स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवा, दुसऱ्यांच्या पोरांचे… संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल

लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्ष वेगाने कामाला लागले असून असून अनेक पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग वेगाने सुरू आहे. भारतीय जनता पक्षामध्ये तर सध्या वेगाने इनकमिंग सुरू आहे. स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवा दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे हालवू नका, अशी टीका संजय राऊत यांनी केली.

स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवा, दुसऱ्यांच्या पोरांचे... संजय राऊत यांचा भाजपवर हल्लाबोल
Follow us
| Updated on: Mar 18, 2024 | 10:18 AM

मुंबई | 18 मार्च 2024 : लोकसभा निवडणुकांची तारीख शनिवारी जाहीर झाल्या असून अवघ्या महिन्याभरावर मतदानाची तारीख आली आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सध्या राजकीय पक्ष वेगाने कामाला लागले असून असून अनेक पक्षांमध्ये इनकमिंग-आऊटगोईंग वेगाने सुरू आहे. भारतीय जनता पक्षामध्ये तर सध्या वेगाने इनकमिंग सुरू आहे. काँग्रेसमधील अनेक बड्या नेत्यांसब इतर पक्षांमधील नेतेही सध्या भाजपामध्ये प्रवेश करताना दिसत आहेत. मात्र याच मुद्यावरून शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाजपावर जोरदार निशाणा साधला आहे. ‘स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवा दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे हालवू नका ते पुन्हा पळून जातील’ असे टीकास्त्र संजय राऊत यांनी सोडले.

हे बिन परिवाराचे आहेत का ?

सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी भाजपवर कडाडून टीका केली. ‘ भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्यांची पोरं पळवून मोठा झालेला पक्ष आहे. भारतीय जनता पक्ष हा दुसऱ्यांची पोर पळवणारा पक्ष. त्यांना स्वतःची पोर नाहीत. ते सर्व फोडलेली पोर आमची ते घेऊन ते बसले आहेत. हे बिन परिवाराचे आहेत का ? स्वतःच्या पोरांचे पाळणे हलवा दुसऱ्यांच्या पोरांचे पाळणे हालू नका ते पुन्हा पळून जातील’ असा हल्ला संजय राऊत यांनी चढवला.

यावेळी त्यांनी देवेंद्र फडणवीसांच्या टीकेलाही प्रत्युत्तर दिले. आमच्या हातात ईडी-सीबीआय येईल तेव्हा भारतीय जनता पक्ष संपलेला असेल, अशा शब्दांत शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना थेट इशाराच दिला. फडणवीसांच्या परिवारवादाच्या विधानाला उत्तर देताना त्यांनी हे विधान केलं. “ज्या दिवशी आमच्या हातामध्ये केंद्रात ईडी आणि सीबीआय येईल तेव्हा देवेंद्र फडणवीसांनी हे वाक्य पुन्हा ऐकून दाखवावं, त्यावेळी त्यांचा पक्ष शिल्लक राहिलेला नसेल. लोहा लोहे को काटता है, हे आम्हालाही माहिती आहे, फक्त त्यांनाच माहिती आहे असं नाही. मी पुन्हा एकदा सांगतो, ज्या दिवशी आमच्या हातात ईडी-सीबीआयसह सत्ता येईल, त्या दिवशी फडणवीसांनी त्यांचा पक्ष वाचवून दाखवावा ” असे राऊत म्हणाले.

राहुल गांधी परखडपणे भूमिका मांडत आहे

काल शिवतीर्थावर झालेल्या इंडिया आघाडीच्या सभेबद्दलही राऊत बोलले. शिवतीर्थावर मोठी जनसभा झाली. मोठ्या शक्ती बरोबर लढत आहोत. काल इंडिया आघाडी महाप्रचार सभा झाली .

इंडिया आघाडीतील सर्व प्रमुख नेते उपस्थित राहिले. प्रकाश आंबेडकर देखील उपस्थित होते, सर्वांनी आपली भूमिका मांडली. राहुल गांधी देशातील लोकप्रिय नेते आहे. देश भावी होणारा पंतप्रधान पाहत आहे अशी लोकांची भूमिका आहे. राहुल गांधी परखडपणे भूमिका मांडत आहे , ते झुकत नाही हा त्यांचा बाणा या देशातील लोकांना आवडत आहे. हुकूमशाही पुढे न झुकणारे असे ते आहेत. जे शरण गेले त्यांना इतिहास माफ करणार नाही, आम्ही लढणारे लोक आहोत असे राऊत म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.