मोठी बातमी: नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्याची गळफास लावून आत्महत्या

जुन्या घराचे रंगकाम करायचे आहे, असे पत्नीला सांगून उमेश नाईक घराबाहेर पडले होते. | Shivsena suicide

मोठी बातमी: नाशिकमध्ये शिवसेना पदाधिकाऱ्याची गळफास लावून आत्महत्या
प्रातिनिधिक फोटो
Follow us
| Updated on: May 08, 2021 | 7:35 AM

नाशिक: शिवसेनेचे नाशिकमधील पदाधिकारी उमेश नाईक यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर येत आहे. आपल्या जुन्या घरी गळफास घेऊन नाईक यांनी आत्महत्या (Suicide) केली. या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उमेश नाईक आर्थिक विवंचनेत होते. या कारणामुळेच त्यांनी आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. पंचवटी पोलिसांकडून सध्या या प्रकरणाचा तपास केला जात आहे. (Shivsena leader Umesh Naik suicide in Nashik)

प्राथमिक माहितीनुसार, उमेश नाईक काळाराम परिसरात राहत होते. मात्र, त्यांचे जुने घर नागचौक परिसरात आहे. या घराचे रंगकाम करायचे आहे, असे पत्नीला सांगून उमेश नाईक घराबाहेर पडले होते. बराच वेळ घरी न परतल्यामुळे कुटुंबीयांनी त्यांना फोन केला. मात्र, उमेश नाईक यांनी कोणताही प्रतिसाद न दिल्याने काहीजण त्यांना शोधण्यासाठी जुन्या घरी गेले.

त्याठिकाणी पोहोचल्यावर घराचा दरवाजा आतून बंद होता. अखेर घराचा दरवाजा तोडून आतमध्ये प्रवेश केला तेव्हा स्लॅबच्या गजाला लटकून उमेश नाईक यांनी गळफास घेतल्याचे दिसून आले.

वडिलांच्या निधनानंतर संपूर्ण कुटुंबाची सामूहिक आत्महत्या

कोरोनाची दुसरी लाट गुजरातसह संपूर्ण देशात हाहाकार माजवत आहे. यातही सौराष्ट्रमध्ये कोरोनाचा प्रकोप शिगेला पोहोचलेला आहे. भगवान श्रीकृष्णाची नगरी म्हणून प्रसिद्ध असलेल्या देवभूमी द्वारकेतही कोरोनामुळे एका कुटुंबानं आपली जीवनयात्रा संपवल्याची धक्कादायक बातमी समोर आलीय. द्वारकेतल्या एका कुटुंबातील कर्त्या व्यक्तीचे कोरोनाने निधन झालं, त्यानंतर संपूर्ण कुटुंबाने आत्महत्या केली. द्वारका येथील रहिवासी जयेश भाई जैन नाश्त्याचे दुकान चालवत होते. गुरुवारी रात्री कोरोनाच्या विळख्यात सापडल्यानंतर त्यांचा मृत्यू झाला. जेव्हा निधनाची बातमी समोर आली, तेव्हा संपूर्ण कुटुंबात भीतीचं वातावरण निर्माण झाले. त्यानंतर शुक्रवारी सकाळी जयेश भाईचा अंत्यसंस्कार करून त्यांची पत्नी साधना बेन आणि दोन मुले कमलेश आणि दुर्गेश जैन यांनीही आत्महत्या केली. या तिघांनीही विष प्राशन करून स्वत: ची जीवनयात्रा संपवल्याचं सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या:

लग्नाच्या चार दिवसांआधी नवरदेवाला कोल्ड्रिंकमधून विष पाजलं, नववधूसह प्रियकराला अटक

लग्न ठरलं, मुलीचं बॉयफ्रेंडसोबत फोनवर बोलणं खटकलं, होणाऱ्या पतीने तिच्या प्रियकराचा जीवच घेतला

(Shivsena leader Umesh Naik suicide in Nashik)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.