सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळ सुरु करण्यासाठी नवा मुहूर्त, विनायक राऊतांची मोठी घोषणा

आता विनायक राऊतांनी येत्या गणेशचतुर्थीपूर्वी चिपी विमानतळावरुन विमान प्रवास सुरु होईल, अशी माहिती दिली आहे. मात्र अद्याप याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळ सुरु करण्यासाठी नवा मुहूर्त, विनायक राऊतांची मोठी घोषणा
Sindhudurg Chipi airport
Follow us
| Updated on: Jul 10, 2021 | 1:19 PM

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाची वाहतूक सुरु करण्यासाठी नवा मुहूर्त मिळाला आहे. येत्या गणेशचतुर्थीपूर्वी चिपी विमानतळावरुन विमान प्रवास सुरु होईल, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली आहे. नुकतंच विनायक राऊतांनी आमदार दिपक केसरकर यांच्यासोबत चिपी विमानतळाची पाहणी केली आहे. यावेळी पत्रकार परिषद घेत त्यांनी याबाबतची माहिती दिली. (Sindhudurg Chipi airport Will Start Before Ganesh Chaturthi 2021 said MP Vinayak Raut)

रनवेच्या पुर्नबांधणीचं काम पूर्ण

सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळावरून गणेशचतुर्थीपूर्वी विमान प्रवास सुरु होणार आहे. काही महिन्यांपूर्वी डीजीसीए आणि एअरपोर्ट अथॉरिटीने ज्या दुरुस्त्या सुचवल्या होत्या, त्याचे तंतोतंत पालन करुन आता एअरपोर्ट वाहतुकीसाठी सज्ज झाला आहे. यासाठी जवळपास तीनशे ते साडेतीनशे कर्मचारी तसेच पंजाबवरुन मशिनरी आणि बाहेरून इतर टेक्नॉलजी मागवली होती. त्यांनी रनवेच्या पुर्नबांधणीचं काम व्यवस्थित केलं आहे. त्याचा रिपोर्ट आयआरबी कंपनीने डीजीसीएकडे पाठवला आहे, असे विनायक राऊत म्हणाले.

लायसन्स मिळाल्यानंतर आठ दिवसात एअरपोर्ट पुन्हा सुरु होणार

यानंतर आता डीजीसीएने पाहणी करुन या विमानतळाला लायसन्स दिलं की कोणत्याही क्षणी विमान वाहतूक सुरु होईल. विमान कंपनीचे अधिकारी इथे येऊन थांबलेले आहेत. त्यांचे तिकीट काऊंटर देखील तयार आहे. त्यामुळे लायसन्स मिळाल्यानंतर आठ दिवसात हा एअरपोर्ट पुन्हा सुरु होईल, अशी माहिती विनायक राऊत यांनी पत्रकार परिषदेवेळी दिली.

कोणतीही अधिकृत माहिती नाही

दरम्यान काही दिवसांपूर्वी सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाची वाहतूक 1 मार्चपासून सुरु होईल, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली होती. चिपी विमानतळावर कालपासून ट्रायल लँडींग सुरु झाली आहे. त्यामुळे आता लवकरच नियमित सेवा सुरु होईल. येत्या काही दिवसातच डीजीसीएची टीम येईल. त्यानंतर 1 मार्चपासून नियमितपणे सिंधुदुर्ग ते मुंबई आणि अहमदाबाद ते सिंधुदुर्ग अशी विमान वाहतूक सुरु होईल, असे विनायक राऊत म्हणाले होते. त्यानतंर आता विनायक राऊतांनी येत्या गणेशचतुर्थीपूर्वी चिपी विमानतळावरुन विमान प्रवास सुरु होईल, अशी माहिती दिली आहे. मात्र अद्याप याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

उद्धाटनाचा मुहूर्त पुढे ढकलला

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून 23 जानेवारीला चिपी विमानतळाचे उद्घाटन केले जाणार अशी माहिती समोर येत होती. या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि भाजपचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती असेल, असे कार्यक्रमाच्या पत्रिकेत लिहिण्यात आले होते.

संबंधित आय. आर. बी. कंपनीने याबाबतची माहिती दिली आहे. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मोठ्या कालावधीनंतर नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसणार होते. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र या उद्धाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.

(Sindhudurg Chipi airport Will Start Before Ganesh Chaturthi 2021 said MP Vinayak Raut)

संबंधित बातम्या :

Chipi Airport | चिपी विमानतळाची वाहतूक ‘या’ तारखेपासून सुरु होणार

चिपी विमानतळाचं उद्घाटन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर येणार

चिपी विमानतळाचं उद्धाटनाचा मुहूर्त पुढे ढकलला, कारण काय?

भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात
भरतशेठ... झाले थोडे लेट पण कॅबिनेटच आणलं थेट! मंत्रिपदाची माळ गळ्यात.
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?
'हा मैं नाराज, वहाँ नही रहेना..',भुजबळांचा भडका अन् हाती बंडाचा झेंडा?.
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....