लॉकडाऊनमध्ये कोकणच्या पोरांची आयडिया, ग्राम पंचायतीचं टेंडर घेऊन 5 लाखाचं काम मिळवलं

लॉकडाऊनमध्ये गावी अडकल्याने, गावच्या नळपाणी योजनेचं काम हाती घेत अर्थार्जनाचा नवा पर्याय या युवकांनी शोधून काढला आहे.

लॉकडाऊनमध्ये कोकणच्या पोरांची आयडिया, ग्राम पंचायतीचं टेंडर घेऊन 5 लाखाचं काम मिळवलं
Follow us
| Updated on: May 18, 2020 | 4:30 PM

सिंधुदुर्ग : कोरोना महामारीत ‘गड्या आपला गावच बरा’ (Sindhudurg Youth During Lockdown) असा मनात निश्चय करुन अनेक युवक गावी परतत आहेत. पण गावी जाऊन करायच काय? असा प्रश्न जर कोणाच्या मनात येत असेल, तर मालवण-पळसंब येथील या युवकांचा आदर्श घ्यायला (Sindhudurg Youth During Lockdown) हरकत नाही. लॉकडाऊनमध्ये या कोकणातील पोरांनी शक्कल लढवत ग्राम पंचायतीचं टेंडर घेऊन 5 लाखाचं काम मिळवलं आहे.

कोरोनामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण असताना सिंधुदुर्गात दिलासा देणारी एक घटना घडली. लॉकडाऊनमध्ये गावी अडकल्याने, गावच्या नळपाणी योजनेचं काम हाती घेत अर्थार्जनाचा नवा पर्याय या युवकांनी शोधून काढला आहे. मालवण-पळसंब खालचीवाडी येथील सात युवक होळी आणि गुढीपाडव्याला मुंबईतून गावी आले होते. लॉकडाऊनमुळे ते गावीच अडकून पडले.

विना कामाने बसून राहून हे युवक कंटाळले असतानाच वाडीतील नळयोजना दुरुस्त करण्याच्या कामाची निविदा ग्रामपंचायतीकडून (Sindhudurg Youth During Lockdown) निघाल्याचे त्यांना समजले. नुसतच बसून राहण्यापेक्षा काही तरी काम करुया तसेच यातून आर्थिक लाभ होण्याच्या अपेक्षेने या युवकांनी सरपंच यांची भेट घेत काम करण्याचा निर्धार व्यक्त केला.

पाच लाख रुपये खर्चाचे हे काम स्वत:च्या घराजवळीलच असल्याने हे चाकरमानी युवक मन लावून काम करताना दिसत होते. जन्मभूमीला कर्मभूमी समजून भविष्यात गावातच राहण्याचा निर्धार या युवकांनी केला आहे. गावात करण्यासारखे काय आहे? अशा विचारांना या युवकांचे काम दिशादर्शक आणि प्रेरणादायी ठरणार आहे.

महाराष्ट्रातील लॉकडाऊनमध्ये 31 मेपर्यंत वाढवला

महाराष्ट्रातील लॉकडाऊन 31 मे पर्यंत वाढवण्यात आला आहे. हा लॉकडाऊनचा चौथा टप्पा आहे. त्यामुळे आता पुढील 14 दिवस राज्यात सर्वच ठिकाणी लॉकडाऊन कायम राहणार आहे. लॉकडाऊन वाढवताना राज्याचे आर्थिक चक्र सुरु राहण्याची काळजी राज्य सरकार घेणार आहे. यापूर्वी राज्यात काही अटी आणि नियमांसह उद्योगधंदे सुरु करण्यात आले आहेत. आणखी काही उद्योगधंदे सुरु करण्याबाबत सरकार आराखडा आखण्याची शक्यता आहे.

Sindhudurg Youth During Lockdown

संबंधित बातम्या :

Raigad corona update : रायगडमध्ये 24 तासात 38 नवे रुग्ण, जिल्ह्यातील रुग्णसंख्या 518 वर

पांचो मिली तो बन गयी मुठ्ठी…किशोर गावच्या पोरांकडून सदुपयोग, लॉकडाऊनमध्ये विहीर साफ, जीम बांधली

SSC and HSC results date | दहावी आणि बारावी निकालाच्या तारखांबाबत अफवा, बोर्डाचं स्पष्टीकरण

Beed Corona | कोरोना थोपवणाऱ्या बीडमध्ये पहिला बळी, मुंबई-पुण्यातून जिल्ह्यात आलेले कोरोना पॉझिटिव्ह

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.