शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम आणि त्याचा भाऊ वर्षाभरासाठी हद्दपार

सध्या श्रीपाद छिंदम त्यांच्यावर संघटीतपणे टोळी तयार करणे, गैरकायद्याची मंडळी जमवल्याप्रकरणी त्या दोघांवरही गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा श्रीपाद छिंदम आणि त्याचा भाऊ वर्षाभरासाठी हद्दपार
Follow us
| Updated on: Jun 06, 2022 | 6:30 PM

अहमदनगर: छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल (Chhatrapati Shivaji Maharaj) आक्षेपार्ह वक्तव्य करणारा माजी नगरसेवक श्रीपाद छिंदम (Shripad Chhindam) आणि त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम ( Shrikant Chhindam) या दोघांनाही अहमदनगर जिल्ह्यातून एक वर्षासाठी हद्दपार (Deported) केले जाणार आहे. मागील काही महिन्यापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्याबद्दल अहमदनगरमधील तोफखाना पोलीस स्थानकात त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता.

सध्या श्रीपाद छिंदम त्यांच्यावर संघटीतपणे टोळी तयार करणे, गैरकायद्याची मंडळी जमवल्याप्रकरणी त्या दोघांवरही गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

जातीवचक शिवीगाळ

याआधीही त्या दोघांवर अनेक गुन्हे दाखल केले गेले आहेत. जातीवाचक शिवीगाळप्रकरणीही त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या अशा विविध कारणांमुळे त्यांच्यावर सतत पोलिसांकडून सूचना आणि कारवाई करण्यात येते. आताही पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी त्यांनी टोळी तयार करण्यासारखे त्यांच्याकडून गुन्हे होत असल्याने पोलीस अधीक्षक यांनी त्यांच्या हद्दपारीचे आदेश काढले आहेत. या आदेशाबरोबरच छिंदम बंधूंविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात विविध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

गुंडगिरी करणे, तरुणांचे टोळकं कायम बरोबर

अहमदनगरमध्ये छिंदम यांची पार्श्वभूमी गुन्हेगारीची आहे. गुंडगिरी करणे, तरुणांचे टोळकं कायम बरोबर घेऊन फिरणे अशा प्रकारचे गुन्हे त्यांच्याकडून सतत होत असतात. मात्र ज्यावेळी छिंदमने महाराजांबद्दल अपशब्द काढले, तेव्हा लोकांनी छिंदम यांच्यासोबतच त्यांच्या साथीदारांच्या घरावरही दगडफेक केली होती.

 महाराष्ट्रभर त्यांच्याविरोधात मोर्चे

छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षपार्ह वक्तव्य केल्याबद्दल महाराष्ट्रभर त्यांच्याविरोधात मोर्चे आणि आंदोलने करण्यात आली होती. त्याप्रकरणानंतर छिंदम याच्यासोबत त्यांच्या साथीदारांनाही नगर सोडावं लागलं होते. छिंदम ज्या प्रभाग 9 मधून निवडणूक लढले, तिथं 11 हजार 229 मतं आहेत. त्यात पद्मशाली समाजाची 2500 मतं आहेत. असल्याचे सांगण्यात येत आहे.

Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.