“मराठी भाषा महानच, तुमची भीक आणि मेहरबानी…”, संजय राऊतांनी खडसावले

आता यावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याच्या निर्णयावर भाष्य केले.

मराठी भाषा महानच, तुमची भीक आणि मेहरबानी..., संजय राऊतांनी खडसावले
संजय राऊत
Follow us
| Updated on: Oct 04, 2024 | 10:27 AM

Sanjay Raut On Marathi language : केंद्र सरकारने मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा महत्वाचा निर्णय जाहीर केला आहे. मराठीसह बंगाली, असामी, पाली आणि प्राकृत भाषेलाही अभिजात भाषेचा दर्जा देण्याचा निर्णय केंद्र सरकारने जाहीर केला आहे. यामुळे देशासह जगभरातील मराठी भाषिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. आता यावर ठाकरे गटाची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा दिल्याच्या निर्णयावर भाष्य केले.

संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळाल्यावरुन प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी सविस्तर भाषेत उत्तर दिले. मराठी भाषा महानच आहे. याचे श्रेय कुणीही घेऊ नये, असे संजय राऊत म्हणाले.

सध्याच्या गृहमंत्र्यांकडून देखील नकार घंटा दिल्या

“गेले 15 ते 20 वर्ष आम्ही सगळे महाराष्ट्रातील, शिवसेना तर आहेच पण महाराष्ट्रातले मराठी खासदार असतील किंवा आतापर्यंत आलेले सरकार असेल यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा म्हणून सातत्याने प्रयत्न केले होते. यासाठी पाठपुरावा केला होता. प्रत्येक मुख्यमंत्र्‍यांनी याबद्दल आतापर्यंत प्रस्ताव पाठवले होते. मराठी भाषेचा शेकडो वर्षापासूनच योगदान देशाच्या संस्कृतीमध्ये याविषयी पुरावे दिले होते. आम्हाला अनेकदा नकार घंटा ऐकायला मिळाल्या. सध्याच्या गृहमंत्र्यांकडून देखील नकार घंटा ऐकायला मिळाल्या होत्या”, असे संजय राऊत म्हणाले.

मराठी भाषेच्या विकासासाठी केंद्राकडून आपल्याला पाठबळ

“मागच्या सरकारच्या काळात तरीही जेव्हा जेव्हा संसदेचा सत्र सुरू होतं, प्रत्येक सत्रामध्ये महाराष्ट्रातले खासदार हे अभिजात भाषेचा संदर्भातली मागणी करत राहिले. संबंधित मंत्र्यांना भेटत राहिले. अखेर काल ही घोषणा झाली. मराठी भाषेसह अन्य चार भाषांना सुद्धा दर्जा दिला आहे. त्याबद्दल आम्ही आनंद व्यक्त केला आणि या निर्णयाचा स्वागत केलं. बऱ्याच कालखंडापासून आमची सर्वांची एक मागणी होती ती पूर्ण झाली ही आनंदाची गोष्ट आहे. त्याच्यामुळे मराठी भाषेला राष्ट्रीय स्तरावर अनेक विद्यापीठातून आपला स्वतःचा स्थान करता येईल. अनेक गोष्टी आहेत. मराठी भाषेच्या विकासासाठी केंद्राकडून आपल्याला पाठबळ मिळेल”, असेही संजय राऊतांनी सांगितले.

“अर्थात मराठी भाषा ही छत्रपती शिवाजी महाराज यांचे भाषण आहे, ज्ञानेश्वरांची भाषा आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे भाषण आहे, बाळासाहेब ठाकरे यांचे भाषण आहे, महात्मा फुले यांचे भाषण आहे आणि या भाषेला दर्जा दिलेला आहे. त्यामुळे या भाषेची प्रतिष्ठा आणि सन्मान नक्कीच वाढला आहे”, असे संजय राऊतांनी म्हटले.

“नक्कीच आम्ही आज आनंदी आहे”

“मराठी माणसाला भाषेला प्रतिष्ठा मिळाली पण मराठी माणसाला प्रतिष्ठा देण्याचा काम बाळासाहेब ठाकरे यांनी केलं. बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्राला मराठी माणसाला, मराठी भाषेला प्रतिष्ठा मिळवून दिली. कारण एकेकाळी ही भाषा हमालची घाट्यांची भाषा म्हणून हिणवली जात होती. बाळासाहेबांनी या भाषेला प्रतिष्ठा दिली हे सुद्धा आपल्याला विसरता येणार नाही. ज्याप्रमाणे मराठी भाषेला सरकारी पातळीवर प्रतिष्ठा प्राप्त करून दिली, त्याच पद्धतीने माझं आवाहन आहे की केंद्र सरकारला शिवसेनेचे मराठी माणसाचा रोजगार जो पळून नेतात अन्य राज्यात कृपा करून थांबवा आणि मराठी भाषेबरोबर मराठी माणसाचा हक्काचा रोजगारसुद्धा महाराष्ट्रात मिळू द्या.

त्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी 55 वर्षापूर्वी आंदोलन उभा केला होता, फक्त भाषेला प्रतिष्ठा मिळाली, माणसाला प्रतिष्ठा मिळाली पाहिजे, इथे भाषा बोलली जाते. त्या महाराष्ट्राचे लूट करून भाषेला प्रतिष्ठा देणे ही तितकी गंभीर बाब आहे. भाषेला प्रतिष्ठान माणसाला प्रतिष्ठान राज्याला प्रतिष्ठा ज्या प्रकारे महाराष्ट्राची बदनामी देशात सुरू आहे, गद्दारी पाहता बेईमानी पाहता या राज्यातील फक्त भाषेला दर्जा देऊन हा कलंक पुसला जाणार नाही, पण नक्कीच आम्ही आज आनंदी आहेत”, असेही संजय राऊतांनी म्हटले.

“तुमची भीक आणि मेहरबानीची गरज नाही”

याप्रकरणी श्रेयवादाची लढाई नक्कीच होणार हे मी कालच सांगितलं होतं. पण कोणीही याचे श्रेय घेण्याचा प्रयत्न करु नये. श्रेय उपटण्याचे प्रकार सुरू होतील. या निर्णयात प्रत्येकाचे योगदान आहे. पण आता फक्त आहे निवडणुका आहेत. महाराष्ट्राचा रोष आपल्यावर आहे. लोकसभेत दारुण पराभव झालेला आहे. महाराष्ट्रात त्याची भरपाई करण्यासाठी जर तुम्ही हे केले असेल तर आम्हाला तुमची भीक आणि मेहरबानीची गरज नाही, मराठी भाषा ही महानच आहे.

लोकसभेत आम्हाला हरवला म्हणून तुम्हाला हा मराठी भाषेच्या अभिजात दर्जा देत असेल असा जर कोणाला वाटत असेल ही मेहरबानी आहे. तर या मेहरबानीची मराठी भाषेला गरज नाही ही शुराची भाषा, मर्दांची भाषा, शयराची भाषा आहे. ही संतांची भाषा आहे आणि महाराष्ट्रात ही सगळी परंपरा शौर्यांची आणि संतांची फार महान आहे, अशा शब्दात संजय राऊतांनी खडसावलं

हर्षवर्धन पाटलांचं ठरलं, भाजपला राम-राम करून 'तुतारी' हाती घेणार
हर्षवर्धन पाटलांचं ठरलं, भाजपला राम-राम करून 'तुतारी' हाती घेणार.
सदावर्ते ठाकरेंच्या विरोधात लढणार? बिगबॉसच्या घरातून आव्हान देणार?
सदावर्ते ठाकरेंच्या विरोधात लढणार? बिगबॉसच्या घरातून आव्हान देणार?.
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच
'आसूरांचा संहार करण्यासाठी मशाल हाती घे', ठाकरेंचं नवं मशाल गीत लाँच.
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?
दोन रोहित अन् एकच मंच... दोघांची तुफान बॅटिंग, बघा काय म्हणाला हिटमॅन?.
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा
घराणेशाही नष्ट करण्यासाठी 'तो यतोय', सिंधुदुर्गातील त्या बॅनरची चर्चा.
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'
सदावर्ते बिग बॉसमध्ये दिसणार, डंके की चोट पर म्हणाले, 'आगे आगे देखो..'.
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ
माहूर गडावर नवरात्रौत्सवाला सुरुवात,रेणुकेच्या दर्शनासाठी भक्तांची रिघ.
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी
अंबाबाईला तोफेची सलामी अन् नवरात्रोत्सवाला सुरूवात, भाविकांची गर्दी.
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ
नवरात्रीच्या पहिल्या दिवशी सप्तश्रृंगी गडावर दर्शनासाठी भाविकांची रिघ.
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्...
भिडेंचं वादग्रस्त वक्तव्य, महामूर्ख हिंदू, गणेशोत्सवाचा चोथा अन्....