श्रीवर्धनच्या सुपारीने ‘भाव’ खाल्ला, निसर्ग, तौक्ते वादळामुळे उत्पादन घटले, प्रती मण 7520 रुपये
निसर्ग संकटामुळे श्रीवर्धन तालुक्यातील सुपारीचे वार्षिक उत्पादन 1 लाख 30 हजार किलोवरून 50 हजार किलोवर आले आहे.
गेल्या तीन वर्षांत कधी निसर्ग तर कधी तौक्ते वादळाचे संकट कोकणात ओढवले. त्याचा फटका श्रीवर्धनच्या प्रसिद्ध रोटा सुपारीला बसला आहे. उत्पादन घटल्यामुळे या सुपाऱ्यांनी ‘भाव’ खाल्ला असून प्रती मण 7 हजार 520 रुपये एवढा मागणी आहे. दर झाला आहे. रोटा सुपारीला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असली तरी तेवढ्या प्रमाणात पुरवठा होत नसल्याने भाव वाढला आहे.
रायगड जिल्ह्यात सुपारी लागवडीखालील क्षेत्र पाच हजार हेक्टरवर आहे. यातून दरवर्षी साधारणपणे 35 ते 40 कोटींची उलाढाल होत असते. अलिबाग, मुरुड, श्रीवर्धन तालुक्यांतील किनारपट्टीवरील भागात प्रामुख्याने सुपारीच्या बागा आहेत. श्रीवर्धनची रोटा सुपारी ही प्रसिद्ध आहे. या सुपारीत पांढरा
भाग जास्त असतो. त्यात आरसेक्लोनीन या रसायनाचे प्रमाण कमी असते. इतर सुपाऱ्यांच्या तुलनेत ती चवीला जास्त चांगली असते. सुगंधी सुपारी आणि पान मसाला उत्पादनासाठी या सुपारीला जास्त
आखाती देश आणि अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशात निर्यात केली जाते. श्रीवर्धन येथील सुपारी संशोधन केंद्राने संशोधन करून नवीन प्रजाती विकसित केल्या आहेत. आज चौदा प्रकारच्या सुपारीच्या प्रजातींची कोकणात लागवड केली जाते. आंबा, काजू आणि नारळाच्या तुलनेत सुपारीची लागवड आणि संगोपन खर्च कमी आहे. यातून मिळणारे उत्पन्नही चांगले असते. त्यामुळे फायदेशीर फळपीक म्हणून याकडे बघितले जात आहे.
80 हजार रोपे तयार करण्याचे काम सुरू
निसर्ग संकटामुळे श्रीवर्धन तालुक्यातील सुपारीचे वार्षिक उत्पादन 1 लाख 30 हजार किलोवरून 50 हजार किलोवर आले आहे. अलिबाग तालुक्यातील वार्षिक उत्पादन 44 हजार किलोवरून 33 हजार किलो एवढे झाले. तर मुरुड तालुक्यातील सुपारीचे वार्षिक उत्पादन 1 लाख 16 हजार किलोवरून 44 हजार 480 किलोवर आले आहे. रायगड जिल्ह्यात सुपारीच्या रोपांची कमतरता लक्षात घेऊन अलिबागच्या आवास येथील रोपवाटिकेत 80 हजार रोपे तयार करण्याचे काम सुरू केले असल्याची माहिती मुरूड सुपारी संघाचे संचालक जगदिश पाटील यांनी दिली.