चिपी विमानतळाचं उद्धाटनाचा मुहूर्त पुढे ढकलला, कारण काय?

उदय सामंत आणि विनायक राऊत यांनी याबाबतची माहिती दिली. (Sindhudurg Chipi airport Inauguration Programme Postpone)

चिपी विमानतळाचं उद्धाटनाचा मुहूर्त पुढे ढकलला, कारण काय?
Follow us
| Updated on: Jan 17, 2021 | 5:45 PM

मुंबई : सिंधुदुर्गमधील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्धाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. येत्या 23 जानेवारीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते या चिपी विमानतळाचे उद्धाटन करण्यात येणार होते. मात्र विमानसेवा सुरू करण्यासाठी आणखी काही वेळ जावा लागेल,  पुढे ढकलण्यात आला आहे. नुकतंच मंत्री उदय सामंत आणि विनायक राऊत यांनी याबाबतची माहिती दिली. (Sindhudurg Chipi airport Inauguration Programme Postpone)

“चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. केंद्र सरकारने चिपी विमानतळ सुरू करण्यास कुठलीही आडकाठी केलेली नाही. माञ 23 जानेवारीला विमानतळ सुरू करण्याची कोणतीही परवानगी मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री म्हणून मी दिलेली नाही,” अशी प्रतिक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली.

“चिपी विमानतळाची जी निमंत्रण पत्रिका सर्व ठिकाणी दाखवली जाते. ती अद्याप फायनल झालेली नाही. यासाठी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री संपूर्ण सहकार्य करत आहेत. मात्र विमानसेवा सुरू करण्यासाठी ते पूर्ण सुरक्षित असलं पाहिजे. यासाठी थोडा आणखी वेळ जाईल,” अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपी विमानतळ पाहणी दौऱ्यानंतर दिली.

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून 23 जानेवारीला चिपी विमानतळाचे उद्घाटन केले जाणार अशी माहिती समोर येत होती. या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि भाजपचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती असेल, असे कार्यक्रमाच्या पत्रिकेत लिहिण्यात आले होते.

संबंधित आय. आर. बी. कंपनीने याबाबतची माहिती दिली आहे. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मोठ्या कालावधीनंतर नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसणार होते. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र हा कार्यक्रम अखेर रद्द करण्यात आला आहे. (Sindhudurg Chipi airport Inauguration Programme Postpone)

संबंधित बातम्या :

चिपी विमानतळाचं उद्घाटन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर येणार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.