Sanjay Raut | ‘संजय राऊत यांना कोणत्या शिव्या द्याव्या हे आता आम्हाला….’, शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल

| Updated on: Jun 25, 2023 | 1:40 PM

Sanjay Raut | "संजय राऊत हा शरद पवारचा दलाल आहे. संजय राऊत हा मूर्ख माणूस आहे. प्रकाश आंबेडकर यांना आम्ही बोलवले होते का ? असा नालायकपणा संजय राऊत सारखाच माणूस करू शकतो" शिवसेनेकडून संजय राऊतांवर अशी बोचरी टीका करण्यात आली आहे.

Sanjay Raut | संजय राऊत यांना कोणत्या शिव्या द्याव्या हे आता आम्हाला...., शिवसेनेचा जोरदार हल्लाबोल
Sanjay raut satara
Follow us on

औरंगाबाद : “संजय राऊत रोज स्टेटमेंट देत असतात, परंतु महाराष्ट्रातील जनता त्यांना सिरियसली घेत नाही. मी संजय शिरसाट हा शिवसेनेचा प्रवक्ता आहे, तर संजय राऊत हा शरद पवारचा दलाल आहे. या दलालांनी उद्धव ठाकरे गट संपूर्ण संपवला आहे” अशा घणाघाती टीका शिवसेनेचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी रविवारी केली. “जो चांगलं काम करतो, त्याला डिस्टर्ब करणं, हे संजय राऊत यांचं कामच आहे. संजय राऊतमध्ये सरकार उलथवण्याची ताकत नाही, ज्यांची रोजी रोटी खाल्ली, त्याला संपवण्याचे काम संजय राऊत यांनी केले” अशा शब्दात संजय शिरसाट यांना राऊतांवर टीकेचे आसूड ओढले.

“आम्ही भाडोत्री आहोत हे दलालांच्या तोंडी शोभत नाही, दलाल असलेल्या माणसाला हे बोलण्याचा नैतिक अधिकार नाही. संजय राऊत हा शरद पवार यांच्या मांडीवर बसलेला माणूस आहे” अशी बोचरी टीका संजय शिरसाट यांनी केली.

‘संजय राऊत हा मूर्ख माणूस आहे’

“त्यांना ज्या जागा मिळतील किंवा भेटतील त्या त्यांनी निवडून आणल्या तरी नशीब समजा. आता उद्धव ठाकरे गटाचे अस्तित्व या राज्यात राहिलेले नाही” असं संजय शिरसाट म्हणाले. “संजय राऊत हा मूर्ख माणूस आहे, ज्या कार्यकर्त्यांची ईडीची चौकशी सुरू आहे तो कटपुतली आहे. खरे आरोपी आता पकडले जातील, या भीतीपोटी संजय राऊत अशी स्टेटमेंट करत आहेत” असं संजय शिरसाट म्हणाले.

‘….नाहीतर पुढच्या महिन्यात संजय राऊत जेलमध्ये’

“पत्राचाळ प्रकरणी केलेला भ्रष्टाचार समोर येत आहेत आणि यावर आता आयोग नेमला जाणार आहे. संजय राऊत यांनी त्यांची कातडी वाचवायला पाहिजे, नाहीतर पुढच्या महिन्यामध्ये संजय राऊत जेलमध्ये जाणार” असं शिरसाट म्हणाले.

‘असा नालायकपणा संजय राऊत सारखाच माणूस करू शकतो’

“प्रकाश आंबेडकर यांना आम्ही बोलवले होते का ? असा नालायकपणा संजय राऊत सारखाच माणूस करू शकतो. आमच्या सारख्या माणसाला आता हे कळत नाही संजय यांना कोणत्या शिव्या द्याव्या” अशा शब्दात संजय शिरसाट यांनी टीका केली.

‘आपण हिरो दाखवण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्या अंगलट’

“संजय राऊत यांनी कुणाच्याही मांडीवर किंवा बाजूला जाऊन बसावे. 2024 मध्ये जनता त्यांना धडा शिकवणार आणि राज्यात शिवसेना भाजपचे सरकार येणार, हे संजय राऊतला पण माहित आहे. आपण हिरो दाखवण्याचा प्रयत्न संजय राऊत यांच्या अंगलट येत आहे” असे शिरसाट म्हणाले.

बीआरएसचा खरा धोका मविआला

“बीआरएसचा खरा धोका राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटाला आहे. आम्हाला त्यांची चिंता नाही. त्यांनी सभा घ्यावी. वारकऱ्यांचा सन्मान बीआरएसने केला. त्याचे आम्ही स्वागत करतो” असं शिरसाट म्हणाले.