“यूज अँड थ्रो’च्या मध्ये बाळासाहेबांचा ब आहे, तोपर्यंत एसंशि…” संजय राऊतांचा टोला
संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदेंवर "युज अँड थ्रो" राजकारणाचा आरोप केला. त्यांनी शिवसेना फोडण्याचा शिंदेंचा प्रयत्न अपयशी ठरल्याचे म्हटले. शिंदेंच्या "ड्रीम प्रोजेक्ट"वर टीका करत राऊत यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या नावाचा उल्लेख करून शिंदेंना खोचले.

गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात एसंशि आणि युबीटी या दोन शब्दांवरुन राजकारण सुरु आहे. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंचा उल्लेख करताना एसंशिं असा केला होता. तर दुसरीकडे याबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी विचारलं असता त्यांनी याबद्दल सविस्तर प्रतिक्रिया दिली. तुमचा शॉर्टफॉर्म युटी होतो म्हणजे युज अँड थ्रो म्हणायचं का असा खोचक सवाल एकनाथ शिंदेंनी केला होता. आता यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी टोला लगावला आहे.
संजय राऊत यांनी नुकतंच पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेदरम्यान त्यांना एकनाथ शिंदेंच्या साताऱ्याच्या ड्रीम प्रोजेक्टबद्दल प्रश्न करण्यात आला आहे. त्यावर त्यांनी उत्तर दिले. बाळासाहेब ठाकरे यांचे B हे नाव आहे, त्यांचे नाव कसे काढणार, त्यात मध्ये ब आहे. तो काढता येणार नाही, असे संजय राऊत म्हणाले.
“जोपर्यंत तो बाप आहे तोपर्यंत एसंशि काही करु शकत नाही”
“एकनाथ शिंदेचा ड्रीम प्रोजेक्ट एकच होता. ते म्हणजे शिवसेना फोडायची आणि मोदींच्या पायाशी ठेवायची हे त्यांचे ड्रीम प्रोजेक्ट होते. पण एकनाथ शिंदेंच्या त्या ड्रीम प्रोजेक्टला संमती मिळाली नाही. शिवसेना आजही मजबुतीने उभी आहे. आमदार खासदार गेले असतील, पण त्यांचा जो पक्ष आहे एसंशि… त्यांनी use and थ्रो असे म्हटले. त्यामध्ये बाळासाहेब ठाकरे यांचे B हे नाव आहे, त्यांचे नाव कसे काढणार. त्यात मध्ये ब आहे. तो काढता येणार नाही. कारण बाप आहे तो… बापाचा ब काढणार का. जोपर्यंत तो बाप आहे तोपर्यंत एसंशि काही करु शकत नाही”, असे संजय राऊत म्हणाले.
“आताची भाजप मूळ भाजप नाही”
“भाजपाची सथापना आमच्या समोर झाली. मूळ शिवसेना भाजपाला सिनियर आहे. तेव्हा एका उदात्त हेतूने यांचा जन्म झाला. ज्यांनी जन्म घातला ते तुरुंगात आहेत. आताची भाजप मूळ भाजप नाही”, असे संजय राऊतांनी म्हटले.
“मी सत्य बोलतो म्हणून माझ्यावर टीका”
“कुठलेली मुद्दे हिंदुत्वसोबत जोडून भाजप वातावरण खराब करत आहे. हिंदूंना मूर्ख समजता का तुम्ही, वक्फ बोर्डाचे जमिनी तुम्हाला हडप करायचे आहे. मोठ्या उद्योगपतींना या जमिनी देण्यासाठी हे सुरू आहे. सार्वजनिक जमिनी उद्योगपतींना विकून झालेत. त्यामुळे आता वक्फ बोर्डाची संपत्ती दिसली. भविष्यात या जमिनी भाजप नेते आणि उद्योगपतींच्या घशात घालणार आहे. मी सत्य बोलतो म्हणून माझ्यावर टीका होत आहे”, असे संजय राऊत म्हणाले.