुळे नाईलाज आहे. यादी न आल्यामुळे नाईलाजाने एका जातीवर जिंकणे शक्य नाही त्यामुळे थांबून घेतलेलं बरं राहीन, असं मनोज जरांगे म्हणाले होते.

23 तारखेला अणुबॉम्ब फुटू दे

विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराला दणक्यात सुरूवात झाली आहे. येत्या 23 तारखेला ॲटम बॉम्ब फुटेल असं वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणालेत. त्यावर संजय राऊत यांनी चोख प्रत्युत्तर दिलं. 23 तारखेला ॲटम बॉम्ब कशाला पाहिजे अणू बॉम्ब फुटू दे ना ! पाद्रे पावटे काय फोडणार अजून ?

पाद्रे वापटे आजूबाजूला दुर्गंधी निर्माण करतात, तशी महाराष्ट्रात अडीच वर्षांपासून सुरूच आहे. ॲटम बॉम्ब फुटेल म्हणजे काय करणार ? अजून काय करणार ?  नरेंद्र मोदी काय त्यांच्या गटात प्रवेश करणार आहेत का ? स्वप्न पहायला 50 खोके लागत नाहीत, असा खोचक टोला राऊत यांनी लगावला.

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.