सिंधुदुर्गात बैलांची झुंज प्रकरणी 12 जणांवर गुन्हा; मुंबईच्या माजी महापौरांचा समावेश; ‘पाल’ संस्थेने केली तक्रार

| Updated on: Apr 01, 2022 | 7:43 PM

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यात तळगावमध्ये बैलांच्या झुंजीचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर बैलांच्या झुंजही लावण्यात आल्या, मात्र या झुंजी चालू असतानाच एका बैलाला गंभीर दुखापत होऊन त्यातच त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी मुंबईच्या माजी महापौरांसर 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाल या प्राणीमित्र संघटनेने तक्रार दाखल केली आहे.

सिंधुदुर्गात बैलांची झुंज प्रकरणी 12 जणांवर गुन्हा; मुंबईच्या माजी महापौरांचा समावेश; पाल संस्थेने केली तक्रार
मालवणमधील बैलांच्या झुंजप्रकरणी आयोजकांवर गुन्हा दाखल
Image Credit source: TV9
Follow us on

मालवणः सिंधुदुर्ग जिल्ह्यातील (Sindhudurg district) मालवण तळगावमध्ये (Talgaon) बैलांच्या झूंज लावल्यामुळे त्या बैलांच्या झुंजीत एका बैलाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सिंधुदुर्ग जिल्ह्यात घडली आहे. बैलांच्या झुंज लावून त्यामध्ये एका बैलाचा मृत्यू झाल्याने मुंबईचे माजी महापौर दत्ता दळवी यांच्यासह 12 जणांना आज अटक करून न्यायालयात हजर केलं गेले. याप्रकरणी मुंबईच्या प्युअर अ‍ॅनिमल लव्हर (पाल) या प्राणीमित्र संस्थेने या विरोधात मालवण पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली होती. त्यानंतर याप्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तळगावमध्ये बैलांच्या झुंज लावण्यात आल्या होत्या. या झुंज लावल्यानंतर दोन बैल त्यांच्या त्यांच्या ताकदीनुसार झुंजत होते. यावेळी बघ्यांचीही मोठी गर्दी तळगावमध्ये झाली होती. बैलांच्या झुंज लावल्यानंतर आरडाओरड करणे, प्राण्यांभोवती घोळका करणे असे प्रका तळगावमध्ये घडले आहेत. ज्यावेळी दोन बैल झुंजत होते, त्या बैलांना झुंज (Bullfighting) खेळत असताना एकमेकांची शिंगे लागून त्यांच्या शरीराला जखमा होऊन त्यातून रक्त येते होते. तरीही तळगावमधील लोकांनी त्या बैलांच्या झुंज न थांबवता चालचू ठेवण्यात आल्या. त्यातील एक बैल गंभीर जखमी होऊन झुंज चालू असतानाच त्याचा त्यामध्ये मृत्यू झाला.

बैल रक्तबंबाळ तरीही झुंज सुरुच

तळगावमध्ये बैलांच्या झुंज लावण्याच्या खेळाचा व्हिडिओही सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. त्यामध्ये झुंज लावलेले बैल रक्तबंबाळ झाले होते, तरीही लोकांकडून बैलांची झुंज थांबवण्यात आली नाही. बैलांची झुंज चालू असतानाच एक बैल दुसऱ्या बैलाची शिंगे लागून गंभीर जखमी झाला, आणि त्यामध्येच त्यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी पाल या प्राणीमित्र संघटनेने झुंज लावणाऱ्यांविरोधात मालवण पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

आयोजकांवर गुन्हा

याप्रकरणी सिंधुदुर्ग पोलीस प्रमुखांनी सांगितले आहे की, ज्यांनी या झुंजीचे आयोजन केले होते. त्यांच्याविरोधात आम्ही गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी 12 जणांवर गुन्हा दाखल करुन यामध्ये आणखी काही जण असतील तर त्यांच्या विरोधातही गुन्हा दाखल करणार आहोत. यावेळी त्यांनी सांगितले की, बैलांच्या या झुंज लावण्याच्या प्रकारात एका निष्पाप बैलाचा जीव गेला आहे. त्यामुळे याप्रकरणी आम्ही गंभीरपणे तपास करुन प्राण्यांच्या झुंज लावणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार आहोत.

झुंज प्रचंड व्हायरल

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या बैलांच्या झुंजीचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. हा व्हिडिओ बघून अनेक जणांनी संताप व्यक्त केला आहे. सोशल मीडियावरुन आयोजकांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी होत आहे. त्यामुळे ही झुंज आता सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता प्रचंड व्हायरल झाली आहे. त्यामुळे हे प्रकरण आता तापणार असल्याचे दिसून येत आहे.

संबंधित बातम्या

रेल्वेतही मिळणार घरच्या जेवणाचा आनंद; भारतीय रेल्वेकडून नवरात्रीनिमित्त ‘खास थाळी’

Pm Modi Death Threat : पंतप्रधान मोदींना जीवे मारण्याची धमकी, मेलमध्ये स्लीपर सेल, RDX तयार असल्याचा उल्लेख

Video: वाघ बैलाचा फडशा पाडत होता, लोक व्हिडीओ रेकॉर्ड करत होते! वाघ अंगावर आला असता म्हणजे…?