उदय सामंतांची श्रीकांत देशपांडेंच्या प्रचारार्थ सभा, अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या

त्यावेळी प्रचारसभेत अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकामी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (Shrikant Deshpande Campaign More than half the seats Empty)

उदय सामंतांची श्रीकांत देशपांडेंच्या प्रचारार्थ सभा, अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकाम्या
. राज्यात महाविकासआघाडीची सत्ता आल्यानंतर उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले. त्यांनी पक्षप्रमुख असताना जी भूमिका घेतली तीच भूमिका मुख्यमंत्री झाल्यावरही कायम आहे, असे उदय सामंत यांनी सांगितले.
Follow us
| Updated on: Nov 20, 2020 | 10:20 AM

अकोला : उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री तसेच शिवसेना नेते उदय सामंत यांनी आयोजित केलेल्या श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारसभेत अर्ध्यावरून जास्त खुर्च्या रिकाम्या दिसून आल्या आहेत. अमरावती विभाग शिक्षक मतदार संघ आघाडीचे उमेदवार श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारासाठी उदय सामंत अकोल्यात आले होते. त्यावेळी प्रचारसभेत अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकामी असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. (Shrikant Deshpande Campaign More than half the seats Empty)

राज्यातल्या 3 पदवीधर आणि 2 शिक्षक मतदारसंघांची निवडणूक येत्या 1 डिसेंबर रोजी होणार आहे. औरंगाबाद, पुणे, नागपूर विभागाच्या पदवीधर मतदारसंघाची तर अमरावती आणि पुणे विभागाच्या शिक्षक मतदारसंघांची निवडणूक होत आहे. यात अमरावती शिक्षक मतदारसंघातून शिवसेनेच्या श्रीकांत देशपांडे यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

अमरावती शिक्षक संघाच्या निवडणुकीच्या प्रचाराला सुरुवात झाली आहे. यासाठी तब्बल 27 उमेदवार रिंगणात असून जो तो आपले नशीब आजमावत आहे. पण आता प्रत्येक उमेदवाराला मीच विजयी होणार, असे वाटायला लागले आहे. श्रीकांत देशपांडे यांना विजयी करण्यासाठी शिवसेनेने कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर उदय सामंत यांनी श्रीकांत देशपांडे यांच्या प्रचारार्थ सभा आयोजित केली आहे.

अकोला शहरातील न्यू इंग्लिश शाळेच्या हॉलमध्ये सभा घेण्यात आली. या सभेत महाविकासआघाडीचे सर्वच आमदार यावेळी उपस्थित होते. पण राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी मात्र या कार्यक्रमात गैरहजर असल्याचे दिसून आले. तसेच या प्रचारसभेदरम्यान अर्ध्याहून अधिक खुर्च्या रिकामी होत्या. यावेळी श्रीकांत देशपांडे यांचा विजय निश्‍चित आहे, असे वक्तव्य उदय सामंत यांनी केले.

महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची यादी :

1) अमरावती शिक्षक मतदारसंघ – श्रीकांत देशपांडे (शिवसेना) 2) पुणे शिक्षक मतदारसंघ – जयंत आसगांवकर (काँग्रेस) 3) पुणे पदवीधर मतदारसंघ – अरुण लाड (राष्ट्रवादी काँग्रेस) 4) औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ – सतीश चव्हाण (राष्ट्रवादी काँग्रेस) 5) नागपूर पदवीधर मतदारसंघ – अभिजित वंजारी (काँग्रेस)

(Shrikant Deshpande Campaign More than half the seats Empty)

संबंधित बातम्या : 

विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघासाठी महाविकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार जाहीर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची प्रक्रिया नव्याने जाहीर होणार; उमेदवारांना अर्ज दाखल करण्याचा मार्ग मोकळा

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.