महाविकास आघाडीत महाफूट? मुंबईपासून नागपूरपर्यंत महापालिका स्वबळावर लढणार, संजय राऊतांची मोठी घोषणा

आपपल्या पक्षाकडे जास्तीत जास्त महापालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत असाव्यात यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांकडून महापालिका स्वतंत्र लढण्याकडे भर दिला जात आहे.

महाविकास आघाडीत महाफूट? मुंबईपासून नागपूरपर्यंत महापालिका स्वबळावर लढणार, संजय राऊतांची मोठी घोषणा
sanjay raut
Follow us
| Updated on: Jan 11, 2025 | 10:59 AM

महाराष्ट्रातील लोकसभा, विधानसभा निवडणुका काही महिन्यांपूर्वी पार पडल्या. या निवडणुकीनंतर आता महापालिकेची निवडणूक कधी होणार, याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. सध्या राज्यातील सर्वच पक्षांकडून महापालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आली आहे. त्यातच आता ठाकरे गटाकडून आगामी महापालिकांच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्यात आली आहे. मुंबईपासून नागपूरपर्यंतच्या महापालिका आम्ही स्वबळावर लढू, अशी मोठी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी केली आहे.

संजय राऊतांनी नुकतंच पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महापालिकेच्या निवडणुकांबद्दल प्रश्न विचारण्यात आला. त्यावर त्यांनी थेट पण स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली. “मुंबईपासून नागपूरपर्यंत महापालिका आम्ही स्वबळावर लढणार”, अशी मोठी घोषणा शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केली. “मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल, एकदा आम्हाला पाहायचंच आहे”, असे संजय राऊत म्हणाले.

संजय राऊत काय म्हणाले?

“मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल. एकदा आम्हाला पाहायचंच आहे. नागपूरलाही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिले आहेत. आताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता असं आमचं ठरतंय की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल… कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभेत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला किंबहुना पक्षाच्या वाढीला बसतो. महापालिका, जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीत स्वबळावर लढून आपपले पक्ष मजबूत करावेत”, असे संजय राऊत म्हणाले.

दरम्यान काही दिवसांपूर्वी भाजप खासदार नारायण राणे यांनी रत्नागिरीत पत्रकारांशी संवाद साधताना महापालिका निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेत दिले होते.  यापुढे भविष्यात आम्ही निवडणुका स्वबळावर लढू. मुंबई महापालिकेच्या निवडणुका भाजप स्वबळावर लढवेल. मुंबईत भाजपची प्रचंड ताकद आहे, असे नारायण राणे म्हणाले होते. तर दुसरीकडे एकनाथ शिंदेंनी महायुती म्हणून मुंबई पालिकेच्या निवडणुका एकत्र लढणार असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी म्हटलं होतं. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका महायुती म्हणून एकत्र लढू, असे एकनाथ शिंदेंनी म्हटले होतं.

आता विधानसभा निवडणुकीनंतर आगामी महानगरपालिकेत निवडणुकीचे वारे वाहायला सुरुवात झाली आहे. या महापालिका निवडणुकांमध्ये आपपल्या पक्षाकडे जास्तीत जास्त महापालिका, नगरपरिषद, ग्रामपंचायत असाव्यात यासाठी सर्वच पक्षांकडून प्रयत्न होताना दिसत आहेत. त्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांकडून महापालिका स्वतंत्र लढण्याकडे भर दिला जात आहे.

मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार
मुंबई ते नागपूरपर्यंत सर्व महापालिका निवडणुका ठाकरे गट स्वबळावर लढणार.
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग
स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी भाजप फुंकणार रणशिंग.
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही
Shegaon Hair Loss | केसगळतीच्या भीतीपोटी नागरिकांची 8 दिवस अंघोळच नाही.
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप
'एक खून करून पोट भरलं नाही?', जरांगे पाटलांचा थेट मुंडेंवर आरोप.
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र
'कोल्हेंच्या वक्तव्याची कीव, त्यांनीही...'; मित्रपक्षांकडून टीकास्त्र.
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?
शरद पवार गटात अलबेल नाही? सत्तेत सहभागी होण्यासाठी 2 मतप्रवाह?.
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले..
वाल्मिक कराड लाडकी बहीण योजनेचा अध्यक्ष, बावनकुळेंचं समर्थन? म्हणाले...
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'
'मुन्नीचं लय प्रेम पण ती बोलना, बोलली तर मुन्नीचे कपडे टराटरा...'.
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?
'EVM म्हणजे एव्हरी व्होट अगेन्स्ट मुल्ला',भाजपचा बडा नेता काय म्हणाला?.
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.