मुख्यमंत्री म्हणाले – युतीची चर्चा सकारात्मक, पण शिवसेनेचं म्हणणं काय?
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर समाधानी नसल्याची सूत्रांची माहिती आहे. युतीचं बंड थंड करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांचं निवासस्थान ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. या बैठकीत युतीच्या जागांबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असली तरी शिवसेना जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर समाधानी नाही. शिवसेनेची […]
मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकीत शिवसेना जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर समाधानी नसल्याची सूत्रांची माहिती आहे. युतीचं बंड थंड करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची त्यांचं निवासस्थान ‘मातोश्री’वर जाऊन भेट घेतली. या बैठकीत युतीच्या जागांबाबत सकारात्मक चर्चा झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली असली तरी शिवसेना जागावाटपाच्या फॉर्म्युल्यावर समाधानी नाही.
शिवसेनेची भूमिका ताठर असल्यामुळे युतीतील परिस्थिती जैसे थे आहे. मुख्यमंत्री आणि उद्धव ठाकरे यांच्या बैठकीतील तपशील भाजपाध्यक्ष अमित शाह यांच्यासमोर ठेवला जाणार आहे. या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी बारामती दौराही रद्द केला. मुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार एकाच व्यासपीठावर येणार होते.
मुख्यमंत्री काय म्हणाले?