“मुख्यमंत्र्यांसोबत मिळून संजय शिरसाटने आनंद दिघेंच्या मृत्यूचा कट रचला”, ठाकरे गटाच्या आरोपाने मोठी खळबळ

शिंदेंच्या शिवसेनेकडून राजकीय नेरेटीव्ह पसरवला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर दुसरीकडे आनंद दिघेंच्या मृत्यूबद्दलही अनेक दावे केले जात आहेत. यावरुन टीकाही होत आहे. आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी यावर भाष्य केले.

मुख्यमंत्र्यांसोबत मिळून संजय शिरसाटने आनंद दिघेंच्या मृत्यूचा कट रचला, ठाकरे गटाच्या आरोपाने मोठी खळबळ
आनंद दिघेImage Credit source: Facebook
Follow us
| Updated on: Oct 01, 2024 | 3:49 PM

Chandrakant Khaire On Anand Dighe death : दिवंगत शिवसेना नेते आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे गुरु आनंद दिघे यांच्या जीवनपटाचा भाग 2 म्हणजेच धर्मवीर 2 साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट हा चित्रपट काही दिवसांपूर्वी प्रदर्शित झाला. शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी एक गंभीर आरोप केला आहे. आनंद दिघे यांना मारलं गेलं, अख्खा ठाणे जिल्हा जाणतो की त्यांचा घातपात झालाय, असा गंभीर आरोपही संजय शिरसाट यांनी केला होता. यावर आता ठाकरे गटाच्या नेत्याने जोरदार प्रत्युत्तर दिले आहे. संजय शिरसाट हा तिथे होता, त्यामुळे त्याने कृत्य केलं असावं, असे वक्तव्य ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केले.

धर्मवीर २ या चित्रपटावरुन सध्या राज्याचे राजकारण तापले आहे. ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर हा चित्रपट प्रदर्शित करत शिंदेंच्या शिवसेनेकडून राजकीय नेरेटीव्ह पसरवला जात असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जात आहे. तर दुसरीकडे आनंद दिघेंच्या मृत्यूबद्दलही अनेक दावे केले जात आहेत. यावरुन टीकाही होत आहे. आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी यावर भाष्य केले.

“संजय शिरसाटने हा कट रचला असावा”

आनंद दिघे यांच्या मृत्यूबद्दल चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. “मुख्यमंत्री हे शेवटच्या क्षणी तिथे होते. त्यामुळे कुणी काय केलं याची आम्हाला माहीत नाही. संजय शिरसाटही तिथे होते, त्याने हे कृत्य केलं असावं. मुख्यमंत्र्यांना सोबत घेऊन संजय शिरसाटने हा कट रचला असावा”, असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

“आजचे मुख्यमंत्री दिघेंच्या शेवटच्या क्षणी रूममध्ये होते”

संजय शिरसाट जे बोलतात ते चुकीचे आहे. आनंद दिघेंचा अपघात झाला, तिथे मी देखील होतो. त्यावेळी डॉक्टरांनी हृदयविकाराचा झटका आला, असे सांगितल्याचे लोकं सांगतात. संजय शिरसाट तिथे होते. त्यामुळे आम्हाला शंका आहे की शिरसाटने हे कृत्य केलं असेल. मला माहित आहे आजचे मुख्यमंत्री दिघेंच्या शेवटच्या क्षणी रूममध्ये होते. आम्हाला माहिती नाही, कुणी काय केलं. मग मुख्यमंत्र्यांना विचारा, असे चंद्रकांत खैरे म्हणाले.

संजय शिरसाट एवढ्या दिवसानंतर बोलतो म्हणजे मुख्यमंत्र्यांसोबत यांनी कट रचला असेल. शेवटच्या क्षणी तिथे असताना का बोलला नाही. आता जाणीवपूर्वक ठाकरे कुटुंबावर वार करत आहे. पण हे कट कारस्थान त्यांचेच आहे, असे चंद्रकांत खैरेंनी म्हटले.

भाजप पक्ष सगळ्यांना गिळण्याचं काम करतो- जितेंद्र आव्हाड
भाजप पक्ष सगळ्यांना गिळण्याचं काम करतो- जितेंद्र आव्हाड.
शहाजी बापू्ंनी केले वक्तव्य तर सुहास बापूच आमदार......
शहाजी बापू्ंनी केले वक्तव्य तर सुहास बापूच आमदार.......
विरोधकांना धारेवर धरणारे अमोल मिटकरी बनले ट्राफिक पोलीस, बघा व्हिडीओ
विरोधकांना धारेवर धरणारे अमोल मिटकरी बनले ट्राफिक पोलीस, बघा व्हिडीओ.
दादा कार्यकर्त्यांवर भडकले, 'फालतूपणा बस्स, आता तू बोलला ना तर मी...'
दादा कार्यकर्त्यांवर भडकले, 'फालतूपणा बस्स, आता तू बोलला ना तर मी...'.
नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, शिंदेंच्या आदेशानंतर अॅक्शन
नायर रुग्णालयात विद्यार्थीनीचा लैंगिक छळ, शिंदेंच्या आदेशानंतर अॅक्शन.
सुळेंची भाजपवर टीका; 'चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा...'
सुळेंची भाजपवर टीका; 'चांदीच्या ताटात जेवायची वेळ येते तेव्हा...'.
गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर; आता मनसोक्त खेळा, कारण...
गरबा-दांडिया खेळणाऱ्या रसिकांसाठी खुशखबर; आता मनसोक्त खेळा, कारण....
'हम पाच-पाच है... ', कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतेय चर्चा
'हम पाच-पाच है... ', कर्जत-जामखेड मतदारसंघात निनावी बॅनरची होतेय चर्चा.
अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही, आंबेडकरांचा CM-DCMवर निशाणा
अॅट्रोसिटी दाखल झाल्यानंतर बोंबलायचं नाही, आंबेडकरांचा CM-DCMवर निशाणा.
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्यांसाठी मोर्चा
महाविकास आघाडी सरकारकडून शेतकर्यांसाठी मोर्चा.