“एक महिन्यानंतर प्रत्येकाची फाईल काढणार…”, आदित्य ठाकरेंचा इशारा, म्हणाले “मंत्री असाल किंवा…”

यंदाच्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच भाषण केले. यावेळी त्यांनी राज्यात होणारे विविध घोटाळ्यांबद्दल भाष्य केले. यावेळी आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

एक महिन्यानंतर प्रत्येकाची फाईल काढणार..., आदित्य ठाकरेंचा इशारा, म्हणाले मंत्री असाल किंवा...
आदित्य ठाकरे
Follow us
| Updated on: Oct 12, 2024 | 8:00 PM

Aaditya Thackeray Dasara Melava 2024 speech : “एक महिना वाट बघा. सरकार आल्यावर प्रत्येकाची फाईल काढणार आहे. तुम्ही मंत्री असाल की अन्य कुणी असाल ही लूट आम्ही थांबवणार आहे”, अशा थेट इशारा शिवसेना नेते आदित्य ठाकरेंनी दिला. शिवसेना ठाकरे गटाने आयोजित केलेल्या दसरा मेळाव्यादरम्यान केलेल्या भाषणादरम्यान आदित्य ठाकरेंनी जोरदार हल्लाबोल केला,

शिवसेना ठाकरे गटाच्या पारंपारिक दसरा मेळाव्याला सुरुवात झाली आहे. यंदाच्या दसरा मेळाव्यात आदित्य ठाकरेंनी पहिल्यांदाच भाषण केले. यावेळी त्यांनी राज्यात होणारे विविध घोटाळ्यांबद्दल भाष्य केले. यावेळी आदित्य ठाकरेंनी राज्य सरकारवर निशाणा साधला.

पाच हजार कोटीचा घोटाळा समोर

“एकनाथ शिंदेंनी मिंधे सरकारने जेवढा हा महाराष्ट्र भ्रष्टाचार करून महाराष्ट्र लुटला आहे. ए टू झेड भ्रष्टाचार केला आहे. मुंबईचंच म्हणायचं झालं. तर रस्त्याचे दोन मोठे घोटाळे केले. मागच्या वर्षी मी रस्त्याचा घोटाळा उघड केला. त्यावेळी मी पंतप्रधानांना सांगितलं तुमचं नाव बदनाम होणार आहे. तुमच्या हातून उद्घाटन करून घेत आहेत, ही कामे कधी पूर्ण होणार नाही. हा घोटाळा झाला. महापालिकेला मान्य करावं लागलं. त्यामुळे एक हजार कोटी वाचले. आताही पाच हजार कोटीचा घोटाळा समोर आला”, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

“आताही सहा हजार कोटीचा घोटाळा झाला आहे. आयुक्तांना सांगतो याद राखा सही केली तर. तुम्ही सही केली, कंत्राटदारा पैसा दिला तर बघा. एक महिन्यात आमचं सरकार येणार आहे. मग ठरवा आत राहायचं की बाहेर”, असा सवालही आदित्य ठाकरेंनी उपस्थित केला.

“अनेक घोटाळे केले. मी वाट पाहत आहे. सरकार आल्यावर प्रत्येकाची फाईल काढणार आहे. मग तुम्ही मंत्री असाल की अन्य कुणी असाल. ही लूट आम्ही थांबवणार आहे. तुम्ही माझी साथ आणि सोबत देणार की नाही? आम्ही महाराष्ट्राला वाचावणार आहोत”, असेही आदित्य ठाकरेंनी सांगितले.

राज्यातील जनता ही घटना विसरणार नाही

छत्रपतींचा पुतळाही सोडला नाही. तिथेही भ्रष्टाचार झाला. यातून काही चांगलं निघेल असं मंत्री म्हणाला. काय चांगलं निघेल. कोट्यवधीचं टेंडर काढलं. या राज्यातील जनता ही घटना विसरणार नाही. तुम्हाला माफ करणार नाही, असे आदित्य ठाकरे म्हणाले.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.