कोकणात पावसानं जोर धरला;भात शेतीच्या कामांना येणार वेग; तळकोकणातील शेतकरी सुखावला

भात पेरणी झाल्यानंतर कोकणात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. तर आज मात्र जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या कामाला आता गती प्राप्त होणार आहे.

कोकणात पावसानं जोर धरला;भात शेतीच्या कामांना येणार वेग; तळकोकणातील शेतकरी सुखावला
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 5:25 PM

सिंधुदुर्गः सिंधुदुर्गात अखेर पावसाने जोर धरला असून सकाळ पासून मुसळधार पावसाला (Heavy Rain) सुरुवात झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून पावसाचा लपंडाव सुरू होता. तर आजमात्र मुसळधार पावसाला सुरूवात झाली असून कोकणातील (Konkan) अनेक भागात पाऊस जोरदापणे कोसळतो आहे. तळ कोकणातील शेतकरी (Farmers) पेरणीची कामे आटोपून लावणीपूर्व कामाच्या तयारीत असतानाच आज पडलेल्या पावसामुळे सुखावला आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 10 तारखेला मान्सून दाखल झाला होता मात्र या पावसाला अपेक्षीत असा जोर नव्हता. आज मात्र सर्वांच्या अपेक्षेप्रमाणे पावसाने चांगलाच जोर धरला.

शेतकऱ्यांच्या कामाला आता गती

भात पेरणी झाल्यानंतर कोकणात पावसाने दडी मारली होती. त्यामुळे भात उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाला होता. तर आज मात्र जोरदार पावसाने हजेरी लावल्याने शेतकऱ्यांच्या कामाला आता गती प्राप्त होणार आहे. कोकणातील सावंतवाडी, वेंगुर्ला, मालवण, दोडामार्ग या भागात पावसाने जोरदारपणे पुनर्गमन केले आहे.

सध्या भाताच्या पेरण्या झाल्याने कोकणातील शेतकरी पावसाच्या प्रतिक्षेत होता. आज पावसाने पुनरागमन केले असल्याने शेतकऱ्यांच्या कामांना गती मिळणार आहे.

भात शेतीच्या कामांना

कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग तालुक्यातही पावसाने हजेरी लावली असून शेतकरी आता कामाच्या तयारीला लागले आहे. वैभववाडी आणि कणकवलीच्या काही भागातही दमदार पाऊस झाला आहे. आज पावसाने कोकणात जोरदार पुनरागमन केले असल्यानेच इतर तालुक्यांमध्येही हजेरी लावली आहे. या पावसामुळे भात शेतीच्या कामांना आता गती मिळणार आहे. यापूर्वी झालेल्या पावसात केलेल्या भातपेरणीवरील संकट आता टळले आहे. या पावसानंतर शेतीच्या कामांचा वेग वाढणार आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.