गायक आनंद शिंदे यांची राजकारणात एण्ट्री, थेट प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेते पक्षीय अदलाबदल करत असताना, सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे (Anand Shinde) यांनी आता राजकारणात प्रवेश केला आहे.

गायक आनंद शिंदे यांची राजकारणात एण्ट्री, थेट प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती
Follow us
| Updated on: Aug 28, 2019 | 6:03 PM

सोलापूर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकीय नेते पक्षीय अदलाबदल करत असताना, सुप्रसिद्ध गायक आनंद शिंदे (Anand Shinde) यांनी आता राजकारणात प्रवेश केला आहे.

आनंद शिंदे यांना महाराष्ट्र स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाच्या प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. सोलापुरात आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत पक्षाचे संस्थापक अध्यक्ष मनोज संसारे यांनी ही माहिती दिली.

सोलापूर जिल्ह्यातील 11 विधानसभा मतदारसंघापैकी मोहोळ आणि माळशिरस दोन विधानसभा राखीव मतदारसंघ आहेत. या दोन मतदारसंघापैकी एका मतदारसंघातून आनंद शिंदे हे निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. आनंद शिंदे हे मूळचे मंगळवेढ्याचे आहेत. त्यामुळे मोहोळ किंवा माळशिरस यापैकी एका मतदारसंघातून ते विधानसभा लढवण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत आरपीआयच्या नेत्यांनी लहान मोठ्या कलाकारांचा फक्त वापर केल्याचा आरोप करत, आनंद शिंदे यांनी रामदास आठवले आणि गवईंवर अप्रत्यक्षपणे टीका केली.

आनंद शिंदे अपघातात किरकोळ जखमी

प्रसिद्ध गायक आनंद शिंदे (Anand Shinde) यांच्या गाडीला काल इंदापूरजवळ अपघात झाला. या अपघातात आनंद शिंदे (Anand Shinde) यांना किरकोळ दुखापत झाली. सुदैवाने ही दुखापत गंभीर नाही. पण त्यांच्या गाडीचं मोठं नुकसान झालं.

कोंबडी पळाली, शिट्टी वाजली, जवा नवीन पोपट हा यासारखी हिट गाणी आनंद शिंदे यांनी दिली आहेत. खणखणीत आवाजाचा गायक म्हणून ते ओळखले जातात. वडील प्रल्हाद शिंदे यांचा वारसा आनंद शिंदे चालवत आहेत. मुलगा आदर्श आणि उत्कर्ष शिंदेही शिंदेशाहीची पताका डौलाने फडकवत आहेत.

VIDEO :

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.