Shivsena Uddhav Thackeray Group : महाराष्ट्रातील विधानसभा निवडणूक दिवसेंदिवस रंगतदार होत चालली आहे. येत्या 20 नोव्हेंबर रोजी महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीसाठी मतदान होणार आहे. विधानसभेच्या निवडणुकीत महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी मुख्य लढत होणार आहे. एकीकडे सर्वच पक्ष उमेदवार घोषित करताना दिसत आहेत. तर दुसरीकडे काही उमेदवार हे नाराज झाले आहेत. यातील काहीजण बंडखोरी करण्याच्या तयारीत आहेत. काहींनी पक्षाच्या विरोधात भूमिका घेतल्याने त्यांच्यावर कारवाई झाल्याचे दिसत आहेत. निवडणुका तोंडावर आलेल्या असताना शिवसेना उद्धव ठाकरेंकडून तीन जिल्हाप्रमुखांची हकालपट्टी करण्यात आली आहे.
छत्रपती संभाजीनगर मध्य मतदारसंघामधून शिवसेना ठाकरे गटाचे किशनचंद तनवाणी यांना उमेदवारी देण्यात आली होती. पण किशनचंद तनवाणी यांनी उमेदवारी नाकारली होती. यानंतर शिवसेना ठाकरे गटाकडून शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यानंतर किशनचंद तनवाणी यांची पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. तर दुसरीकडे शिवसेनेचे (ठाकरे) भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख शंकर हिरामण मांडेकर यांची आणि महाड आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांची देखील पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे ऐन निवडणुकीत ठाकरे गटाने तीन मोठ्या पदाधिकाऱ्यांवर कारवाई केल्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी नुकतंच ट्वीटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी अधिकृतरित्या घोषित केलेल्या छत्रपती संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांची उमेदवारी जाहीर केली आहे. तसेच पक्षविरोधी भूमिका घेतल्याने जिल्हाप्रमुख किशनचंद तनवाणी यांना तातडीने पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांच्या आदेशाने पदावरून कार्यमुक्त केले. सदरील सर्व घोषणा मातृभूमी प्रतिष्ठाण संपर्क कार्यालयात आयोजित अधिकृत पत्रकार परिषदेत केली”, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं आहे.
पक्षप्रमुख उद्धव साहेब ठाकरे यांनी अधिकृत रित्या घोषित केलेल्या संभाजीनगर मध्य विधानसभा मतदारसंघातून उमेदवार किशनचंद तनवाणी यांनी विधानसभा निवडणुकीतून माघार घेतल्याने शिवसेना शहरप्रमुख बाळासाहेब थोरात यांची उमेदवारी जाहीर केली. तसेच पक्षविरोधी भूमिका घेतल्याने जिल्हाप्रमुख…
— Ambadas Danve (@iambadasdanve) October 28, 2024
तसेच शिवसेना ठाकरे गटाकडून भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख शंकर हिरामण मांडेकर यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. पक्षविरोधी कारवाया केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच महाड आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांची देखील शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे, असे शिवसेना ठाकरे नेते विनायक राऊत यांनी म्हटले.
*शिवसेनेतून हकालपट्टी*
पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे महाड आणि श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख अनिल नवगणे यांची शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
विनायक राऊत
शिवसेना…— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 28, 2024
*शिवसेनेतून हकालपट्टी*
पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख शंकर हिरामण मांडेकर यांची शिवसेना पक्षप्रमुख माननीय श्री उद्धवजी ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे.
विनायक राऊत…
— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 28, 2024
तसेच “पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे भोर आणि खडकवासला विधानसभा मतदारसंघाचे जिल्हाप्रमुख शंकर हिरामण मांडेकर यांची शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे”, अशीही माहिती विनायक राऊत यांनी ट्वीटरद्वारे दिली.