Video : कारखाना ऊस तोड नसल्याने शेतकऱ्याने आपल्याच शेतातील ऊस पेटवला
अहमदनगर जिल्ह्यातील नेवासा येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात उभ्या असलेल्या ऊसाला आग लावली.
अहमदनगर : जिल्ह्यातील नेवासा येथील शेतकऱ्याने आपल्या शेतात उभ्या असलेल्या ऊसाला आग लावली. मुळा साखर कारखाना (Mula Sugar Factory) जाणीवपूर्वक ऊसतोड करत नसल्याचा आरोप शेतकरी करत आहेत. शेतकरी ऊस ज्वलन आंदोलनाद्वारे आपला संताप व्यक्त करतायत तर राजकीय विरोधातून ही केवळ स्टंन्टबाजी केली जात असल्याच कारखाना प्रशासनाने म्हटलंय. (Since the factory did not break the Sugarcane, the farmer fire to the Sugarcanecane in his own Farm)
नेवासा तालुक्यातील करंजगाव येथील अशोक टेमक या शेतकऱ्याने आपल्या शेतातील उभ्या ऊसाला आग लावलीय. केवळ राजकीय विरोधक असल्याने मुळा सहकारी साखर कारखाना माझ्यावर अन्याय करत असल्याचा आरोप या शेतकऱ्याने केलाय.
जेष्ठ नेते यशवंतराव गडाख, जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांच्या नेतृत्वाखाली मुळा सहकारी साखर कारखाना चालवला जातोय. अनेकदा ऊस नोंद करायला जाऊनही नोंद घेतली नसल्याचं शेतकऱ्याचं म्हणणं आहे.
अशोक टेमक यांनी आपल्या शेतातील दहा गुंठे क्षेत्रात असलेल्या उसाला कारखाना प्रशासनाच्या निषेधार्थ स्वतः आग लावलीय. माझ्यावर जसा अन्याय होतोय, त्याच पद्धतीने दुसऱ्या शेतकऱ्यांवरही अन्याय होतोय, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे.
मुळा सहकारी साखर कारखाना परिसरात 34 लाख टन ऊसाचे क्षेत्र आहे. कारखाना 14 लाख टन ऊसाचे गाळप करू शकतो. ज्या तीस हजार शेतकऱ्यांनी कारखान्याकडे ऊसाच्या नोंदी केल्या आहेत. त्यांच्या ऊसाला अगोदर तोड येणार आहे. एकाचवेळी सगळा ऊस कसा तोडला जावू शकतो. सदर शेतकऱ्याने ऊसाची नोंदही केली नाही. आजचा प्रकार हा केवळ राजकीय स्टंटबाजी असून गडाखांना बदनाम करण्यासाठी हे सुरु असल्याचं कारखान्याचे चेअरमन नाना तूवर यांनी सांगितलंय.
पाहा व्हिडीओ :
(Since the factory did not break the Sugarcane, the farmer fire to the Sugarcanecane in his own Farm)
हे ही वाचा :
शशिकांत शिंदेंसोबत दिलजमाईचे संकेत, शिवेंद्रराजेंचे ‘राष्ट्रवादी पुन्हा’?