‘यांनी’ पुन्हा निवडून यावं,मुख्यमंत्र्यांना 1 लाख लिटर दुधाचा अभिषेक घालतो; …आणि प्रॉपर्टीही दान करतो ; बंडखोर आमदारांना युवासेनेचे चॅलेंज

कानाखाली मारण्याचे शिवसैनिकांना आवाहन करणारे आमदार संतोष बांगर यांनाही दिलीप घुगे यांनी आवाहन दिले आहे. दिलीप घुगे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका करताना त्यांनी संतोष बांगर पुन्हा निवडून येणार नाहीत असं सांगितले असून आमदार संतोष बांगर यांनीही पुन्हा निवडून येऊन दाखवावं आणि पुन्हा निवडून आले तर माझी प्रॉपर्टी दान करेन असंही दिलीप घुगे यांनी जाहीररित्या सांगितले आहे.

'यांनी' पुन्हा निवडून यावं,मुख्यमंत्र्यांना 1 लाख लिटर दुधाचा अभिषेक घालतो; ...आणि प्रॉपर्टीही दान करतो ; बंडखोर आमदारांना युवासेनेचे चॅलेंज
Follow us
| Updated on: Aug 20, 2022 | 8:30 AM

हिंगोलीः विधान परिषदेच्या निकालानंतर (Vidhan Parishad Result 2022) मुंबई-सुरत-गुवाहाटी-गोवा आणि पुन्हा मुंबई असा प्रवास करुन बंडखोर आमदारांनी राज्यातील मविआ सरकारला पायउतार केले गेले. त्यानंतर सत्तास्थापना होईपर्यंत राज्यातील राजकीय वातावरण प्रचंड ढवळून निघाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबरोबर ज्या आमदारांनी बंडखोरी केली होती, त्यांच्यावर शिवसेनेतून जोरदार टीका होत असताना गद्दार म्हणून त्यांच्यावर शिक्काही मारण्यात आला. बंडखोर आमदारांवर (Rebel MLA) ज्यावेळी गद्दार आमदार म्हणून टीका होऊ लागली त्यावेळी शिवसेनेसाठी रडून भावनिक आवाहन करणारे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी काही दिवसात शिंदे गटात सहभागी झाले. बांगर शिंदे गटात सामील झाल्यानंतर ज्याप्रमाणे रडण्याचे सोंग घेत शिंदे गटाला ज्याप्रमाणे त्यांनी आवाहने केले त्याच प्रमाणे त्यांनी शिंदे गटात सामील होताच बंडखोर आमदारांनी कोणी गद्दार म्हणेल त्यांच्या कानाखाली आवाज काढा असं आपल्या समर्थकांना त्यांनी सुनावलं. त्यामुळे बंडखोरी नाट्यात आमदार संतोष बांगर प्रचंड लोकप्रिय झाले. त्यामुळे आताही त्यांच्यावर टीका होत असतानाच खासदार हेमंत पाटील (MP Hemant Patil) आणि आमदार संतोष बांगर यांना हिंगोलीच्या युवासेनेकडून जाहीर आव्हान देण्यात आले आहे.

1-1 रुपया जमा करून दुध जमा करणार

शिवसेनेचे खासदार हेमंत पाटील यांनी शिवसेनेतून शिंदे गटात सामील झाल्यानंतर त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. हेमंत पाटील बंडखोरी करण्याआधी ही अफवा असल्याचे सांगत होते, मात्र ज्यावेळी त्यांनी शिंदे गटात सामील झाले त्यावेळी मात्र त्यांच्यावर प्रचंड टीका करण्यात आली. त्यामुळेच हेमंत पाटील पुन्हा निवडून आले तर 1-1 रुपया जमा करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना 1 लाख लिटर दुधाने अभिषेक घालीन असं जाहीर आवाहन हिंगोलीच्या युवासेना राज्य विस्तारक दिलीप घुगे यांच्याकडून करण्यात आले आहे.

माझी प्रॉपर्टी दान

त्याचप्रमाणे कानाखाली मारण्याचे शिवसैनिकांना आवाहन करणारे आमदार संतोष बांगर यांनाही दिलीप घुगे यांनी आवाहन दिले आहे. दिलीप घुगे यांनी बंडखोर आमदारांवर जोरदार टीका करताना त्यांनी संतोष बांगर पुन्हा निवडून येणार नाहीत असं सांगितले असून आमदार संतोष बांगर यांनीही पुन्हा निवडून येऊन दाखवावं आणि पुन्हा निवडून आले तर माझी प्रॉपर्टी दान करेन असंही दिलीप घुगे यांनी जाहीररित्या सांगितले आहे.

दुधाचा अभिषेक

युवासेना राज्य विस्तारक दिलीप घुगे यांनी आमदार संतोष बांगर आणि खासदार हेमंत पाटील यांना जाहीर आव्हान दिल्याने हे राजकारण आणखी तापणार असल्याचे दिसत आहे. बांगर आणि हेमंत पाटील यांनी निवडून येऊन दाखवले तर एक एक रुपये जमा करुन दुधाने अभिषेक घालणार असल्याचेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले आहे.

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.