संकेत बावनकुळेची मेडिकल का केली नाही? सुषमा अंधारे थेट पोलीस ठाण्यात; पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती

नागपूरमध्ये घडलेल्या भीषण अपघातानंतर ती गाडी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या नावे असल्याचे समोर आले. या मुद्यावरून आता राजकारण तापू लागलं असून शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी नागपूरमधील सीताबर्डी पोलीस स्टेशन मध्ये जाऊन प्रश्नांची सरबत्ती केली.

संकेत बावनकुळेची मेडिकल का केली नाही? सुषमा अंधारे थेट पोलीस ठाण्यात; पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती
Follow us
| Updated on: Sep 11, 2024 | 1:22 PM

नागपूरमध्ये ऑडी कारचा झालेला अपघात सध्या गाजत आहे. या कारची नोंदणी भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत याच्या नावे असल्याची माहिती समोर आली असून हा अपघात झाला तेव्हाच संकेत हाही कारमध्येच होता, असेही समोर आलंय. याच मुद्यावरून आता विरोधकांनी बावनकुळे आणि सरकारलाही घेरलं असून संजय राऊत, तसेच शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनीही हल्लाबोल केला. दोन दिवसांपूर्वी सुषमा अंधारे यांनी काही व्हिडीओ,तर काही फोटोंच्या माध्यमातून हे प्रकरण लावून धरलंय.बावनकुळेंचा मुलगा असल्याने त्याला वाचवायचा प्रयत्न सुरू असल्याचाही आरोप त्यांनी केला.

त्यानंतर सुषमा अंधारे आज सकाळी थेट नागपूरमधील सीताबर्डी पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाल्या. आणि त्यांनी पोलिसांना एकामागोमाग एक सवाल विचारत त्यांच्यावर प्रश्नांची रबत्ती केली. अपघातग्रस्त गाडीचा नंबर एफआयआरमध्ये का नाही ? अपघात झाल्यावर गाडी पोलिस स्टेशनला आणण्याऐवजी ती गॅरेजमध्ये (दुरूस्तीला) का पाठवण्यात आली ? हा अपघात झाल्यावर त्या गाडीतील दोघांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली, पण संकेत बावनकुळे याची मेडिकल का केली नाही ? असे एकामागोमाग एक सावल विचारत सुषमा अंधारे यांनी आक्रमक भूमिका घेतली.

पोलिसांकडून हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न

सीताबर्डी पोलिस स्टेशनमध्ये दाखल झालेल्या सुषमा अंधारे या अपघात प्रकरणावरून आक्रमक झालेल्या दिसल्या. रविवारी रात्री बारा – साडेबाराच्या दरम्यान यांनी लाहोर बारमध्ये मद्य घेतलं होतं,बीफ कटलेटही खाल्लं. अपघात झाल्यावर गाडीचा नंबर, डिटेल्स एफआयआरमध्ये का नाहीत ? गाडीचे डिटेल का आले नाही , संकेतचं मेडिकल का केलं नाही . अपघाता वेळी गाडीचा स्पीड 150 च्या आसपास होता, रॅश ड्रायव्हिंगमुळेच हा अपघात झाल्याचा दावा सुषमा अंधारे यांनी केला. पोलीस हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न करत होते , असा आरोपही त्यांनी लावला.

बावनकुळे म्हणतात माझ्या मुलाची चौकशी करा, पण अजून त्यांच्या मुलाचं नाव एफआरआय मध्ये आलंच नाही. बावनकुळे यांची ताकद भारी पडत असेल म्हणून पोलीस संकेतचं नाव एफआरआय मध्ये घेत नाही असे म्हणत पोलिसांना 36 तास का लागले असा सवाल त्यांनी केला. जितेंद्र सोनकांबळे या फिर्यादीवर दबाव आहे, म्हणून ते एफ आर आय मागे घेणार असल्याचं कळतंय सा आरोपही अंधारे यांनी केला. खरच निष्पक्षपणे तपास व्हावा असं वाटत असेल तर संकेत च नाव एफआरआयमध्ये दाखल करा असा आदेश गृहमंत्र्यांनी ( देवेंद्र फडणवीस) दिला पाहिजे, अशी मागणीही सुषमा अंधारे यांनी केली.

संकेत बावनकुळे बारमध्ये दूध प्यायला गेला होता का ?

ऑडी कारचा अपघाता झाला तेव्हा संकेत आणि त्याचे दोन मित्र कारमध्येच होते. तो गाडी चालवत नव्हता असं सांगितलं जातं आहे. संकेतने दारू प्यायली नव्हती असं म्हटलं जातंयं, मग तो मित्रांसोबत बारमध्ये का गेला होता, तेथे तो दूध प्यायला गेला होता का ? असा सवाल विचारत संकेत बावनकुळे वर गुन्हा दाखल व्हायला पाहिजे अशी मागणीही अंधारे यांनी केली.

रामटेकमध्ये सुद्धा एक प्रकरण समोर आलंय जिथे 24 वर्षांच्या मुलीची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. पोलीस त्या प्रकरणीदेखील नीट तपास करत नाहीत, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरही हल्ला चढवला. गृहमंत्र्यांच्या शहरात जो अपघात घडलाय, त्यात भाजपा प्रदेशाध्यक्षांच्या मुलाचाच समावेश आहे, असे सांगत अंधारे त्यांच्यावर टीका केली.

हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार
हवा तर पोलीस बंदोबस्त देऊ,कोणालाही पाठीशी घालणार नाही - अजित पवार.
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार
संतोष देशमुख यांच्या मुलीच्या शिक्षणाची जबाबदारी आम्ही घेतो -शरद पवार.
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?
'परभणी प्रकरणात खरी वस्तूस्थिती जाणून...,' काय म्हणाले शरद पवार ?.
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे
मस्साजोग प्रकरणात अख्खं गाव...',पवार भेटीवर काय म्हणाले खासदार सोनावणे.
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर...
संजय राऊत रेकी प्रकरणानंतर मंत्री नितेश राणे म्हणाले की मच्छर....
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल
देवेंद्र फडणवीस यांच्या अवतीभोवतीची मंडळी कोण ? संजय राऊत यांचा सवाल.
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर
धूप-अगरबत्ती लावण्यावरून वाद, मराठी कुटुंबाला बेमद मारहाण, अखेर मुजोर.
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला
'तो माझाच माल, त्याला कोणाची काही...', राऊतांवर शिवसेना नेत्याचा टोला.
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.