आम्हाला तयारीची गरज नाही, शिवतीर्थावर गर्दी होणारच, ‘या’ शिवसेना नेत्या काय म्हणाल्या ?

शिवसेनेचा दरवर्षी शिवतीर्थावर दसरा मेळावा होत असतो. यंदाच्या वर्षी शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर दोन गट निर्माण झाले आहे. त्यामुळे दोन ठिकाणी दसरा मेळावा होणार आहे.

आम्हाला तयारीची गरज नाही, शिवतीर्थावर गर्दी होणारच, 'या' शिवसेना नेत्या काय म्हणाल्या ?
Image Credit source: FACEBOOK
Follow us
| Updated on: Sep 27, 2022 | 8:54 PM

नाशिक : दसरा मेळाव्यावरुण शिवसेनेतील (SHIVSENA) उद्धव ठाकरे (UDDHAV THACKERAY) आणि एकनाथ शिंदे (EKNATH SHINDE) यांच्या दोन्हीही गटाकडून दसरा मेळाव्याच्या (DASSEHRA ) तयारीच्या हालचाली सुरू आहेत. त्यातच कुणाच्या मेळाव्याला जास्त गर्दी होणार याबाबत चर्चा सुरू असतांना दोन्हीही गटाकडून जोरदार प्रयत्न केले जात आहे. त्यातच शिवसेनेच्या नेत्या नीलम गोऱ्हे यांनी शिवतीर्थावर गर्दी होणारविश्वास व्यक्त केला आहे. आम्हाला तयारीची गरज नाही, शिवतीर्थावर गर्दी होणारच असे नीलम गोऱ्हे यांनी नाशिक दौऱ्यावर असतांना विश्वास व्यक्त केला आहे. माध्यमांशी संवाद साधत असतांना नीलम गोऱ्हे यांनी हे विधान करत शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला कुणाला बोलवण्याची आवश्यकता नसून ठाकरेंचे विचार ऐकण्यासाठी सर्वच येतात असे म्हणत शिंदे गटाच्या मेळाव्यापेक्षा जास्त गर्दी शिवतीर्थावर असेल असा विश्वास व्यक्त केला.

शिवसेनेचा दरवर्षी शिवतीर्थावर दसरा मेळावा होत असतो. यंदाच्या वर्षी शिवसेनेत उभी फुट पडल्यानंतर दोन गट निर्माण झाले आहे. त्यामुळे दोन ठिकाणी दसरा मेळावा होणार आहे.

उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क येथील मैदानावर मेळावा घेण्यासाठी न्यायालयाकडून परवानगी मिळाली आहे. तर एकनाथ शिंदे गटाचा मेळावा हा बीकेसी मैदानावर होणार आहे.

शिवसेनेचा दसरा मेळावा ही परंपरा असल्याने दसऱ्याच्या दिवशी मोठ्या संख्येने राज्यातील शिवसैनिक शिवाजी पार्कवर उपस्थित असतात.

यंदा मात्र, दोन्ही ठिकाणी दसरा मेळावा होणार असल्याने गर्दी जमविण्याचे आवाहन निर्माण झाले आहे. त्यामुळे दोन्ही गटाकडून गर्दी जमविण्यासाठी बैठकांचे सत्र सुरू आहे.

एकनाथ शिंदे यांच्या गटाचे सर्व मंत्री, आमदार, खासदार हे जिल्ह्यांमध्ये बैठका घेत असून तयारी सुरू झाली आहे. याशिवाय ठाकरे गटाच्या समर्थकांकडून देखील याबाबत आढावा घेतला जात आहे.

त्यातच प्रत्येक गटाकडून आमच्याच दसरा मेळाव्याला गर्दी राहील असा विश्वास व्यक्त केला जात आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या नीलम गोऱ्हे यांनी देखील शिवतीर्थावर शिवसैनिकांचीच जास्त गर्दी असेल असा विश्वास व्यक्त केला आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.