36 तासांपासून गायब आमदार कुठे होता? मध्यरात्री काय घडलं? सर्वात मोठी अपडेट काय?

मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा घरी येऊन आपल्या पत्नीशी चर्चा करून पुन्हा आपल्या नातेवाईकांकडे गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे.

36 तासांपासून गायब आमदार कुठे होता? मध्यरात्री काय घडलं? सर्वात मोठी अपडेट काय?
Follow us
| Updated on: Oct 30, 2024 | 1:17 PM

 Shrinivas Vanga Meet Family At Night : महायुतीतून तिकीट नाकारल्याने नाराज झालेले पालघर विधानसभा मतदारसंघाचे शिंदे गटाचे विद्यमान आमदार श्रीनिवास वनगा हे नॉट रिचेबल झाले होते. पण आता अखेर 36 तासांनी श्रीनिवास वनगांचा कुटुंबियांशी संपर्क झाल्याची माहिती समोर आली आहे. मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा घरी येऊन आपल्या पत्नीशी चर्चा करून पुन्हा आपल्या नातेवाईकांकडे गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे. सध्या श्रीनिवास वनगा हे बोलण्याच्या मानसिकतेत नाहीत. त्यामुळे आम्हाला थोडा वेळ द्यावा, अशी विनंती त्यांची पत्नी सुमन यांनी केली आहे.

श्रीनिवास वनगा हे गायब झाल्यापासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. यानंतर काल मध्यरात्री तीनच्या सुमारास श्रीनिवास वनगा हे घरी परतले. त्यांनी आपल्या पत्नीशी चर्चा केली. यानंतर ते पुन्हा नातेवाईकांकडे निघून गेले. यावेळी श्रीनिवास वनगा यांनी चार पाच दिवसांनी घरी परतल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलणार असल्याचे सांगितले.

पत्नीशी चर्चा करून पुन्हा नातेवाईकाकडे रवाना

श्रीनिवास वनगा हे सोमवारी रात्रीपासून नॉट रिचेबल झाले होते. गेल्या 36 तासांपासून पोलीस त्यांचा शोध घेत होते. तिकीट नाकारल्याने नाराज होऊन मागील 36 तासांपासून अज्ञातवासात असलेल्या श्रीनिवास वनगा यांचा कुटुंबीयांची संपर्क झाला आहे. मध्यरात्री तीन वाजताच्या सुमारास श्रीनिवास वनगा घरी येऊन आपल्या पत्नीशी चर्चा करून पुन्हा आपल्या नातेवाईकांकडे गेल्याची माहिती त्यांच्या पत्नीने दिली आहे.

हे सुद्धा वाचा

मनस्थिती ठीक झाल्यावर प्रसारमाध्यमांशी बोलणार

श्रीनिवास वनगा हे सध्या बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यामुळे ते घरी थांबले नाही. पण आणखी चार ते पाच दिवसांनी ते सुखरूप घरी परततील, अशी माहिती त्यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी दिली आहे. श्रीनिवास वनगा यांच्यासह आम्ही सध्या प्रसारमाध्यमांसमोर बोलण्याच्या मानसिकतेत नाही. आमदार श्रीनिवास वनगा यांची मनस्थिती ठीक झाल्यावर ते स्वतः प्रसारमाध्यमांसमोर येतील. त्यामुळे प्रसारमाध्यमांनी देखील आम्हाला आत थोडी प्रायव्हसी द्यावी, अशी विनंती सुमन वनगा यांनी केली आहे.

प्रकृती ठीक नसल्याने आराम करत असल्याची माहिती 

श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी संवाद साधला. यावेळी त्यांनी श्रीनिवास वानगा यांच्याबद्दल सविस्तर माहिती दिली. “परवा रात्रीपासून पोलिसांनी खूप शोधाशोध केली. सर्वजण खूप काळजी करत होते. मुख्यमंत्र्यांनीही फोन केला होता. यानंतर ते (श्रीनिवास वनगा) रात्री घरी आले. सध्या त्यांची प्रकृती ठीक नसल्याने ते आराम करत आहेत. त्यांना आराम करायचा होता, त्यामुळे ते सध्या विश्रांती घेत आहेत. त्यांनी कुठे आहेत, याची काहीही माहिती दिली नाही. पण त्यांच्यासोबत काही जवळचे कार्यकर्ते आहेत. त्यांनी घरी कधी येणार याबद्दल काहीही सांगितलेलं नाही”, असे सुमन वनगा यांनी म्हटले.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.