Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के, शिंदे गटाकडून मुंबईत मोठे खिंडार

शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्ते संजना घाडी यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना गटात प्रवेश केला आहे. त्यांच्यासोबत १८ जणांनीही शिंदे गटात प्रवेश केला आहे. यात मुंबईतील अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते आहेत. यामुळे ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे आणि आगामी निवडणुकांवर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.

ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के, शिंदे गटाकडून मुंबईत मोठे खिंडार
uddhav thackeray and eknath shinde
Follow us
| Updated on: Apr 13, 2025 | 3:12 PM

विधानसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटाला धक्क्यांवर धक्के बसत आहेत. त्यातच आज शिवसेना शिंदे गटाने ठाकरे गटाला मोठे खिंडार पाडले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ठाकरे गटाचे मुंबईतील माजी नगरसेविका आणि प्रवक्ता संजना घाडी यांनी शिंदे गटात जाहीर प्रवेश केला. त्यांच्यासोबत अनेक वरिष्ठ पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनीही शिवसेना ठाकरे गटात जाहीर प्रवेश केला. आज मुंबईतील मुक्तागिरी बंगल्यावर हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला.

माजी नगरसेविका आणि प्रवक्ता संजना घाडी यांच्यासोबत तब्बल १८ जणांनी शिंदे गटात प्रवेश केला. यात मुंबईतील काही शाखाप्रमुख, गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, गटसंघटिका यांसह अनेक पदाधिकाऱ्यांचा समावेश आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संजना घाडी आणि त्यांच्यासोबत आलेल्या कार्यकर्त्यांचे शिंदे गटात स्वागत केले. या पक्षप्रवेशामुळे मुंबईतील ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे.

शिंदे गटात प्रवेश केलेल्या नेत्यांची यादी

  1. सौ. संजना संजय घाडी – उपनेत्या, प्रवक्ता
  2.  श्री. संजय शंकर घाडी – मा.नगरसेवक
  3. सुयश संजय घाडी -युवा सेना विस्तारक ठाणे लोकसभा
  4. सागर विनोद पांचाळ – डीजे शाखा समन्वयक शाखा क्र.५, उपशाखाप्रमुख.
  5. नितेश नामदेव माने – उपशाखाप्रमुख
  6. समीर बोरकर – उपशाखाप्रमुख
  7. प्रदीप नेगी – युवा सेना मागठाणे विधानसभा चिटणीस
  8. तानाजी जाधव – युवा सेना शाखा अधिकारी शाखा क्र.५
  9. आशिष गावडे – युवा शाखा समन्वयक शाखा क्र.५
  10. मोहम्मद सय्यद – मागठाणे व्यापारी सेना अध्यक्ष.
  11. नरसिंह दळवी – गटप्रमुख
  12. गुरु सावंत – गटप्रमुख
  13. अपूर्व शाहा – गटप्रमुख
  14. मंजुनाथ येलगुट्टी – गटप्रमुख
  15. लक्ष्मण राडे – गटप्रमुख
  16. पौर्णिमा सावंत – उपशाखा संघटक
  17. मेघा दळवी – गटसंघटिका
  18. जयेश दवे – उपशाखाप्रमुख

दोन दिवसांपूर्वी ठाकरे गटाच्या प्रवक्तेपदी निवड

संजना घाडी यांची दोन दिवसांपूर्वीच शिवसेना ठाकरे गटाच्या प्रवक्तेपदी निवड झाली होती. मुंबईतील प्रभावी नेत्या आणि माजी नगरसेविका म्हणून त्यांना ओळखले जाते. संजना घाडी यांच्यासोबतच त्यांचे पती आणि माजी नगरसेवक संजय घाडी यांनी शिंदे गटात प्रवेश केला. संजय घाडी आणि संजना घाडी यांच्या पक्षप्रवेशामुळे आगामी निवडणुकीत ठाकरे गटाला याचा फटका बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे. या घडामोडींवर ठाकरे गटाकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.

कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार
कश्मीरच्या पहलगाम येथे सर्वात मोठा अतिरेकी हल्ला,२७ पर्यटक ठार.
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण...
शेलार ठाकरेंना 'लँड माफिया' म्हणताच पेडणेकरांकडून 'झोलर'ची आठवण....
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही..
युगेंद्रला साथ द्या, नातवासाठी शरद पवारांची साद म्हणाले, इथून पुढेही...
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?
'मी सिनिअर मंत्री आता...', चंद्रकांत पाटलांचं लक्ष फडणवीसांच्या पदावर?.
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे...
'हिंदी' भाषा सक्तीवरून सरकारची माघार, घेतला मोठा निर्णय; यापुढे....
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?
राज-उद्धव एकत्र आल्यास मुंबई कोणाची? युती सत्ताधार्‍यांसाठी डोकेदुखी?.
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?
हिंदीची सक्ती केली तर मी तर मरेनच...नितेश राणेंचं मिश्कील वक्तव्य काय?.
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी
ठाकरे बंधू परदेशात पण चर्चा मात्र महाराष्ट्रात, सेना भवनासमोर बॅनरबाजी.
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात
हुसैन दलवाई यांना नाशिक पोलिसांनी घेतलं ताब्यात.
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती
पाणीबाणी! लातूरमध्ये पाण्यासाठी नागरिकांची वणवण भटकंती.