Chipi Airport | चिपी विमानतळाची वाहतूक ‘या’ तारखेपासून सुरु होणार

त्यामुळे आता विमान वाहतूक सुरु करणार आहोत, अशी माहिती विनायक राऊतांनी दिली. (Chipi airport Will Start from March)

Chipi Airport | चिपी विमानतळाची वाहतूक 'या' तारखेपासून सुरु होणार
विमानतळ सिंधुदूर्गाचं पण मग नाव 'चिपी परुळे' का? वाचा रंजक माहिती
Follow us
| Updated on: Feb 09, 2021 | 8:47 PM

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाची वाहतूक येत्या 1 मार्चपासून सुरु होणार आहे, अशी माहिती खासदार विनायक राऊत यांनी दिली. या विमानतळाची वाहतूक 1 मार्चपासून होणार असली, तरी याचे उद्घाटन नेमकं कधी होणार? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. (Sindhudurg Chipi airport Will Start from March)

चिपी विमानतळावर कालपासून ट्रायल लँडींग सुरु झाली आहे. त्यामुळे आता लवकरच नियमित सेवा सुरु होईल. येत्या काही दिवसातच डीजीसीएची टीम येईल. त्यानंतर 1 मार्चपासून नियमितपणे सिंधुदुर्ग ते मुंबई आणि अहमदाबाद ते सिंधुदुर्ग अशी विमान वाहतूक सुरु होईल, असे विनायक राऊत म्हणाले.

राणेंच्या कारकिर्दीत फक्त 14 टक्के काम

चिपी विमानतळाचे काम आम्ही पूर्ण केलं. भाजप खासदार नारायण राणेंच्या कारकिर्दीत चिपी विमानतळाचे काम केवळ 14 टक्के झालं होतं. मात्र आम्ही ते काम शंभर टक्के पूर्ण केले. त्यामुळे आता विमान वाहतूक सुरु करणार आहोत, अशी माहिती विनायक राऊतांनी दिली.

उद्धाटनाचा मुहूर्त पुढे ढकलला

शिवसेनाप्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून 23 जानेवारीला चिपी विमानतळाचे उद्घाटन केले जाणार अशी माहिती समोर येत होती. या उद्घाटनाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू आणि भाजपचे नेते तसेच माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांची प्रमुख उपस्थिती असेल, असे कार्यक्रमाच्या पत्रिकेत लिहिण्यात आले होते.

संबंधित आय. आर. बी. कंपनीने याबाबतची माहिती दिली आहे. चिपी विमानतळाच्या उद्घाटनाच्या निमित्ताने मोठ्या कालावधीनंतर नारायण राणे आणि उद्धव ठाकरे हे एकाच व्यासपीठावर एकत्र दिसणार होते. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र या उद्धाटनाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला होता.

विमानतळ सुरु होण्यास आणखी वेळ जाईल – उदय सामंत 

“चिपी विमानतळ सुरू करण्यासाठी अजून काही कालावधी लागणार आहे. केंद्र सरकारने चिपी विमानतळ सुरू करण्यास कुठलीही आडकाठी केलेली नाही. माञ 23 जानेवारीला विमानतळ सुरू करण्याची कोणतीही परवानगी मुख्यमंत्री किंवा पालकमंत्री म्हणून मी दिलेली नाही,” अशी प्रतिक्रिया पालकमंत्री उदय सामंत यांनी दिली होती.

“चिपी विमानतळाची जी निमंत्रण पत्रिका सर्व ठिकाणी दाखवली जाते. ती अद्याप फायनल झालेली नाही. यासाठी केंद्रीय हवाई उड्डाण मंत्री संपूर्ण सहकार्य करत आहेत. मात्र विमानसेवा सुरू करण्यासाठी ते पूर्ण सुरक्षित असलं पाहिजे. यासाठी थोडा आणखी वेळ जाईल,” अशी माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी चिपी विमानतळ पाहणी दौऱ्यानंतर दिली. (Sindhudurg Chipi airport Will Start from March)

संबंधित बातम्या : 

चिपी विमानतळाचं उद्घाटन; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे-नारायण राणे एकाच मंचावर येणार

चिपी विमानतळाचं उद्धाटनाचा मुहूर्त पुढे ढकलला, कारण काय?

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.