दिशा सालियन प्रकरणी उद्धव ठाकरेंची पहिलीच प्रतिक्रिया, दोन वाक्यात म्हणाले…
दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी राजकारण तापले आहे. सतीश सालियन यांनी हायकोर्टात आदित्य ठाकरे आणि किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप करत गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. उद्धव ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया देताना कुणाल कामरांवरही टीका केली.

सेलिब्रेटी मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूप्रकरणी सध्या राजकारण तापले आहे. दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी हायकोर्टात धाव घेतली आणि याप्रकरणावरुन वातावरण तापले. सतीश सालियन यांनी कोर्टात याचिका दाखल करत आदित्य ठाकरेंसह माजी महापौर किशोरी पेडणेकर यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. तसेच या दोघांवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणीही त्यांनी केली आहे. आता याप्रकरणावरुन ठाकरे गटाचे सर्वेसर्वा उद्धव ठाकरे यांनी मौन सोडत भाष्य केले.
दिशा सालियनचे वडील सतीश सालियन यांनी दिशा सालियन प्रकरण हे सीबीआयकडे सोपवण्याची मागणीही त्यांनी केली आहे. या प्रकरणावरुन राजकारण तापलेले असतानाच उद्धव ठाकरेंनी पहिल्यांदाच यावर भाष्य केले. उद्धव ठाकरे यांनी नुकतीच शिवसेना भवन परिसरात पत्रकार परिषद घेतली. या पत्रकार परिषदेत त्यांना दिशा सालियन प्रकरणावरुन प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी उघडपणे भाष्य केले.
दिशा सालियन आणि कुणाल कामरावर थेट विधान
दिशा सालियनप्रकरणी माझ्याकडे काहीही माहिती नाही. विषयाशी माझा संबंध नाही. माहिती नाही त्यावर मी बोलणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावेळी उद्धव ठाकरेंनी कुणाल कामरबद्दलही थेट भाष्य केले. ती गद्दार सेना आहे. मुख्यमंत्र्याचा बचाव कुणाचा केला. ज्याचं नाव नाही घेतलं त्याचा. शिंदे गटाची बदनामी झाली असं असेल तर याचा अर्थ शिंदे गट गद्दार आहे. सत्य हे सत्य असतं. गावात गावकऱ्यांनी बैलावरही लिहिलं होतं. एसंशिची बदनामी झाली तर याचा अर्थ एसंशि गद्दार आहे, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
मशिदीत जाऊन सौगात देतात ते पाहायचं आहे
कालपर्यंत विष देत होते आज अन्नधान्य देत आहे. त्यांनी हिंदुत्व सोडल्याचं जाहीर करावं. त्यांना माझ्यावर आरोप करण्याचा अधिकार नाही. मी हिंदुत्व सोडल्याचं म्हणण्याचा अधिकार नाही. आता त्यांनी हिंदुत्व सोडलं. एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे, आपका मंगलसूत्र चोरी होगा, भाजपनेच हिंदुत्व सोडलं तर हिंदू सेफ आहे की नाही. जे हिंदूत्वाचे रक्षक आहेत ते कसे मशिदीत जाऊन सौगात देतात ते पाहायचं आहे, असाही टोला उद्धव ठाकरेंनी लगावला.