Shrikant Shinde : खूप अभिमान वाटतो बाबा !… खासदार श्रीकांत शिंदे यांची वडिलांसाठी भावूक पोस्ट; एकनाथ शिंदे यांच्या त्यागाचा भरभरून उल्लेख

एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या वडिलांसाठी एक खास, भावनिक पोस्ट लिहीली आहे. गोर - गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे, असे त्यांनी नमूद केलं आहे.

Shrikant Shinde : खूप अभिमान वाटतो बाबा !... खासदार श्रीकांत शिंदे यांची वडिलांसाठी भावूक पोस्ट; एकनाथ शिंदे यांच्या त्यागाचा भरभरून उल्लेख
Follow us
| Updated on: Nov 28, 2024 | 11:26 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे निकाल येताच महायुतील बहुमताचा कौल मिळाला. तेव्हापासूनच राज्यात मुख्यमंत्री कोण याचा सस्पेन्स वाढला आहे. त्यावरून राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. भाजपाचे नेते देवेंद्र फडणवीस यांचे नाव पुन्हा समोर येत असून काल काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेत त्यांची भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अखेर मुख्यमंत्रीपदावरचा दावा सोडण्याचे संकेत दिले. लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख आपल्यासाठी महत्वाचे असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केलं. त्यांच्या या निर्णयानंतर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा मार्ग मोकळा झाल्याचे दिसत असून आज भाजपचे वरिष्ठ नेते काय भूमिका घेतात त्याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

याचदरम्यान एकनाथ शिंदे यांचे पुत्र आणि खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपल्या वडिलांसाठी एक खास, भावनिक पोस्ट लिहीली आहे. गोर – गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे. खूप अभिमान वाटतो बाबा! अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांचे कौतुक करत ही पोस्ट लिहीली असून त्याची सध्या सर्वत्र चर्चा आहे.

श्रीकांत शिंदे यांची पोस्ट काय ?

मला माझे बाबा आणि आमचे शिवसेना मुख्यनेते मा.ना.श्री.एकनाथजी शिंदे साहेब यांचा खूप अभिमान वाटतो. त्यांची महाराष्ट्र आणि येथील जनतेशी असलेली अतूट बांधिलकी अतुलनीय आहे. त्यांनी अहोरात्र अथक परिश्रम केले. समाजातील प्रत्येक घटकाची निस्वार्थ सेवा करून त्यांचे प्रेम, विश्वास आणि प्रशंसा मिळवली. ते स्वतःला ‘सीएम’ म्हणजे ‘कॉमन मॅन’ समजत. त्यांनी सर्वसामान्यांसाठी वर्षा बंगल्याचे दार उघडले आणि जनसेवेत एक नवा इतिहास घडवला.

कारकिर्दीच्या शिखरावर असतानाही त्यांची नम्रता आणि कर्तव्यभावना दिसून येते. आज त्यांनी माननीय पंतप्रधान श्री. नरेंद्र मोदीजी आणि माननीय श्री. अमित शहाजी यांच्यावर विश्वास ठेवून, वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा युती धर्माचे पालन करत एक प्रगल्भ उदाहरण ठेवले आहे असे श्रीकांत शिंदे यांनी नमूद केलं.

सत्तेचा मोह भल्याभल्यांना असतो पण..

सत्ता आणि पद अनेकदा सार्वजनिक जीवनावर वर्चस्व गाजवते. भल्याभल्यांना मोहात पाडते, पण शिंदे साहेब अपवाद ठरले. त्यांच्यासाठी जनसेवा आणि राष्ट्रनिर्मिती हे नेहमीच सर्वोच्च प्राधान्य राहिले आहे आणि त्यांचा वारसा पुढील पिढ्यांना प्रेरणा देत राहील. गोर – गरिबांचा आशीर्वाद आणि सदिच्छा हीच शिंदे साहेबांची खरी संपत्ती आहे अशा शब्दांत श्रीकांत शिंदे यांनी एकनाथ शिंदे यांच्यासाठी पोस्ट लिहीली.

खूप अभिमान वाटतो बाबा! असेही त्यांनी लिहीलं आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले ?

आपण नाराज नसल्याचं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं. मुख्यमंत्रीपदाचा दावा सोडला का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना यावेळी विचारण्यात आला. त्यावर त्यांनी “आम्ही महायुतीचे लोक आहोत. त्यांनी अडीच वर्ष मला पाठिंबा दिला आहे. महायुतीचा मुख्यमंत्री होत आहे. वरिेष्ठ जो निर्णय घेतील तो मान्य. आमचं पूर्ण समर्थन त्यांच्या उमेदवाराला आहे”, असं मोठं वक्तव्य एकनाथ शिंदे यांनी केलं.

सामान्य शिवसैनिकाला मुख्यमंत्री बनवण्याचं स्वप्न बाळासाहेब ठाकरे यांचं होतं. ते मोदी आणि शाह यांनी पूर्ण केलं. ते माझ्यापाठी पहाडासारखे राहिले. मी अडीच वर्षात एकही सुट्टी घेतली नाही. दिवस-रात्र काम केलं. कॉमन मॅनचा मुख्यमंत्री म्हणून मी काम केलं. लाडका भाऊ ही माझी ओळख झाली. ही ओळख सर्वात मोठी आहे, असं मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलं.

धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?
पुण्यातील FC रोडवर आकांकडून 7 दुकानं बुक, आकाकडे किती संपत्ती?.
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट
दादांचा पत्रकार परिषदेतून थेट अधिकाऱ्याला फोन अन् मिनिटात केलं खरं-खोट.
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'
मुंडेंच्या राजीनाम्यावर दादांनी सोडलं मौन, 'व्याकूळ होऊन राजीनामा...'.
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'
धसांचा नवा अंदाज, भावूक होत म्हणाले 'कल खेल में हम हो ना हो...'.
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य
दिल्लीत केजरीवाल जिंकणार? महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्याचं वक्तव्य.
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर
'मुंडेंचे चिल्लर चाळे अन्...',पैठणच्या मोर्च्यात जरांगेंचा राग अनावर.
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस
'लाडकी बहीण'चा अध्यक्ष वाल्मिक कराडच, 14 गुन्हे तरीही मुंडेंची शिफारस.
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?
'कोणाला तिकडे जायचं असेल तर त्यांनी...', बैठकीत जयंत पाटील आक्रमक?.