शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळणारा श्रीपाद छिंदम नगरमधून तडीपार
कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अहमदनगर महापालिकेचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमला अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय. महापालिका निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून सुरु करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत छिंदमसह पाच जणांना हद्दपार करण्यात आलं. तर 14 जणांना सशर्त शहरात वास्तव्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर […]
कुणाल जायकर, टीव्ही 9 मराठी, अहमदनगर : छत्रपती शिवरायांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारा अहमदनगर महापालिकेचा माजी उपमहापौर श्रीपाद छिंदमला अहमदनगर जिल्ह्यातून तडीपार करण्यात आलंय. महापालिका निवडणूक काळात कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून सुरु करण्यात आलेल्या प्रतिबंधात्मक कारवाई अंतर्गत छिंदमसह पाच जणांना हद्दपार करण्यात आलं. तर 14 जणांना सशर्त शहरात वास्तव्याची परवानगी देण्यात आली आहे. प्रांताधिकारी उज्ज्वला गाडेकर यांनी आदेश दिले आहेत.
अहमदनगरच्या महापालिकेसाठी 9 डिसेंबरला मतदान होणार आहे. त्यासाठी छिंदम महापालिका निवडणुकीच्या मैदानात उतरला आहे. छिंदम प्रभाग 9 मधून सर्वसाधारण जागेसाठी अपक्ष अर्ज दाखल केला. तर त्याची पत्नीही प्रभाग क्र. 13 मधून अपक्ष निवडणूक लढवणार आहे. त्यामुळे छिंदमला जिल्ह्याबाहेरून प्रचार करावा लागणार आहे.
श्रीपाद छिंदम निवडणुकीच्या रिंगणात उतरल्यापासूनच सर्वांच्या भुवया उंचावल्या होत्या. कारण शिवरायांबद्दल आक्षेपार्ह बरळल्यानंतर त्याला अटकही झाली होती आणि तो शिवप्रेमींच्या निशाण्यावरही आला होता. पण तडीपारीच्या कारवाईमुळे श्रीपद छिंदम निवडणूक लढत असला तरी त्याला शहरात राहून प्रचार मात्र करता येणार नाही हे स्पष्ट झालंय.
शिवजयंतीच्या तोंडावर महापालिकेतील बांधकाम विभागाच्या कर्मचाऱ्याशी कामासंदर्भात फोनवरुन बोलताना, छिंदमने शिवराय आणि शिवजयंतीबद्दल आक्षेपार्ह विधान केलं होतं. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर नगर जिल्ह्यात एकच खळबळ उडाली. सर्वच स्तरातून छिंदमबद्दल संताप व्यक्त केला गेला. यानंतर छिंदमवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. मात्र तो जामिनावर बाहेर आला.